Athshree Speciality Clinics

Athshree Speciality Clinics Athshree Speciality Clinics specialised in Psychiatric Treatments as well as provides Ayurvedic trea

12/06/2024

Patient case of PCOS and adenomyoma.
Ayurveda can do wonders.



27/07/2023
12/10/2022

भेसळयुक्त तेल त्यात रंग आणि परफ्यूम घातलेले #अभ्यंगतेल, लाकडाचा भुसा त्यात खोटा सुगंधी सुवास असलेले #उटणे घेण्यापेक्षा, वैद्यांनी अगदी योग्य तैल पाक विधी आणि उत्तम आयुर्वेदिक चुर्णांचा वापर केलेले अभ्यंग तेल आणि उटणे जरूर घ्या.

भेसळ नको आरोग्य मिळवा!





11/10/2022

Our venture Ved Essentials - वेद इसेंशियलस् presents Diwali Abhyanga Kits for all!

Customisation and bulk orders accepted.

Athshree's doctors at medical camp.
18/09/2022

Athshree's doctors at medical camp.

 #ऋतूचर्या
14/07/2022

#ऋतूचर्या


आषाढी एकादशीच्या निमित्ताने...आपण आपले पारंपरिक उपवासाचे पदार्थ विसरत चाललो आहोत. साबुदाणा, बटाटा हे उपवासाचे पदार्थ कुण...
11/07/2022

आषाढी एकादशीच्या निमित्ताने...

आपण आपले पारंपरिक उपवासाचे पदार्थ विसरत चाललो आहोत. साबुदाणा, बटाटा हे उपवासाचे पदार्थ कुणी ठरवले? कुठल्याही ग्रंथात, पोथीत, कहाणीत उपवासाला दूध आणि फळाच्या पुढे संदर्भ आढळून येत नाही.
त्यातल्या त्यात राजगिरा, भागर, रताळे हे आपले उपवसाचे पदार्थ उत्तम. त्यांचे health benefits पाहुयात.






Athshree Speciality Clinic

ऋतु आणि पंचकर्मआपल्या मनावर तसेच शरीरावर आजूबाजूच्या गोष्टींचा, पर्यावरणाचा फरक जाणवत असतो. वातावरणात झालेला बदल हा शरीर...
27/06/2022

ऋतु आणि पंचकर्म

आपल्या मनावर तसेच शरीरावर आजूबाजूच्या गोष्टींचा, पर्यावरणाचा फरक जाणवत असतो.
वातावरणात झालेला बदल हा शरीरावर पण परिणाम करतो.
शरीरात त्या त्या ऋतूनुसार ठराविक दोषांतही चढ उतार जाणवतात.
उदाहरणार्थ शरद ऋतूमध्ये पित्त वाढते. वात हा वर्षा ऋतु म्हणजे पावसाळ्यात वाढतो.

त्यामुळे पावसाळा आला, ढग आले की सांधेदुखी असणाऱ्यांना दुखणे वाढते, सांधे भरून येतात. या काळात पाचक अग्नी कमी होतो आणि पोटातही वात वाढल्याने अपचन, गॅसेस होतात.

जसे ऋतूनुसार दोषांचे बल कमी जास्त असते तसेच मग ऋतूनुसार पंचकर्म चिकित्सा सुद्धा ठरवली जाते.

उदाहरणार्थ पावसाळ्यात वातासाठी बस्ती आणि पित्तासाठी शरद ऋतूत विरेचन करतात.

पावसाळ्यात बस्ती कर्म खूप उपयक्त आहे. ज्यांची वात प्रधान प्रकृती आहे, ज्यांना वाताचे त्रास होतात जसे की सांधेदुखी,
हातापायात कंप येणे,
गोळे येणे,
गॅसेस, पोट साफ न होणे,
वाढलेले वजन,
अनियमित पाळी
या सर्व वातांशी निगडित विकारांमध्ये बस्ती करणे उपयुक्त ठरते.

पंचकर्म फायदे -
पचन सुधारते
metabolism वाढते,
हॉर्मोन्स सुधारतात,
त्वचेची कांती सुधारते,
शरीर तसेच मनालाही स्वस्थता लाभते,
पंचकर्म हे रसायन (rejuvenation) सारखे काम करते,
जुनाट व्याधींवर लवकर उपशय,
दोष स्वस्थानी आल्याने पुढे आजार उद्भवण्याचे प्रमाण कमी होते.

पंचकर्म हे इतके उपयुक्त असले तरी पंचकर्म करताना उत्तम वैद्यासोबत रुग्णाची उत्तम साथ गरजेची असते.
त्यामुळे पंचकर्म हे नेहमी तज्ञ वैद्यांच्या सल्ल्याने आणि त्यांनी दिलेल्या सूचना, पथ्ये पाळूनच करावी.

अथश्री स्पेशालिटी क्लिनिक मध्ये रुग्णाच्या प्रकृती परीक्षण, असलेले व्याधी त्यांची दोषानुरुप अवस्था या सगळ्याचा विचार करून पंचकर्म कुठले करावे, कधी करावे, करावे की फक्त औषधांनी आजार बरा होऊ शकतो हे ठरवले जाते आणि त्यानुसार रुग्णांना ट्रीटमेंट दिली जाते.

अथश्री स्पेशालिटी क्लिनिक
आयुर्वेद | मानसोपचार

जसे शारीरिक आजार असतात तसेच मानसिक आजारसुद्धा असतात. स्किझोफ्रेनिया हा त्याच आजारांपैकी एक आहे. हा एक प्रकारचा मानसिक वि...
25/05/2022

जसे शारीरिक आजार असतात तसेच मानसिक आजारसुद्धा असतात. स्किझोफ्रेनिया हा त्याच आजारांपैकी एक आहे. हा एक प्रकारचा मानसिक विकार आहे. हा विकार मेंदूच्या कार्यावर परिणाम करतो. यााबद्दल जागरूकता निर्माण करण्यासाठी दरवर्षी 24 मे हा "जागतिक स्किजोफ्रेनिया दिवस" म्हणून पाळला जातो. त्यानिमित्ताने जनजागृती करण्याचा उद्देश. हा एक गंभीर स्वरूपाचा आणि बर्याचदा दीर्घकाळ चालणारा मानसिक आजार आहे.

लक्षणे : किमान सहा महिन्यांकरिता १) भ्रम २) भास ३) विक्षिप्त वर्तन ४) विचित्र बोलणे ५) स्वमग्नता, एकलकोंडेपणा, खूप वेळ एकाच स्थितीत राहणे, अनासक्ती इ.

कारणे : डोपामिन रसायनातील बदल, अनुवांशिकता व इतर मनोसामाजिक कारणे.

उपचार : एंटीसायकाॅटीक गटातील गोळ्या, दीर्घ कार्य करणारी इंजेक्शन्स. अतितीव्र आजाराकरिता सुधारित विद्युत चिकित्सा(ECT), मानसोपचार, पुनर्वसन, कौटुंबिक व सामाजिक समुपदेशन.

स्किझोफ्रेनिया बद्दल चे गैरसमज:-
1: स्किझोफ्रेनिया असलेल्या रुग्णांना अनेक व्यक्तिमत्व विकार होण्याची शक्यता असते.
स्किझोफ्रेनियाशी संबंधित ही सर्वात लोकप्रिय मिथक आहे, परंतु तज्ञांच्या मते, ती खोटी आहे.

2: स्किझोफ्रेनियाच्या रुग्णांना आयुष्यभर औषधांची गरज असते. किती वेळ औषधे द्यायची हे विविध घटकांच्या आधारे मानसोपचारतज्ज्ञ ठरवतात. बरेच रुग्ण हळूहळू औषधांच्या वापरापासून मुक्त होतात आणि या आजाराची लक्षणे किंवा भाग पुन्हा कधीही दिसत नाहीत.

3: स्किझोफ्रेनियाचे रुग्ण अशक्त किंवा मूर्ख असतात. ही मिथक पूर्णपणे नाकारली जाण्याचे उत्तम उदाहरण म्हणजे प्रोफेसर जॉन नॅश, ते अर्थशास्त्रातील नोबेल पारितोषिक विजेते होते. उपचार न केल्यास, स्किझोफ्रेनियामुळे आकलनशक्तीवर परिणाम होऊ शकतो, परंतु तो एखाद्याला मूर्ख बनवत नाही किंवा त्यांची बुद्धी कमी करत नाही. असे लोक सुद्धा तुमच्या आणि आमच्याप्रमाणेच जगासाठी योगदान देऊ शकतात.

4: स्किझोफ्रेनियाचे रुग्ण हिंसक आणि धोकादायक असतात. स्किझोफ्रेनियाचे काही रुग्ण हिंसक असू शकतात, परंतु बहुतेक रुग्ण अहिंसक असतात. वास्तविक, स्किझोफ्रेनियाने ग्रस्त असलेल्या लोकांना अनेक आव्हानांना तोंड द्यावे लागते आणि त्यांना मानसिक आणि शारीरिक दोन्ही असह्य वेदनांना सामोरे जावे लागते.

डॉ. अर्चना पोफळे- मोहरे
मानसोपचार तज्ञ, पुणे

Address

CTS No. 1151, Laxmi Keshav Hsg Soc, Office No. 4 Ground Floor, Near Perugate Police Station, Sadashiv Peth Pune
Pune
411030

Opening Hours

Monday 10am - 9pm
Tuesday 10am - 9pm
Wednesday 10am - 9pm
Thursday 10am - 9pm
Friday 10am - 9pm
Saturday 10am - 9pm

Telephone

+918446372958

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Athshree Speciality Clinics posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share

Share on Facebook Share on Twitter Share on LinkedIn
Share on Pinterest Share on Reddit Share via Email
Share on WhatsApp Share on Instagram Share on Telegram

Category