14/07/2022
एका डॉक्टरला बरेच पेशंट भेटत असतात, पण कधीकधी काही पेशंट त्यांच्या स्वभावामुळे ,त्यांनी आपल्याला दिलेल्या आदरामुळे कायम लक्षात राहतात.आणि असे पेशंट कडून खूप काही जीवनाबद्दल शिकायला भेटतं.असेच माझ्या क्लिनिक मधील एक पेशंट बद्दल एक अनुभव तुमच्यासोबत शेयर करतेय.
एक दिलखुलास व्यक्तिमत्त्वाचा माणूस
"श्रीनिवास जी".ज्यांना लहानपणापासूनच बोलताना त्रास आहे,मेंदूचा आजार असल्यामुळे सतत रोजच त्याची गोळी घ्यावी लागते.ज्यांना साधा रोड क्रॉस करताना सुध्दा कोणाची तरी मदत घ्यावी लागते.असं सगळं आयुष्य असताना त्यांना कायम नोकरी करावी वाटते.आणि आता वयाच्या 40 व्या वर्षीसुद्धा ते नोकरी करत होते.पण म्हणतात ना जगाला चांगल्याच माणसांची किंमत नसते.बर्याच ठिकाणी मिळेल ती नोकरी करुन (कधी गाड्यांच्या शोरूममध्ये 12 तास नोकर करुन लोकांनी कमी पगार दिला तर काही लोकांनी त्यांच्या प्रामाणिकपणावर संशय घेतला.)काही लोकांनी बोलता नाही येत म्हणून सुध्दा मजा घेतली.असं सगळं आयुष्य असताना त्यांच्या चेहर्यावर कायम एक हसू असतं आणि सततं एक सकारात्मक दृष्टिकोन असतो.आयुष्याकडे बघण्याचा दृष्टीकोन शिकवतात असे लोकं.आणि अश्याच पेशंटला जेव्हा बरं करण्याचा जो आनंद असतोना तो कदाचित शब्दात मांडता नाही येणार पण तरी एक छोटासा प्रयत्न. 😊स्वामी श्रीनिवास जी सारख्या चांगल्या लोकांना नेहमी आनंदी ठेवा,इवढीच स्वामी चरणी प्रार्थना🙏👆