19/08/2025
माहिती नसलेले सुपर फूड---
भाग--2
मुळ्याच्या पानांचे आरोग्य फायदे प्रत्येक वयातील व्यक्तींसाठी , प्रतिकारशक्ती वाढवण्यात असून ते मधुमेहापासून ,संधिवाता वर उपचार करण्यापर्यंत विविध आहेत.
मुळ्याच्या पानांमध्ये जीवनसत्त्वे आणि खनिजे भरपूर प्रमाणात असतात.स्वयंपाकात विविध प्रकारे वापरू शकता.
1) मुळ्याची पाने लसूण घालून परतून साइड डिश म्हणून वापरले जाऊ शकतात,
2) मुळ्याची पाने व कोवळा मुळा बारीक चिरून अथवा खिसून -सूप, नूडल्स आणि अगदी सॅलड आणि सँडविचमध्ये टॉपिंग म्हणून वापरले जाऊ शकतात.
3) मुळ्याच्या पानांची भाजी --
साहित्य- एक बारीक चिरलेला कांदा,
आलं, लसूण आणि हिरव्या मिरच्यांची पेस्ट किंवा बारीक कापून, दोन मोठे चमचे (25 ग्रॅम) काळी उडीदाची डाळ स्वच्छ धुवून . मुळ्याची पाने स्वच्छ धुवून बारीक चिरून घ्या.
आता एक कढई घेऊन त्यात मोहरीचं किंवा तुमच्याकडे उपलब्ध असलेलं तेल गरम करा.
तेल गरम झाल्यानंतर सर्वप्रथम उडदाची डाळ सोनेरी रंगाची होईपर्यंत भाजून घ्या. आता त्यात लसूण, कांदा आणि जिरे टाकून चांगले भाजून घ्या.
आता मिश्रणात हिरव्या मिरच्या घालून हलकश्या भाजून घ्या आणि स्वादानुसार त्यात हळद घाला. सर्व सामग्री व्यवस्थित मिक्स करुन घ्या.
पुढे, मुळ्याची पाने घालून त्यात चवीनुसार मीठ मिक्स करा. मध्यम आचेवर भाजी शिजत ठेवा.ही भाजी बनवताना भाजीतील नैसर्गिक पाणीच त्याला शिजवण्यास पुरेसं असतं. आवश्यकता असेल तरच वरून आ आवश्यक तेवढे पाणी घाला. व व्यवस्थित शिजवा.
4)मुळ्यांच्या पानांचा साग --मुळ्याची पाने स्वच्छ धुवून कुकरमध्ये एक शिट्टी देऊन शिजवून घ्या. कुकरमधून काढून ती पाने मिक्सरमध्ये वाटून घ्या. कढईत तेल घेऊन त्यात उडदाची काळी डाळ सोनेरी होईपर्यंत भाजून घ्या. आता त्यात मोहरी घाला. पुढे, त्यात बारीक चिरलेली हिरवी मिरची, किसलेलं आलं आणि लसूण घालून तडका द्या. मिश्रण १० मिनिटे मंद आचेवर शिजवा. तयार झालाय आपला मुळ्याच्या पानांचा साग. सागाची चव अजून रुचकर लागण्यासाठी तुम्ही त्यात पालकची पाने मिक्स करु शकता.
5)किसलेला मुळा --
बारीक चिरलेली मुळ्याची पाने,किसलेला मुळा
तेल,मोहरी,जीरे,हिंग,बारीक चिरलेली मिरची,लसूण,हळद,मीठ,ओले खोबरे
कृती:
प्रथम, मुळा किसून घ्या आणि पाने बारीक चिरून घ्या.
मध्यम आचेवर कढईमध्ये तेल गरम करा.
तेल गरम झाल्यावर त्यात जीरे,मोहरी, हिंग, आणि मिरची घालून फोडणी करा.
फोडणी झाल्यावर लसूण घालून परतून घ्या.
आता किसलेला मुळा आणि चिरलेली पाने घालून भाजीला व्यवस्थित मिक्स करा. चवीपुरते हळद आणि मीठ घालून भाजीला व्यवस्थित मिक्स करा आणि झाकण ठेवून शिजवून घ्या.
तुम्ही भाजी शिजवण्यासाठी थोडेसे पाणी देखील घालू शकता.
पाच ते सात मिनिटांमध्ये भाजी शिजून तयार होईल.
शेवटी, भाजीमध्ये वरून किसलेले ओले खोबरे घालून मिक्स करा.
मुळ्याच्या पानांमध्ये व्हिटॅमिन ए, सी, आणि के तसेच फायबर आणि अँटीऑक्सिडंट्स भरपूर प्रमाणात असतात. या पानांमध्ये कॅलरीज कमी असतात म्हणूनच
मुळ्याची पाने आरोग्यासाठी खूपच फायदेशीर आहेत. त्यामुळे, ती आहारात नियमितपणे समाविष्ट करणे आरोग्यासाठी चांगले आहे.
तुमच्याही मुळाच्या पानांच्या काही रेसिपी असतील तर नक्कीच शेअर करा.
Clinical Dietician Sheetal Mudgal
www.dietitiansheetal.com
Online and Offline Consultation available
7276415838