
27/02/2025
Dheeraj Bhagwat: A Remarkable Journey from the Brink of Death
As his name suggests, Dheeraj (meaning patience) embodies resilience and unwavering determination. His steadfast confidence and will to live—for his child and for society—kept him going through an arduous battle. He placed his trust in the medical treatment he received, and what followed was a harrowing yet inspiring month-long journey of survival.
Overcoming Guillain-Barré Syndrome (GBS) requires immense patience, and Dheeraj Bhagwat exemplified just that.
The Onset of the Illness
Professor Dheeraj Bhagwat, aged 54, arrived at the hospital on the evening of January 28, 2025, at 6:30 PM, exhibiting symptoms such as fever, diarrhea, tingling sensations in his hands and feet, and general weakness. Although the attending doctor advised hospitalization, he opted for outpatient treatment and returned home. However, by 10:30 PM, his condition had worsened—he was unable to stand or walk, had severely slowed limb movement, and experienced difficulty breathing. His muscle strength was recorded at 3/5 in both upper and lower limbs.
Initially, he was admitted to a regular hospital room, but as his symptoms rapidly deteriorated, he was transferred to the ICU. The paralysis that began in his lower limbs soon spread throughout his body. Following nerve conduction velocity (NCV) testing and blood work, he was diagnosed with Guillain-Barré Syndrome (GBS). Under the expert care of Dr. Ramshyam Agarwal and Dr. Vikram Agalave, treatment commenced immediately. However, the situation quickly worsened—his breathing difficulties intensified, his oxygen levels dropped, his blood pressure fluctuated, and he was diagnosed with diabetes. Managing this condition in a patient with multiple comorbidities posed a significant challenge.
Despite the gravity of the situation, Dr. Ramshyam Agarwal closely monitored Dheeraj’s condition, and the dedicated team of resident doctors and nurses relentlessly fought to stabilize him. However, initial treatment responses were poor, and his health continued to decline.
A Critical Turning Point
By January 31, 2025, Dheeraj’s condition had reached a critical stage. Despite being on oxygen and ventilator support, his health remained precarious. The doctors faced the difficult decision of intubation, requiring consent from his family. His son, understanding the severity of the situation, placed his full trust in the hospital and granted permission for the procedure. At midnight, Dr. Gandhi Bhultagnya was called in to perform the intubation, but the oxygen levels continued to drop. With unwavering commitment, Dr. Gandhi left and returned in the middle of the night for another attempt. Yet, the deterioration persisted.
At 3 AM, Dr. Ram Agarwal was urgently contacted. Under his directives, crucial interventions were administered, and at last, Dheeraj’s oxygen levels began to stabilize—breathing new hope into the team and his family.
The Road to Recovery
With continued physiotherapy, his condition started to improve. Given the risks associated with prolonged intubation, Dr. Agarwal recommended a tracheostomy on February 8, 2025. This procedure facilitated better secretion management and eased his breathing. Gradually, he regained his ability to speak, and his dependence on ventilator support diminished. The medical team initiated on-and-off ventilator trials, and Dheeraj responded positively to treatment.
As days passed, his improvement accelerated. Ventilator support was discontinued, followed by a gradual withdrawal of oxygen assistance. By February 18, 2025, he was stable enough to be shifted to a general ward. Two days later, oxygen support was completely removed, and by February 22, his tracheostomy stitches were removed. As expected, he had made a full recovery, and soon, he was ready to be discharged.
The moment of discharge was a triumphant one—not just for Dheeraj and his family, but for the entire medical team at Vital Hospital. The perseverance displayed by both the patient and his son, along with the relentless efforts of the doctors and hospital staff, made this recovery possible. The unwavering dedication of Dr. Ramshyam Agarwal, Dr. Praveen Bhosale, Nirmal Sir, Snehal Ma’am, and the entire nursing team played a crucial role in this victory.
Understanding Guillain-Barré Syndrome (GBS)
GBS is not a newly discovered illness, but its prevalence in Pune has increased significantly. This autoimmune disorder is often triggered by infections such as diarrhea, colds, coughs, or fevers. The immune response inadvertently attacks the nerves, leading to progressive muscle weakness and paralysis. The condition typically manifests 15-20 days after the initial infection.
Symptoms begin with weakness in the lower limbs and gradually progress upward, affecting the respiratory and facial muscles. If untreated, patients may require ventilator support. Recovery is a slow process, as the protective nerve coating takes up to six months to regenerate. While younger patients stabilize more quickly, the disease progresses in the first two weeks and can be fatal in severe cases. Approximately 40-50% of affected individuals recover, while others either succumb to complications or suffer long-term disabilities. Early diagnosis, within 24-48 hours, significantly improves outcomes. The NCV test plays a crucial role in confirming the condition.
Treatment Options
IV Immunoglobulin Therapy – This treatment neutralizes harmful antibodies in the bloodstream, slowing the disease's progression.
Plasma Exchange (Plasmapheresis) – This procedure purifies the blood by removing the antibodies responsible for nerve damage. It typically requires 5-10 days of treatment, followed by extensive physiotherapy.
Contact Vital Multispecialty Hospital for More Information:
Dr. Ramshyam Agarwal
Directors:
Rahul Tilwani, Akash Tilwani
Administrator: Ravi Chavan Contact: 8830857982 / 8669664808
मृत्यूच्या दारातून परत आलेले धीरज भागवते.. नावाप्रमाणे धीरज (धीर ) पेशन्स, आणि खूप सारा आत्मविश्वास, मला माझ्या मुलासाठी, या समाजासाठी जगायचंय.. बास जी ट्रीटमेंट द्याल त्यावर विश्वास... आणि 1 महिन्याचा मरण यातनेचा प्रवास.. मौन पाळणे कठीण तर आहेच पण त्याचबरोबर जेव्हा शरीराची थोडी पण हालचाल करता येत नसेल तर जीव किती कोंडल्यासारखा होत असेल??
अशा परिस्थितीत येणाऱ्या संकटाचा सामना करत GBS सारख्या आजारावर मात करणारे धीरज भागवते.
प्रोफेसर असणारे धीरज भागवते वय वर्ष 54 हे 28/01/25 ला ताप, जुलाब, हातापायाला मुंग्या, आणि विकनेस अशी सुरुवातीची लक्षणे घेऊन सायकाळी 6:30 वाजता आले... आमच्या येथील डॉक्टर नी त्यांना ऍडमिशन चा सल्ला दिला परंतु त्यांनी ओपीडी बेसिस वर ट्रिटमेन्ट घेऊन घरी गेले.. रात्री 10:30 वाजता परत सेम लक्षणे आणि त्यात भर अधिक तर त्यांना उभे राहता येत नव्हते, चालणे, हातपायाची हालचाल मंदावली होती, श्वास घ्यायला त्रास जाणवत होता. Upper अँड lower limb मध्ये 3/5 पावर होती.. सुरवातीला रूम मध्ये शिफ्ट केले. पण हातापाया ची पावर आणि श्वास घ्यायला त्रास जाणवायला लागल्यावर त्यांना ICU मध्ये शिफ्ट केले.. दरम्यान च्या काळात पायापासून ची कमजोरी हातपाय आणी गळ्यापर्यंत येऊन थांबली.हॉस्पिटल मध्ये NCV आणि काही रक्ताच्या तपासणी केल्यावर GBS आजाराची लागण झाल्याचे निदान झाले Dr. रामश्याम अगरवाल आणि Dr. विक्रम आगलावे यांच्या मार्गदर्शनाखाली ट्रेंटमेन्ट ला सुरुवात झाली.. सुरुवातीच्या काळात पेशंट ची प्रकृती अधिकच बिघडत गेली. स्वतः श्वास घेता येत नसल्याने त्यांना ऑक्सिजन चा आधार दिला पण त्यावर धाप लागणे ऑक्सिजन saturation कमी होत होते,त्यात त्यांना ब्लड प्रेशर आणि त्यात भर म्हणून डायबेटीस पण डिटेक्ट झाला.. कॉमरॅमिड डिसिज मध्ये हा आजार थांबवणे म्हणजे एक आव्हान होते..पण अनुभव आणि नेहमी अपडेट असणारे डॉक्टर रामश्याम अगरवाल मिनिटा मिनिटाला पेशंट ची अपडेट घेत होते.. आणि रेसिडेंट डॉक्टर आणि नर्सिंग डिपार्टमेंट हे आव्हान जिंकायच्या दृष्टीने च प्रयत्न करत होते.. वेळ जात होती उपचार चालू होते.. पण प्रतिसाद सुरवातीच्या काळात मिळत नव्हता. याउलट परिस्थिती साथ देत नव्हती.
31/01/25 ला पेशंट ची कंडिशन अजूनच बिघडली. ऑक्सिजन, व्हेंटिलेटर सपोर्ट देऊन पण क्रिटिकल होत चालली होती. पेशंट वाचवणे त्यासाठी प्रयत्न करणे, त्यासाठी इंट्यूब्युशन करणे गरजेचे होते, नातेवाईकाना धीर देणे त्याच्या कडून शेवटचा पर्याय म्हणून संमती घेणे गरजेचे होते, पेशंट च्या मुलाला सर्व परिस्थिती समजावली, त्यात मुलाने धीर सोडला नाही.हॉस्पिटल वर विश्वास दाखवून संमती दिली. आता दवा आणि दुवा हाच पर्याय होता.मध्यरात्री डॉक्टर गांधी भुलतज्ञ् यांना बोलवून घेतले, इंट्यूब्युशन केले पण पण ऑक्सिजन लेवल वाढत नव्हती.. गांधी सर ना झोप येत नव्हती घरी जाऊन परत रात्री मध्यरात्री एक्सटूबूट करून इन्टीबुट केले पण परिस्थिती खालवत चालली होती.शेवटी रात्री 3 वाजता डॉक्टर राम अगरवाल सर ना मी कॉल केला त्यांनी काही ऑर्डर दिल्यावर ऑक्सिजन लेवल वाढलायला लागली. सगळ्याच्या जीवात जीव आला. पेशंट स्टेबल झाला.पुढचे काही दिवस फिजिओ देऊन पेशंट मध्ये सुधारणा सुरु झाली. इंटूबुशन जास्त दिवस ठेवणे रिस्की होते, डॉक्टर अगरवाल सर नी ट्रेकोस्टोमी चा सल्ला दिला कि ज्या मुळे पेशंट ला सेक्रेशन काढणे सोपे जाईल,8/2/2025 ला ट्रेकोस्टोमी केली पेशंट चा रिस्पॉन्स वाढला सोबत फिजीओ चालू ठेवले श्वास घेणे सोपे झाले.पेशंट ला बोलायला यायला लागले, व्हेंटिलेटर सपोर्ट कमी ऑन ऑफ ट्रायल सुरु केली, पेशंट उपचाराला प्रतिसाद द्यायला लागला. काही दिवसानंतर पेशंट चा व्हेंटिलेटर बंद करून ऑक्सिजन वर घेतला पेशंट मध्ये सुधारणा वाढली. ऑक्सिजन बंद करून ट्रायल सुरु केली. सुधारना वाढतच होती.. हात पाय ची कमजोरी कमी झाली.18/02/2025 ला पेशंट ला वॉर्ड मध्ये शिफ्ट केले.20/02 /2025 ला पेशंट चा ऑक्सिजन बंद केला पेशंट स्वतःहून स्टेबल झाला.22/2/2025 ट्रॅकोटोमी बंद करायला स्टिच घेतले. अपेक्षेप्रमाणे पेशंट बरा झाला.. आता वेळ आली पेशंट ला घरी सोडण्याची सगळी तयारी झाली. पेशंट चा डिस्चार्ज झाला.. ही खूप मोठी अचिव्हमेंट होती.. पेशंट ला ऍम्ब्युलन्स ने घरी सोडले. यात वायटल हॉस्पिटल स्टाफ डॉक्टर पेक्षा पेशंट आणि त्याचा मुलगा यांची जबरदस्त इच्छाशक्ती ला दाद द्यावी लागेल. कारण त्याचा 1महिन्या चा संयम कामी आला.. सर्व डॉक्टर, स्टाफ आणि पेशंट चा परिवार यांचे हे यश होते... डॉक्टर अगरवाल याचे यश डॉक्टर प्रवीण भोसले, निर्मल सर, स्नेहल मॅम, नर्सिंग स्टाफ यांची रुग्णसेवा खरंच हेवा वाटावी अशी च होती. ☺️
जीबीस हा काही नवीन आजार नाही,पण सध्या याचे बरेच रुग्ण पुणे शहरात आहेत.जुलाब सर्दी खोकला होऊन गेल्यावर जी प्रतिकारशक्ती तयार होते,ती अनावधाने रुग्णा च्या नसा ना इजा करते.मूळ आजार होऊन गेल्यानंतर 15-20 दिवसाने देखील हा आजार होऊ शकतो.नसा कमजोर झाल्यावर स्नायु चा प्यारीलिसीस होतो.त्यामुळे पायापासून वरती स्नायुची ताकद कमी होते.चेहऱ्याचे स्नायू,श्ववनाचे स्नायू कमजोर पडतात.अशा प्रकारे पायापासून वर ताकद कमी होते,हा खालून वर सरकत जाणारा आजार आहे.डोळ्याचे स्नायू कमजोर होतात. गिळायला त्रास होतो.श्वासनावर परिणाम झाल्यावर रुग्णाला व्हेंटिलेटर वर ठेवावे लागते.नसाच्या वरील कोटिंग त्यावर यायला बराच वेळ लागतो त्यात 6 महिने पण लागू शकतात.पहिले 2 आठवडे हा आजार वाढत जातो.त्यानंतर कमी वय असेल तर लवकर स्थिरावतो.100 मधील 40 ते 50 टक्के पेशंट बरे होतात.उर्वरित पेशंट हा आजार घेऊन जीव गमावतात. किंवा आयुष्य भर हा आजार घेऊन जगतात.पहिले 24 ते 48 तासात ह्या आजाराचे निदान झाले तर त्याच्यासाठी फायद्याचे असते.लक्षणा वरून आणि ncv टेस्ट करून निदान होते.दूषित पाणी आणि खराब अन्न यामागील हे कारण असते.
उपचार -या रुग्णाचे तातडीने निदान गरजेचे आहे.
1) त्यामध्ये पहिल्यादा आय वी इम्युनोग्लोबिलिन ने उपचार केले जातात. यामध्ये इंजेकशन ने नसामध्ये तयार झालेल्या अँटीबॉडी ला मारले जाते.त्यामुळे आजार वाढण्याचे प्रमाण कमी होते.
2) प्लाझमा थेरपी केली जाते.त्यात रक्ताचे शुद्धिकरन केले जाते.त्यातून अँटीबोडीज बाहेर काढले जातात या उपचारला 5 ते 10 दिवस लागतात.त्यानंतर phyisiotherpy दिली जाते.
अधिक माहिती साठी संपर्क - वायटल मल्टिस्पेसिलिटी हॉस्पिटल शी संपर्क करावा.
डॉ. रामश्याम अगरवाल सर
डायरेक्टर - राहुल तीलवाणी सर.
डायरेक्टर -आकाश तीलवाणी सर
रवि चव्हाण - ऍडमिनिस्टेटर
8830857982/8669664808