01/12/2022
आमच्या जगण्याला मान्यता द्या ।। "
# जागतिक एड्स दिन ।।
आयुवेदातलं पदवीवोत्तर शिक्षण घेत असताना, एखाद्या वेगळ्या आणि आधुनिक शास्त्रात उत्तर नसलेल्या विषयावर सखोल अभ्यास करायचा असं पक्कं केलं होतं।। त्यानुसार आयुर्वेदात एड्सला काय म्हणलं जाऊ शकतं, त्याची आयुर्वेदिक चिकित्सा कशी केली जाऊ शकते यावर सखोल विचार करणारा शोध निबंध मी निवडला।।
या अंतर्गत सरकारी एड्स चिकित्सा करणाऱ्या 4 केंद्राना आणि एड्स रोग्यांच्या मुलांचा सांभाळ करणाऱ्या
एका सामाजिक संस्थेच्या 14 केंद्रांना वारंवार भेटी दिल्या. 600 पेक्षा ज्यास्त एड्स ग्रस्तांना समुपदेशन केले, दिनचर्या पालन शिकवले, रोगप्रतिकारक शक्ती उत्तम ठेवण्यासाठी गरजेची पथ्यापथ्य समजून सांगून ती पथ्यापथ्ये लिखित स्वरूपात वाटली.
तपासलेल्या रुग्णापैकी,
"आम्हाला कुणीतरी हात लावून तपासत आहे, सहानुभूतीने आमच्याशी बोलत आहे" या भावनेनेच अनेकांचे डोळे पाणावले होते.
20 -30 % लोक चांगले शिकलेले होते. तेवढेच लोक चांगल्या श्रीमंत घरातलेही निघाले।। एक तर मोठ्या नावाजलेल्या समाज सेवकांच्या नातलग निघाल्या।।
कुणाला अपघातांने तर कुणाला सुडाने संसर्ग झाला होता. बऱ्याच बायकांना प्रेग्नसीच्या वेळी तपासणी करताना निदान झालं. कुठेही तोंड मारल्याचा पश्चातापही काहींना होत होता.
पण सर्वांचे म्हणणे एकच होते,
" बस्स करा द्वेष - तिरस्कार । नको ते सरकार कडून येणारं रेशन पाणी । केवळ माणुसकी दाखवा आणि आमच्या जगण्याला मान्यता द्या ।। "
हीच त्यांची विनवणी होती.
मोठ्या पैसेवाल्या घरातले असूनही सरकारी रेशन खाण्याची वेळ काहींवर आली होती. समाजातून वावरताना पडणाऱ्या तिरस्कृत नजरा मृत्यु पेक्षा भयानक वाटतात अशी खंत एकाने व्यक्त केली.
नवरा आजर देऊन निघून गेला, समाजाने वाळीत टाकलंय, पोटची लेकरं गळ्यात आहेत, जगताही येत नाही आणि मारता ही येत नाही अशी अवस्था एका बाईंनी सांगितली.
त्यातलं एक जोडपं मात्र व्यवस्थित दिसलं. मागील 3 - 4 वर्षांपासून निदान होऊनही कुठल्याही प्रकारच्या शारीरिक तक्रारी त्यांच्यात नहूत्या।।
जैसे ठेविले तैसे राहावे। समाधानी असावे ।।
या विचारांचे व सात्त्विक वृत्तीचे जाणवले.
आजार होण्याचे कारण दोघांनाही अज्ञात होते। पोटी कोणी आपत्य नहूतं।पूर्वीपासूनच दोघांचाही दररोजचा पुजा पाठ नित्याचा होता।। आहारही सात्विक होता।।
आध्यात्मिक वृत्तीमुळे देहाची नशवरता जणू त्यांना चांगलीच उमगली होती।। त्यामुळे ते ऐहिक गोष्टींच्या मोहात अडकलेले नाहीत असे वाटत होते।।
विशेष म्हणजे सगेसोयरे - हितचिंतन - सरकारी डॉक्टर यांच्याकडून आधुनिक औषधी घेण्यासाठी वारंवार दबाव आणून देखील यांनी ते ऐकले नाही।। कुण्या वैद्यांच्या सल्ल्यानुसार पांढऱ्या रुईचे फुल, गुडुची आदी 5 - 6 औषधी नित्याने घेत होते. ओंकार जाप करत होते।।
150 पेक्षा ज्यास्त रुग्णांची सखोल तपासणी केली. त्यांना झालेला संसर्ग कुठल्या माध्यमातून झाला, त्यांच्यात क्रमाक्रमाने जाणवत आलेल्या लक्षणांची माहिती घेतली. त्यांना चालू असलेल्या औषधांबद्दल व त्या औषधांनी त्यांना जाणवत असलेल्या परीणाम - दुष्परिणामांची सखोल माहिती घेतली.
त्यातून आमच्या क्रायटेरिया बसणाऱ्या 100 रुग्णांनाचा डेटा घेऊन शोधनिबंध पुर्ण केला.
आधुनिक औषधींच्या तीक्ष्ण माऱ्याने काही व्याधी लक्षणे दबली गेली होती तर याच आधुनिक औषधींच्या दुष्परिणामांची अनेक लक्षणे मात्र ओसंडून वाहत होती.
हे औषध खाल्लं की गाठी येतात.. खाज येतेय.. अंग गरम होतं ...लघवी जळजळ करते.. पाळीतून खुप रक्त जातं अशी बरीच लक्षणे रुग्ण सांगायचे.
पण "काहीही झालं तरी ही औषधं बंद करू नका। नाहीतर CD 4 count कमी होईल" असे डॉक्टरांनी सांगितले असल्याने दुष्परिणाम सोसत औषधी खाणे चालू होते।।
मनोवह स्त्रोतसाची विकृती ज्याच्यात आधिक त्याच्यात व्याधींचे बळ जोराचे होते . ज्याची मानसिकता स्थिर होती - वृत्ती सत्वप्रधान होती - खान पान उत्तम होते - झोप चांगली होती त्यांच्या आजाराचा जोर त्या मानाने कमी होता.
आयुर्वेदावर विश्वास ठेवून बारीक सारीक लक्षनानां आजीबाईचा बटवा उपयोगात आणणाऱ्यांची ताब्यात त्या मानाने चांगली होती। कडूचिरायता - गुळवेल - अश्वगंधा - मुरुडशेंग - सितोपलादी - त्रिफळा - सुंठ - कापूर आदी औषधी त्यांच्या वापरात होती।।
केलेल्या अभ्यासात एड्स व्याधी ग्रस्त लोकांत, आयुर्वेदात वर्णन केलेल्या ओजक्षयाची 92 % लक्षणे दिसली तर राजयक्ष्मा या व्याधीची 69% लक्षणे दिसली.
आयुर्वेद शास्त्रानुसारच्या संप्राप्ती - स्त्रोतस दृष्टी यांचा विचार करून एडस / H. I. V. ची चिकित्सा केली तर नक्कीच रुग्णाची जीवनशैली उत्तम करता येईल.
आहार - निद्रा - ब्रम्हचर्या हे त्रयोपस्तंभ,
दिनचर्या - ऋतूंचर्या पालन केले तर सुखायुही नक्कीच वाढेल असा पक्का विश्वास अभ्यासांती वाटला. त्यादृष्टीने आयुर्वेदात आणखी सखोल संशोधन होणे आवश्यक आहे।
*Dr Saurabh B. Kadam*
*M.D.(Ayurved), Pune* *आयुर्वेद उपचार व पंचकर्म चिकित्सक*
*Contact no 9665010500/7387793189*
*आप्तश्री आयुर्वेद व पंचकर्म क्लिनिक, दापोडी - पिंपळे गुरव रोड, शिवदत्त नगर, पिंपळे गुरव, पुणे 411061*
*Assistant Professor & Ayurved Consultant,*
*Dr D Y Patil College Of Ayurved & Research Center, Pune 411018*
Blog link:
December 1, 2022 ” आमच्या जगण्याला मान्यता द्या ।। “ # जागतिक एड्स दिन ।। Healthy Life With Ayurveda, आयुर्वेद सर्वांसाठी, आयुस्पर्श AyuSparsh by shriayurvedic...