AyuSparsh Ayurved Charitable Trust

AyuSparsh Ayurved Charitable Trust "आयुर्वेद प्रचार।। आयुर्वेद प्रसार।।

सुप्रजननासाठी आयुर्वेद चिकित्सा....! भाग १आयुर्वेद शास्त्रानुसार सदृढ बालक जन्माला येण्यासाठी ऋतू,क्षेत्र,अंबु आणि बीज य...
26/10/2023

सुप्रजननासाठी आयुर्वेद चिकित्सा....!
भाग १

आयुर्वेद शास्त्रानुसार सदृढ बालक जन्माला येण्यासाठी ऋतू,क्षेत्र,अंबु आणि बीज या चार गोष्टींची आवश्यकता असते.

१)ऋतू : वयाची योग्य अवस्था
२)क्षेत्र : गर्भाशयाची उत्तम स्थिती
३)अंबु: गर्भारपनात गर्भाचे पोषण करण्याची शरिराची ताकत
४)बीज: उत्तम गुणवत्तेचे स्त्री - पुरुष बीज

स्त्रीचे वय १८ ते २८ व पुरुषाचे २१ ते ३१ वर्ष दरम्यान या ऋतू,क्षेत्र,अंबु आणि बीज
या चार गोष्टी उत्तम गुणवत्तेच्या असतात.
म्हणूनच ह्या वयात गर्भधारणा झाली तर संतती स्वास्थ्यसंपन्न जन्माला येते.

पण आजकाल मात्र या वयात लग्न होऊन पोरं जन्माला येणं ज्यास्तच अवघड झालं आहे...!

स्वतंत्र कुटुंब पद्धती, कायद्याची वयोमर्यादा, शिक्षणाचा वाढता कालावधी, करिअर करायचे आहे, स्वतः च अस्तित्व निर्माण करायचे आहे, सेट्टलमेंट करायची आहे, जरा एन्जॉय करायचा आहे, लगेच लेकरांमध्ये आडकायचे नाही अशा अनेक कारणांमुळे उशिरा लग्न होतात.

आजूनही कारणे असतात म्हना...,
ती म्हणजे, ३ - ४ वर्षा पेक्षा मुलगा मोठा नको.. पण सेट्टल पाहिजे...घर गाडी बँक बॅलन्स सहित....!

पोराचे घरचे बॅक बोन जोरात असेल तर ठीक ... नाहीतर हिच्या आधी तीन वर्ष डिग्री घेऊन तो बिचारा काय मोठा दिवा लावणार...!

असो ... मुळ विषय भटकायला नको...!

तर अशा अनेक समस्या असतात...!!

मग पुढे करिअर आणि सेट्टलमेंटच्या नादात तिशीच्या आसपास लग्ने होतात.

डे नाईट शिफ्ट करून आणि वडापाव समोसे खाऊन दिवस काढत तो बिचारा लग्नाचा योग कसातरी जुळवून आणतो....!

पुढे लग्नानंतर, जोडप्याला काही काळ एकमेकांसाठी हवा असतो. तो साधारणपणे 2 ते 3 वर्षाचा तरी असतो.

आणि मग त्यानंतर ...
आजुन काही नाही का?
गोड बातमी कधी देणार..?
बस करा आता.. घ्या मनावर...?
काही problem आहे का?

हे प्रश्न पाहुणे रावळे करू लागले की मग
मात्र गर्भाधारणेचा प्लॅन सुरू होतो.

तोपर्यंत मुलगी तिशीत आलेली असते आणि मुलगा पस्तिशित....

आता पुढे एक एक समस्या माहित व्हायला लागतात...

- एक तर गर्भधारणा होत नाही.
स्त्री वंध्यत्व किंवा पुरुष वंध्यत्व
- गर्भ राहिला तर स्थिरावत नाही
- स्थिरावला तर कुठे वजन कमी आहे.. आईला त्रास होतोय... वगैरे वगैरे

मग सगळी मोजमापे करून, ढीगभर औषधी खाऊन लेकरं जन्माला घालायचा खटाटोप करावा लागतो.

त्यातून जन्माला आलेली मुलेही प्रकृतीने थोडी दुर्बल असतात... थोडक्या वातावरण बदलाने नाकाची धार चालू होत असते. रोग्रतिकारशक्ती कमी असणे वगैरे वगैरे तक्रारी आणि ढीगभर अँटिबायोटिक्स चालू असता त्या पिल्याला...!

याला मोठं कारण आहे ती म्हणजे आजची आधुनिक जीवनशैली (Life styel) आणि हायब्रीड अन्नधान्य...!

पुर्वी आज्याने लावलेल्या आंब्याचे फळ नातवाला खायला मिळेल असे म्हंटले जायचे...!

म्हणजे काय? तर आंब्याची कोय लावली तर त्याचे झाड होऊन तो अंबा बहरायला 8 -10 वर्ष जायची....!

बाकी फळांचेही तसेच होते ..! भुईमूग आठ महिन्याचे पीक होते....! गहू सहा महिन्याचा...!

पण आता हायब्रीड संशोधनाने सगळं बदलून टाकलं...

आंब्याचे रोप विकत आणते वेळीच त्याला तुरा आलेला असतो... दुसऱ्या वर्षी नारळ पीक द्यायला लागतो..... भुईमूग पाच महिन्यात काढायला येतोय...

बाकी ही पिकांचे तेच...

आपण संशोधनाने या सर्व पिकांची प्रजनन क्षमता फार लौकर आणली.... उत्पादन क्षमता वाढवली....!

पण इथे एक नवीन समस्या उत्पन्न झाली.

एक म्हणजे त्या झाडाचे आयुष्य कमी झाले.... जो आंब्याचे झाड पूर्वी 70-80 वर्ष किंवा त्याहून अधिक वर्ष जगत होते ते आता हायब्रीड संशोधनाने उत्पादित केलेले आंब्याचे झाड 10 -12 वर्ष किंवा लैत लै 20 वर्ष नंतर कमजोर होऊ लागलं....!

ह्या हायब्रीड संशोधनाने वाढलेल्या उत्पादनातील बी जर आपण परत शेतात पेरले तर ते अत्यंत कमकुवत पद्धतीने उगवते..... त्याची उत्पादन क्षमता अत्यंत कमी असते....!

ही असली हायब्रीड अन्नधान्य खाऊन मानवी शरीरातही अमुलाग्र बदल झाले आहेत.

पुर्वी मुलींना मासिकपाळी वयाच्या पंधराव्या वर्षी यायची आता ती बाराव्या वर्षीच येत आहे.....!

तर बायकांची पाळी बंद होण्याचा काळ हा वयाचे 50 - 55वर्ष होते.... तो काळ आता वयाच्या चाळीस - पस्तिशिवर येऊन ठेपला आहे....!

म्हणजे आजच्या स्त्रीचे प्रजनन आवस्थेचे वय त्याही पेक्षा कमी झाले आहे...!

ही खुप मोठी गंभीर समस्या आपल्या समोर येऊन उभी आहे.

यावर उत्तम उपाय म्हणून शोधले असता केवळ अनादी अनंत शास्वत असे आयुर्वेद शास्त्रच आशेचा किरण म्हणून दिसत आहे.

सुप्रजननासाठी आयुर्वेद शास्त्राचा पुरेपूर उपयोग करून घेणे हाच उपाय आज आहे.

गर्भधारणे पूर्वी पासून ते बाळ जन्माला येई पर्यंत... आणि पुढेही त्या बाळाचे आणि आईचे खानपान पासून त्या बाळाच्या शारीरिक व बौद्धिक विकासा पर्यंत सर्व जबाबदारी आयुर्वेद उत्तम रित्या पेलतोय.

गर्भधारणा करण्यापूर्वी,
- पंचकर्म उपचार करून शरीरशुद्धी
- पंचकर्म उपचारा नंतर बीजशुद्धी
- योग्य काळात गर्भधारणा होण्यासाठी प्रयत्न
- गर्भ राहिल्यानंतर मासानुमासिक औषधी उपचार व " गर्भसंस्कार" चिकित्सा करणे आताच्या काळात अनिवार्य होत आहे.

*या क्रमशः लिखाणात एक एक विषय आपण सविस्तर पाहूया...!!*

- *Dr Saurabh B. Kadam*
*M.D. (Ayurved), Pune* *आयुर्वेद व पंचकर्म चिकित्सक*
*Mob No. 9665010500*

Consultant Ayurveda Speciality Doctor
*आप्तश्री आयुर्वेद व पंचकर्म क्लिनिक,*
दापोडी रोड, शिवदत्त नगर, पिंपळे गुरव, पुणे 411061
Contact no 9665010500

Ayurved Consultant & Assistant Professor at, Dr D Y Patil College Of Ayurved & Research Center, Pune 411018

Consultant Ayurveda Speciality Doctor ,
*Healvibe Ayurved Kidney Care Unit, Pimpri Pune 411018*

Consultant Ayurveda Speciality Doctor,
*Moraya Multi Speciality Hospital,* Dapodi pune 411012

18/03/2023
Eating Methods(आहार सेवनाची आयुर्वेदोक्त पद्धत)- डॉ शलाका कदमआयुवेदाचार्य, पुणेBlog Link: https://shriayurvedic.in/eatin...
04/08/2022

Eating Methods
(आहार सेवनाची आयुर्वेदोक्त पद्धत)

- डॉ शलाका कदम
आयुवेदाचार्य, पुणे

Blog Link:
https://shriayurvedic.in/eating-methods/

August 4, 2022 Eating Methods Ayurved, Ayurvedic, Healthy Life With Ayurveda, आयुर्वेद सर्वांसाठी, आयुस्पर्श AyuSparsh by shriayurvedic01@gmail.com 0 Comments Ayurved Treatment, eating habit, Good way to eat, how to eat food, Hybrid food जे.....

*मुळव्याध:अवघड जागेचं दुखणं...!**आयुर्वेद उपचार* https://shriayurvedic.in/piles-ayurved-treatment/
26/03/2022

*मुळव्याध:अवघड जागेचं दुखणं...!*

*आयुर्वेद उपचार*
https://shriayurvedic.in/piles-ayurved-treatment/

March 6, 2022 Piles Ayurved Treatment Ayurved, Ayurvedic, Healthy Life With Ayurveda, Panchakaram, आयुर्वेद सर्वांसाठी by shriayurvedic01@gmail.com 0 Comments Ayurved Treatment (Hemorrhoids /मुळव्याध / बवासीर) Join Now सहनही ....

Address

Pune
411061

Alerts

Be the first to know and let us send you an email when AyuSparsh Ayurved Charitable Trust posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Practice

Send a message to AyuSparsh Ayurved Charitable Trust:

Share

Share on Facebook Share on Twitter Share on LinkedIn
Share on Pinterest Share on Reddit Share via Email
Share on WhatsApp Share on Instagram Share on Telegram

Category