07/11/2025
नेत्र रुग्णालयाचे डॉ. प्रवीण रामचंद्र जगताप यांना समाजातील नेत्रसेवेच्या अलौकिक कार्यासाठी 'द असोसिएशन ऑफ शलाकी महाराष्ट्र' या संस्थेकडून 'डॉक्टर मधुसूदन झंवर ओरेशन अॅवॉर्ड फॉर कम्युनिटी ऑप्थलमोलॉजी' हा पुरस्कार जाहीर झाला आहे. डॉ. जगताप १८ वर्षांपासून ग्रामीण भागामध्ये नेत्ररुग्णांसाठी अव्याहतपणे काम करीत आहेत. ग्रामीण भागात नेत्र तपासणी, उपचार, शस्त्रकर्म, नेत्रदान व जनजागृती करणे. शालेय विद्यार्थ्यांना नेत्र आरोग्य व तपासणी संदर्भात मार्गदर्शन व तपासणी शिबिरांचे आयोजन. वारकऱ्यांच्य मोफत तपासणी व उपचारासाठी केलेले विशेष प्रयत्न., या त्यांच्या कार्याची दखल घेऊन त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात येत आहे. शुक्रवारी (ता. ३१) नागपूर येथे होणाऱ्या 'सिनर्जी २०२५' या नेत्रतज्ञांच्या राष्ट्रीय कार्यशाळेमध्ये पुरस्कार प्रदान करण्यात आला.