23/07/2025
वास्तुशास्त्र consultation and site visit अनुभव 22.07.2025
सकाळचे प्रसन्न वातावरण होतं. हलकीशी थंडी, स्वच्छ आकाश, आणि दूरवर डोंगरांच्या कुशीत लपलेला एक सुंदरसा ओपन प्लॉट – हेच आजच्या वास्तुशास्त्र भेटीचं ठिकाण होतं. मी आणि माझा एक जुनाच क्लायंट, श्री. परमार , त्यांच्या नव्या बंगल्या साठी निवड करण्यासाठी प्लॉटच्या वास्तुशास्त्रीय तपासणीसाठी तिथे पोहोचलो.
आधीच त्यांनी फोनवर सांगितलं होतं की, “सर, हा प्लॉट बघायला तुम्ही यायलाच पाहिजे. तिथली शांतता, निसर्ग, आणि ऊर्जा काहीतरी वेगळीच आहे.”
ते म्हणत होते, पण प्रत्यक्ष पाहिल्यावर मीही थक्क झालो. समोर खोल निळं आकाश, खाली हिरवीगार झाडं आणि दूरवर डोंगरांची रांग. या सर्व निसर्गाचं सौंदर्य म्हणजे मनाला मिळणारी एक गूढ ऊर्जा होती.
मी लगेच माझं कम्पास आणि वास्तु उपकरणं काढली. दिशांचं निरीक्षण सुरु झालं. उत्तर दिशा अगदी खुली आणि स्वच्छ – ही दिशा धन, यश, आणि उत्तम संबंधांसाठी अत्यंत शुभ मानली जाते. त्याच्या शेजारी, उत्तर-पूर्व दिशा – ईशान्य – ही दिशा अगदी नैसर्गिक उतारात, जिथून सूर्यप्रकाश अगदी सौम्य आणि सकारात्मक पद्धतीने घरात येऊ शकतो. ही दिशा आत्मिक शांती आणि आध्यात्मिक उन्नतीसाठी महत्त्वाची असते.
पुढे दक्षिण-पश्चिम आणि दक्षिण दिशा पाहिल्या. इथे नैसर्गिक उंचवटा असून, सुरक्षा आणि स्थैर्य यासाठी योग्य रचना करता येईल. या भागात मास्टर बेडरूम, मजबूत कंपाऊंड किंवा स्टोरेजसारखी जागा ठेवली तर व्यक्तीच्या आयुष्यात स्थिरता आणि आत्मविश्वास वाढतो.
परमार सर शांतपणे माझं विश्लेषण ऐकत होते. मी त्यांना स्पष्ट सांगितलं, “हा प्लॉट वास्तुशास्त्राच्या दृष्टीने अतिशय उत्कृष्ट आहे. यात चारही प्रमुख दिशा अत्यंत संतुलित असून, तुमच्या जीवनात समृद्धी, आरोग्य, मानसिक समाधान आणि स्थैर्य घेऊन येतील.”
ते हसले आणि म्हणाले, “सर, खरं सांगतो – प्लॉट पाहताच मन एकदम प्रसन्न झालं. पण आज तुमचं विश्लेषण ऐकून त्यावर बांधकाम करण्याचा निर्णय पक्का झाला.”
त्या क्षणी मला जाणवलं की, वास्तुशास्त्र फक्त घराची रचना नव्हे, तर ते जीवनशैली घडवण्याचं शास्त्र आहे. जेव्हा निसर्ग, दिशा आणि सकारात्मक ऊर्जेचं संगम एका जागेत मिळतो, तेव्हा ती जागा केवळ 'बंगल्यासाठी प्लॉट' राहात नाही – ती आपल्या आयुष्याच्या नव्या अध्यायाची सुरुवात बनते.
त्या दिवशी मी प्लॉट सोडताना फक्त एक सल्लागार नव्हतो – तर एका सकारात्मक बदलाचा साक्षीदार झालो होतो.
Call - 090211 63129
Call - 9579586818