16/09/2025
Gratitude : आभार मानणं 🙏,
एक दुर्लक्षित पण प्रभावी उपचार!
Gratitude is not optional. It’s healing.
आजारी असतानाही जगण्याचं समाधान मिळू शकतं ,
जर आपण ‘कशासाठी आभार मानायचे’ हे ठरवलं.
Gratitude चे 5 वैज्ञानिक फायदे:
1.Cortisol कमी, Immunity वाढते: सततच्या तक्रारी ‘Stress Hormone’ वाढवतात. Gratitude Cortisol कमी करून शरीराला शांत ठेवतो.
2.Heart Rate, Sleep, BP सुधारतो. Gratitude करणाऱ्या रुग्णांमध्ये हृदय आणि BP नियंत्रित राहतं.
3.Depression व Anxiety ला नैसर्गिक आळा. 21 दिवस रोज फक्त 5 गोष्टींसाठी आभार मानले तरी मानसिक स्थिती बदलते.
4.Compliance सुधारतो , रुग्ण उपचारात सहकार्य करतो. Gratitude mindset असलेल्या रुग्णांचा recovery rate चांगला असतो.
5.Caregiver चं Emotional Burnout कमी होतं. Appreciation चे शब्द त्यांचं मनोबल वाढवतात.
🌻 ही कृती खूप साधी आहे , पण परिणाम खोलवर आहेत:
•रोज फक्त 3 गोष्टी लिहा “आज चांगली झोप झाली”, “शुगर नॉर्मल होती”, “मुलांशी संवाद झाला.”
•केअरगिव्हर साठी: “आज पेशंट हसला”, “भाजी खाल्ली”, “कणखर वाटलं” हेसुद्धा मोठं आहे.
आणि कधी कधी, एक साधा ‘धन्यवाद’ डॉक्टरांसाठीही…
जर रुग्ण किंवा कुटुंबियांना असं वाटत असेल की ‘आपलं आयुष्य बदललं गेलं’ , तर मनापासूनचा एक ‘Thank you, Doctor’ तुमचं आणि आमचं नातं अजून अर्थपूर्ण करतं.
कधी उपचारातली सकारात्मकता, कधी ऐकून घेतलेलं मन,
कधी चुकीचं न बोलता दिलेला आधार , हेही तुमचं healing चं एक टप्पं असतं.
“रोग आहे , पण तोच ‘फोकस’ का असावा?
शरीरात जे काही ठीक आहे, त्याची नोंद घेतलीत का?”
👉 Gratitude म्हणजे नकारात्मक गोष्टी झाकणं नाही ,
तर ‘आपल्याकडे जे आहे, ते पूर्ण ताकदीनं वापरणं.’
📣 आजपासून सुरुवात करा:
रोज एका डायरीत 3 गोष्टी लिहा , ज्यासाठी मनापासून आभार वाटतात.
कधी डॉक्टर, कधी केअरगिव्हर, कधी स्वतःलाच पण लिहा.
Dr Ravindra L Kulkarni
MD, DNB, FSCAI (Cardiology)
Just For Hearts
Follow 👉 Just for Hearts
Consult 👉 94229 91576 ,
94229 89425
( WhatsApp message only )