Omkar Vadhu Var Suchak Mandal, Pune

Omkar Vadhu Var Suchak Mandal, Pune Hurry up to register for free 1 month subscription

23/11/2025

शादी का फैसला.... आपका या माँ बाप का???

#सोचनेवालीबात

 #घटस्फोट घटस्फोट झाल्या नंतर दहा वर्षांनी ते दोघे एका लग्नात भेटले. नीरजने निशाला एकटच बसलेलं पाहिलं आणि तिच्या जवळ जाऊ...
07/11/2025

#घटस्फोट
घटस्फोट झाल्या नंतर दहा वर्षांनी ते दोघे एका लग्नात भेटले. नीरजने निशाला एकटच बसलेलं पाहिलं आणि तिच्या जवळ जाऊन खुर्चीवर बसला. बराच वेळ दोघे एकमेकांकडे पाहूनही जणू काही न पाहिल्यासारखे करत राहिले. सात वर्षे त्यांनी एकत्र घालवली होती. भांडणं तर होतीच, पण काही गोड आठवणीही मनात घर करून बसल्या होत्या.

शेवटी नीरजनेच बोलायला सुरुवात केली... "कशी आहेस?"
निशा थोड्या अभिमानाने म्हणाली... "मजेत आहे. दुसऱ्या लग्नाला नऊ वर्ष झाली. दोन मुलं आहेत."

नीरजने तिच्या चेहऱ्याकडे नीट पाहिले. ती पूर्वीपेक्षा खूप बारीक दिसत होती, चेहऱ्यावर आधीसारखी चमक नव्हती. अंगावर महागडे कपडेही नव्हते. त्याला आठवले, जेव्हा ती त्याच्यासोबत होती तेव्हा किती सुंदर दिसायची. नीरज तिच्याकडे पाहत होता तेव्हा निशाने नजर चुकवली. मग स्वतःला सावरत ती म्हणाली.. "तू कसा आहेस? आणि आपला बंटी कसा आहे?"

नीरजही थोड्या गर्वाने म्हणाला... "मीसुद्धा मजेत आहे. दुसऱ्या लग्नाला सहा वर्ष झाली. एक मुलगी आहे. आणि आपला बंटी आता नववीत गेला आहे. माझी पत्नीही खूप चांगली आहे. आम्ही दोघे खूप आनंदी आहोत."

हे ऐकून निशाच्या मनात जळफळाट झाला, पण तिने चेहऱ्यावर ते उमटू दिलं नाही. तिने नीरजकडे नीट पाहिलं. जणू चाळीसाव्या वर्षीच तो म्हातारा वाटत होता. केसांवर पूर्ण पांढरेपणा झळकत होता. वरून रंग लावलेला दिसत होता, पण मुळाशी पांढरे केस स्पष्ट दिसत होते. पोटसुद्धा खूप वाढलं होतं.

दोघे बराच वेळ शांत बसले. लग्नाच्या सोहळ्यात ते दिवसभर जवळपास होते, पण आणखी बोलणं झालं नाही.

निघायच्या वेळी नीरज निशाजवळ आला आणि म्हणाला, "एक गोष्ट सांगू का?"
निशा म्हणाली, "काय?"
नीरज उदासपणे म्हणाला, "आयुष्य खरं तर तेच छान होतं जे तुझ्यासोबत जगत होतो. आता तर फक्त दिवस ढकलतोय."

हे ऐकून निशाच्या मनात आनंद आणि वेदना एकत्र उसळून आल्या. जणू गळ्यात काहीतरी अडकलं. अश्रू आवरत ती म्हणाली, "मीही पश्चात्ताप करतेय. एक दारुडा आणि वाईट माणूस पडलाय वाट्याला. रडत रडत दिवस काढतेय."

नीरजने डोळ्यात आलेले पाणी लपवण्यासाठी चेहरा वळवला आणि म्हणाला, "आपण दोघे मूर्ख होतो. छोट्या छोट्या गोष्टींना मोठं करून वेगळे झालो. आज तुला एवढंच सांगायचंय की तू खूप चांगली आहेस. तुझ्यासोबत घालवलेल्या क्षणांच्या आठवणींत दिवस काढतोय."

हे ऐकून निशा रडू लागली. रडत रडत ती म्हणाली, "मीसुद्धा त्याच आठवणींवर जगतेय." एवढं म्हणून तिने पर्स उचलली आणि निघून गेली.

नीरज तिच्याकडे पाहतच राहिला, जोपर्यंत ती नजरेआड झाली नाही. 💔

अज्ञात लेखकांस सादर समर्पित ....
असा पश्चात्ताप करण्याची वेळ कोणावरही येऊ नये त्यांसाठी हा लेख........ 😌
Cp

🎯 विवाह एक भीषण परिस्थिती....😔😔😔😔😔    पुढील काळात लग्न न झालेल्या वयस्कर तरुण-तरुणी मोठ्या संख्येने दिसतील. वृध्द झाल्या...
03/10/2025

🎯 विवाह एक भीषण परिस्थिती....
😔😔😔😔😔
पुढील काळात लग्न न झालेल्या वयस्कर तरुण-तरुणी मोठ्या संख्येने दिसतील. वृध्द झाल्यावर आधाराला कुणी नसेल आणि पुढील पिढीची वंशवृद्धीचं न झाल्याने वृद्धाश्रमा मध्ये जाण्याची किंवा एकाकी आयुष्य काढण्याची वेळ येणार, यात शंका वाटत नाही. अपेक्षांचे ओझे बाळगून भविष्याच्या बाबतीत विचार न करणारी हि पिढी स्वतः बरोबर पालकांना सुद्धा आयुष्याच्या वृद्धत्वाच्या टप्प्यावर अनेक चिंताना जन्म देत आहे.कारण मुला-मुलींचे लग्न झाल्यावर पालकांची गृहस्थाश्रमाची जबाबदारी संपते. पुढील पिढीकडे सूत्रे देऊन पालक आपल्या निवृत्ती आयुष्याचे नियोजन करु शकतात. आता मागील एक पिढी आणि आताची विवाह न झालेली पिढी यांचे निवृत्तीचे आयुष्य खडतर असण्याची शक्यता जास्त आहे. फक्त पैसा, प्रॉपर्टी, दागदागिने, गाड्या म्हणजे सर्व सुख नाही. कौटुंबिक आयुष्यात चांगली-वाईट आव्हाने आणि संकटे यांना सामोरे जाताना पतीपत्नी एकमेकांचा मानसिक आधार असतात. जीवनात पूर्णत्वाचा खऱ्या अर्थाने आनंद मिळवायचा असेल तर वाट्याला आलेलं दुःख किंवा प्रतिकुलता सुद्धा सुसह्य होते. ती एकमेकांच्या पूरक भूमिकेमुळे.
*शिक्षणाची पात्रता, आर्थिक कमाई, जमीनजुमला, राहण्यासाठी स्वतःचे घर, सौंदर्याच्या व्यापक कल्पना, ठराविक भौगोलिक क्षेत्रात म्हणजे मुख्यत: पुणे, मुंबई, नाशिक येथेच वास्तव्य असावे.* याचा दुराग्रह, हट्टापायी विवाहाचे वय निघून जात आहे.
तारुण्याची किंवा ठराविक वयात वैवाहिक सौख्याची प्राकृतिक अनुकूलता आणि निरामय आनंदाला ही पिढी पारखी होत आहे. *तेही आपणचं आपल्यावर लादून घेतलेल्या अटीमुळे.*
खरं तर बायोडाटा बघुन किंवा अभ्यासून त्यातील प्रतिकूल मुद्द्यांवर कशी मात करुन विवाहासाठी पार्श्वभूमी तयार करता येईल,याचा विवाहेच्छुक तरुण-तरुणींनी विचार गंभीरपणे करायला हवा. ठराविक बाबींचा अत्याग्रह हा आपल्या वैवाहिक आयुष्याला मारक आणि बाधक ठरत आहे आणि कल्पनांचे इमले रचूनही वास्तवात एकाकीपणे जगायची वेळ येत आहे. आयुष्याची संध्याकाळ जवळ आल्यावर हा विचार करण्यात आपण एवढी मोठी चूक केली त्याचे परिणाम वैयक्तिक आयुष्यावर तर पडणारचं आहेत.पण सामाजिक संतुलन सुध्दा बिघडणार आहे. आपल्या संस्कृतीला सुद्धा याबाबी मारक ठरत आहेत.
स्त्री-पुरुषांच्या आयुष्याची पूर्णता ही वंशवृद्धी, मुलांचे संगोपन, शिक्षण, गृहस्थाश्रम आणि वानप्रस्थाश्रम या पायऱ्यांतूनच होत असते.
आपण विवाह संस्थेचा पाया आणि ढाचा उखडून टाकत आहोत. आपले अपेक्षांचे दुराग्रह आपल्याला कुठे घेऊन जात आहेत.यावर गंभीर पणे आत्मचिंतन करण्याची वेळ आली आहे.
लोकसंख्येत वृद्ध लोकांचे प्रमाण वाढल्याने जपान सारखे प्रगत, विकसित राष्ट्र गंभीर परिणामांना सामोरे जात आहे. घरातील वैयक्तिक विवाहाचा प्रश्न राष्ट्रीय दृष्टिकोनातून किती गंभीर आहे हे तेथील परिस्थितीचा अभ्यास केल्यास कळू शकेल.
शेवटी जी तडजोड वय वाढल्यावर करणे अपरिहार्य आहे. त्यासाठी सगळे तारुण्य पणाला लावून अपेक्षांचे ओझे किती काळ वाहायचे एवढे करुन पुन्हा आपण केलेल्या अपेक्षा पूर्ण झाल्याचं नाहीत तर मग इतका वेळ म्हणजे वाया गेलेली अमूल्य तारुण्याची वर्षे, घेतलेले efforts आणि वाढलेल्या वयाचे काय?
कृपया संवादाचे पुल बांधून लवकरात लवकर वैवाहिक आयुष्याची स्थिरता कशी प्राप्त करता येईल.यासाठी काय पावले उचलावीत लागतील याचा मुळापासून विचार व्हावा.
*अशी अपेक्षा*
आज अपेक्षेचे ओझे वाढवून
नाहक मुला-मुलींचे वय निघून जात आहे.याची खंत ना मुलांना ना पालकांना.
आजचा काळ ,आजची परिस्थिती काही वर्षांनी तशीच राहिल,हे सांगता येत नाही.आजचा पैसा,सुख,ऐश्वर्य, आरोग्य काही वर्षांनी तसेच राहिल हे सुध्दा सांगता येत नाही.
*पालकांनो आणि मुला-मुलींनो भविष्याचा विचार करुन आजच निर्णय घ्या.*
अपेक्षांच्या जंजाळात अडकून न राहता समजदारीने निर्णय घ्या.योग्य वेळेत,योग्य वयात विवाहाचा निर्णय घ्या.काळ निष्ठुर आहे,चुकीला त्याच्याकडे माफी नाही.
आणि नंतरच्या पश्तापाला अर्थ नाही.
आवडल्यास पोस्ट फाॅरवर्ड करा.

प्रत्येक मुलीने आणि आईने वाचावे असे पत्र आहे. लग्नाच्या वयाच्या मुली असलेल्या आईनी जरूर वाचावे, विचार करावा,सध्याच वैवाह...
03/10/2025

प्रत्येक मुलीने आणि आईने वाचावे असे पत्र आहे.

लग्नाच्या वयाच्या मुली असलेल्या आईनी जरूर वाचावे, विचार करावा,
सध्याच वैवाहिक जीवन खूपच तणावग्रस्त झाले आहे.
नवरा-बायको दोघांच्याही एकमेकांकडून अपेक्षा गगनाला भिडल्या आहेत.
प्रत्येकालाच आपलं म्हणणं, करिअर महत्त्वाचं वाटतं, घटस्फोटाचे प्रमाण वाढत आहे. हे वाढतं प्रमाण बघितलं की वाटतं हा काळ विवाह संस्थेच्या अग्निपरीक्षाच असला पाहिजे अशा बऱ्याच शंका, धास्ती ज्या मुली लग्न करण्यासारख्या झाल्या आहेत त्या मुलींच्या आईच्या मनात येतात अशीच एक आई तिच्या मुलीचं लग्न ठरलेले आहे. आणि तिला पत्रातून काही गोष्टी सांगत आहे. त्यानिमित्ताने आईचे लाडक्या लेकीला पत्र,
प्रिय बेटा गोड पापा व आशीर्वाद. लेक लाडकी माहेरची होणार सुन तु सासरची यानिमित्ताने आईकडून हे पत्र खास तुझ्यासाठी.
पंधरा दिवसांवर येऊन ठेपलेल्या तुझ्या मुलीपासून सुनेच्या भूमिकेसाठी तुला शुभेच्छा आणि काही गुजगोष्टी.
कुलदेवतेची कृपा, वेदमंत्रांची पवित्रता, फुलांचा सुगंध, मंगल वाद्यांचा पवित्र ध्वनी आणि ऋणानुबंधांच्या गाठीने तुझ्या स्त्रीत्वाच्या सर्व अपेक्षा पूर्ण होणार आहेत.
दोन घराण्यांचे रेशमी बंध दृढ करण्यासाठी हा संस्कार होणार आहे.
बेटा, विवाह म्हणजे पतीची पत्नी एवढंच नातं नसून कुटुंबाची सून म्हणून तुला भूमिकेत शिरायचं आहे. उंबरठ्यावरचं माप ओलांडताना पहिल्या पावलाबरोबरच हजारो मैलांचा नवीन प्रवास सुरू होणार आहे. तेच पहिलं पाऊल विश्वासाने पडलं की पुढचा प्रवास सुखकर होईल हे पाऊल घरात टाकताना तडजोड या शब्दाबरोबर मैत्री केली कि संसार सुखाचा होईल हे लक्षात ठेव. आणखी एक सुख हे बूमरँगसारख असतं, दुसऱ्याला दिलं कि फिरून ते आपल्यापाशी येतं. तु समजूतदार आहेस पण माझ्यातल्या आईला काळजी वाटते म्हणून हा पत्रप्रपंच. बेटा, विवाह यशस्वी होण्याचं गुपित फक्त योग्य जीवनसाथी मिळवण्यात नसून योग्य जीवनसाथी बनण्यात आहे.
संसार सुखाचा करण्यासाठी दोघे एकमेकांचे सोबती व्हा, बारीक-सारीक तडजोडी स्वीकारा. हट्टीपणा कमी केलात तर सगळेच हट्ट पुरवले जातील. कुटुंबातील सदस्यांचा आदर राख , प्रेमाने वाग ते ही मग तुला आपली मानतील, प्रेम, सुख तुला ही नक्कीच मिळेल. महत्त्वाचं मोबाईल, फेसबुक व्हाट्सअप, चॅटिंग पासून थोडं दूर राहण्याचा प्रयत्न कर. त्यामध्ये वेळ घालण्यापेक्षा घरांमध्ये संवाद ठेव. थोडं अवघड जाणार आहे पण सवय कर. एक राहिलंच, फावल्या वेळात किंवा रोज मला फोन करण्यापेक्षा सासुबाईंशी संवाद ठेव. छोट्या छोट्या गोष्टी मला फोनवरून सांगण्यापेक्षा सासूबाईंचा सल्ला घे.
मला तर काय तुझ्याशी गप्पा मारायला आवडेलच पण नकळत माझी माया तुला माझ्यातच गुंतवून ठेवेल, त्यापेक्षा तू सासुबाईंशी मैत्री कर.
त्याच तुझ्या हितचिंतक व मार्गदर्शक आहेत. माझे व पप्पांचे आशिर्वाद तुझ्या पाठीशी आहेतच.
तुझे बालपण, अल्लडपणा संपून आता तू गृहिणी होणार आहेस.तुझ्या आगमनाने त्या घरची तू भरभराट करशील दोन्ही घराण्याचे नाव उज्वल करशील हे नक्कीच.
बेटा, तुला वाटेल आधुनिक काळात मी पत्र लिहिले आहे पण हेच पत्र तुझ्या कायम सोबत असेल मोबाईल मधील मेसेज सारखे डिलीट होणार नाही, तुला खूप खूप आशिर्वाद.❤️
सौ प्रार्थना देशमुख
💕💕💕💕💕💕💕

13/07/2022

Hello WE are into matchmaking and woud love to help the once you are finding their life partners and can join our website https://buff.ly/3P7kvbC and get started thanks team Omkar vadhuvar Mandal

आपली नाती जुळवाण्याची जी संकल्पना आहे ती इतरांनपेक्षा खुप वेगळी आहे. आपण  ज्या प्रकारे मुलामुलींना बोलावून त्याना लग्नाब...
07/06/2022

आपली नाती जुळवाण्याची जी संकल्पना आहे ती इतरांनपेक्षा खुप वेगळी आहे. आपण ज्या प्रकारे मुलामुलींना बोलावून त्याना लग्नाबद्दलचे मार्गदर्शन करता हें इतरांनपेक्षा वेगळे आहे. या मार्गदर्शन फायदा आम्हाला झाला त्याबद्दल मी व माझ्या परिवार कडून आपल्या संस्थेचे आभार आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा💐💐
Mostly Thanks to Varsha Madam and Chaitanya Sir

- रोहित

आपण सुरू केलेला उपक्रम खुप वेगळा आहे. आपण ज्या प्रकारे पालकांना न बोलावता फक्त मुला मुलींना बोलावून त्यांना एक मेका सोबत...
12/05/2022

आपण सुरू केलेला उपक्रम खुप वेगळा आहे. आपण ज्या प्रकारे पालकांना न बोलावता फक्त मुला मुलींना बोलावून त्यांना एक मेका सोबत बोलायला लावून समजून घ्यायला वेळ देता आणि त्या सोबत लग्न म्हणजे काय, जोडीदार कसा असावा याचे सुधा मार्गदर्शन करता. हे खुप वेगळं आहे आणि याचा फायदा आम्हाला झाला. आपणाला व आपल्या विवाह संस्थेला आमच्या कडून खुप शुभेच्छा 💐💐💐

मिनल

Form no : OMM0027नाव:  गौरव शेखर रेळेकर जन्म दिनांक : 1988शिक्षण :  B. COM. MBA पगार : - 75,000 /- month उंची : 5 फुट 7 ...
26/04/2022

Form no : OMM0027

नाव: गौरव शेखर रेळेकर

जन्म दिनांक : 1988

शिक्षण : B. COM. MBA

पगार : - 75,000 /- month

उंची : 5 फुट 7 इंच

राहणार : पुणे

मुळगाव : जिल्हा. सांगली

Contact : 9689914325

Form no : OMM0026नाव:  प्रणव विजयकुमार पतंगे जन्म दिनांक : 1992 शिक्षण :  B. COM. पगार : -20,000  /- month उंची : 5 फुट ...
13/04/2022

Form no : OMM0026

नाव: प्रणव विजयकुमार पतंगे

जन्म दिनांक : 1992

शिक्षण : B. COM.

पगार : -20,000 /- month

उंची : 5 फुट 7 इंच

राहणार : सातारा

मुळगाव : ता. तळा जिल्हा. रायगड

Contact : 9689914325

Form no : UGM018नाव:,Nilesh Kanadeजन्म दिनांक : 1992 शिक्षण : FY B. COM. पगार : -25,000 /- month उंची : 5 फुट 5 इंच राहण...
08/04/2022

Form no : UGM018

नाव:,Nilesh Kanade

जन्म दिनांक : 1992

शिक्षण : FY B. COM.

पगार : -25,000 /- month

उंची : 5 फुट 5 इंच

राहणार : पुणे

मुळगाव : जिल्हा. रत्नागीरी

Contact : 9689914325

Form no : OMM0025नाव:  श्रेयस पांडुरंग सनगरे जन्म दिनांक : 1986शिक्षण :  B.E. पगार : - 50 LPA उंची : 5 फुट 5 इंच राहणार ...
05/04/2022

Form no : OMM0025

नाव: श्रेयस पांडुरंग सनगरे

जन्म दिनांक : 1986

शिक्षण : B.E.

पगार : - 50 LPA

उंची : 5 फुट 5 इंच

राहणार : कॅनडा

मुळगाव : ता. रत्नागीरी जिल्हा. रत्नागीरी

Contact : 9689914325

Address

Marketuard Pune
Pune
411037

Alerts

Be the first to know and let us send you an email when Omkar Vadhu Var Suchak Mandal, Pune posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Practice

Send a message to Omkar Vadhu Var Suchak Mandal, Pune:

Share