05/12/2023
Hormonal Imbalance / हॉर्मोन्स असंतुलन
आजकाल अनेक महिलांना (Hormonal Imbalance) हॉर्मोन्स असंतुलनची समस्या दिसून येते. निरोगी आरोग्यासाठी होर्मोन्स नियंत्रित राहणे फार गरजेचे आहे. हॉर्मोन्सचे असंतुलन ही एक सायलेंट किलर समस्या आहे. कारण याचे परिणाम हळूहळू तुमच्या शरीरावर जाणवू लागतात. महिलांमध्ये या समस्येची अनेक लक्षणे दिसून येतात. मूड स्विंग, चिडचिडा स्वभाव, चेहऱ्यावर केस येणं, पिंपल्स येणं, अंग दुखणं, काम करण्याचा कंटाळा येणं, आळस येणं, दिवसभर निराश वाटणं, सेक्सची इच्छा नसणं ही या समस्येची लक्षणे असू शकता. वास्तविक महिलांच्या जीवनात प्रत्येक टप्प्यावर त्यांना हॉर्मोन्समधील बदलांना सामोरं जावंच लागतं. पौगंडावस्था, मासिक पाळी, गर्भधारणा, मॅनोपॉज अशा अनेक अवस्था महिलांच्या आयुष्यात येत असतात. या अवस्था पार पडल्यावर हॉर्मोन्स पुन्हा नैसर्गिकरित्या नियंत्रित होत असतात. मात्र सध्याच्या धकाधकीच्या काळात अनेक महिलांना हॉर्मोनल इमबॅलेंस या समस्येला तोंड द्यावं लागत आहे. कामाचा ताण, चुकीची जीवनशैली, काही विशिष्ठ आजार ही यामागची कारणे असू शकतात.
यासाठी याबाबत काही गोष्टी स्त्री आणि पुरूष दोघांनाही माहित असणं अत्यंत गरजेचं आहे. कारण योग्य उपचार आणि जोडीदाराची साथ असेल तर कोणतीही आरोग्य समस्या सोडवणं महिलांना सोपं जावू शकतं.
काही कारणांमुळे जेव्हा हे हॉर्मोन्स असतुंलित होतात तेव्हा महिलांना PCOS, PMS, अर्ली मॅनोपॉज अशा समस्यांना तोंड द्यावे लागते. एस्ट्रोजन (estrogen) च्या कमतरतेमुळे त्यांना थकवा, चिडचिड, नैराश्य अशा समस्या निर्माण होऊ शकतात. जीवनशैलीमध्ये थोडेसे बदल आणि योग्य आहार घेऊन तुम्ही तुमचे जीवन निरोगी करू शकता.
हॉर्मोनल असंतुलनाची लक्षणे (Hormonal Imbalance Symptoms)
अनियमित पाळी (Irregular Periods)
महिलांमध्ये मासिक पाळी अनियमित होण्याची अनेक कारणे आहेत. शिवाय वयाच्या प्रत्येक टप्पावर ही कारणे वेगळी असू शकतात. जर तुम्हाला वेळेआधीच दहा ते पंधरा दिवस मासिक पाळी येत असेल, उशीरा मासिक पाळी येत असेल तर तुमच्या हॉर्मोन्समध्ये बदल झाले असण्याची शक्यता आहे. या लक्षणांकडे दुर्लक्ष करू नका. यासाठी तुमच्या डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्या.
चेहऱ्यावर केस येणे (Facial Hair & Pimples)
काही महिलांच्या चेहऱ्यावर दाट केस येतात. हॉर्मोन्सच्या असंतुलनामुळे तुमच्या अंगावर केस येण्याची शक्यता आहे. काही वेळा यामुळे चेहऱ्यावरील तेलग्रंथी अधिक सक्रीय होतात आणि चेहऱ्यावर पिंपल्स येऊ लागतात. अशी लक्षणे जाणवल्यास तज्ञांचा सल्ला जरूर घ्या.
आळस आणि कंटाळा येणे (Laziness and Boredom)
हॉर्मोनल बदलांमुळे तुम्हाला सतत आळसवाणं आणि कंटाळवाणं वाटू शकतं. जर तुम्हाला शरीर जड झाल्यासारखं आणि काम करण्याचा कंटाळा येत असेल तर तुमच्या डॉक्टरांना याबाबत त्वरीत सांगा. प्रोजेस्टेरॉन आणि थायरॉईड ग्रंथीच्या अकार्यक्षमेतेमुळे तुमच्या शरीरात हे बदल जाणवत असतात.
मूड स्विंग (Mood Swing)
शरीरातील हॉर्मोन्सच्या बदलांमुळे तुमच्या स्वभावात बदल होतो. यामुळे तुमचा मूड सतत बदलत राहण्याची शक्यता असते. चीडचीड वाढल्यामुळे नातेसंबंध बिघडू शकतात.
वजन वाढणे (Weight Gain)
वजन वाढणं ही आजकाल प्रत्येकाची समस्या झाली आहे. पण जर तुमचं वजन अचानक वाढलं असेल तर त्यामागे तुमच्या शरीरातील हॉर्मोन्सचे असतुंलन हे देखील एक कारण असू शकतं.
भुकेवर परिणाम (Hunger Problem)
हॉर्मोनल बदलांमुळे तुमच्या भुकेवर विपरित परिणाम होत असतो. हॉर्मोन्समध्ये झालेल्या बदलांमुळे कधी कधी अती भुक लागणे तर कधी कधी खाण्याची इच्छा न होणे ही दोन्ही लक्षणे दिसू शकतात.
सेक्सची इच्छा कमी होणं (Low S*x Drive)
शरीरात झालेल्या हॉर्मोन्सच्या बदलांमुळे तुमचा लिबीडो कमी होण्याची शक्यता असते. यामुळे तुमची सेक्स करण्याची इच्छा कमी होऊ शकते. ज्याचा विपरित परिणाम तुमच्या वैवाहिक जीवनावर पडू शकतो.
अकाली रजोनिवृत्ती (Premature Menopause)
हॉर्मोनल बदलांमुळे महिलांना वेळेआधीच रजोनिवृत्ती येऊ शकते. रजोनिवृत्ती अथवा मॅनोपॉज म्हणजे नैसर्गिकरित्या मासिक पाळी बंद होणे. सामान्यत: महिलांना चाळीस ते पन्नास या वयात मॅनोपॉजला सामोरं जावं लागतं. मात्र आजकाल बदलती जीवनशैली आणि हॉर्मोन्समध्ये होणारे असतुंलन यामुळे अर्ली मॅनोपॉज ही समस्या निर्माण झाली आहे. यामुळे कमी वयात रजोनिवृत्ती येण्याची समस्या सध्या महिलांना भेडसावत आहे.
गर्भधारणेमधील समस्या (Problems with Pregnancy)
हॉर्मोनल बदलांमुळे तुमच्या प्रजनन शक्तीवर विपरित परिणाम होतो. अनेक महिलांना हॉर्मोनल बदलांमुळे वंधत्वाला सामोरं जावं लागू शकतं.
हॉर्मोन्स असंतुलन होण्याची कारणे (Hormonal Imbalance Causes)
चुकीची जीवनशैली (Unhealthy Lifestyle)
आजकाल जीवनशैली वेगाने बदलत आहे. कामाचा ताण - तणाव, कौटुंबिक समस्या, दैनंदिन जीवनात येणारी आव्हानं यामुळे तुमच्या हॉर्मोन्समध्ये बदल होण्याची शक्यता आहे.
अपुरी झोप (Lack Of Sleep)
कामाचा ताण आणि इतर जबाबदाऱ्या यामुळे संपूर्ण जीवनशैलीत बदल झाले आहेत. रात्री उशीरापर्यंत काम करणं, सतत कंप्युटरवर काम करणं यामुळे तुम्ही पुरेशी झोप घेत नाही. निरोगी आरोग्यासाठी कमीतकमी रात्री आठ तास झोप घेणं फार आवश्यक आहे. जर तुम्ही योग्य प्रमाणात झोप घेतली नाही तर त्याचा विपरित परिणाम तुमच्या हॉर्मोन्सच्या निर्मितीवर होतो. सहाजिकच त्यामुळे तुमच्या हॉर्मोन्समध्ये असतुंलन निर्माण होते.
अयोग्य आहार (Inappropriate Diet)
संतुलित आहार हा निरोगी जीवनाचा मुलमंत्र आहे. मात्र आजकाल जगाच्या वेगाने धावतान योग्य आहाराकडे पुरेसे लक्ष दिले जात नाही. सतत जंक फूड आणि पॅक्ड फूड खाण्याचा शरीरावर चुकीचा परिणाम होत असतो. ज्यामुळे तुमच्या हॉर्मोन्सच्या निर्मितीमध्ये बदल होतो.
नैराश्य (Depression)
नैराश्याचा तुमच्या संपूर्ण आरोग्यावर चुकीचा परिणाम होत असतो. कारण तुमच्या मनःस्थितीचा परिणाम तुमच्या शारीरिक आरोग्यावर त्वरीत परिणा्म दिसू लागतो. निराशाग्रस्त असल्यास तुमच्या शरीरातील हॉर्मोन्सची निर्मिती कमी होते. ज्यामुळे तुम्हाला हॉर्मोनल इंमबॅलेंसला सामोरं जावं लागू शकतं.
हार्मोन्स संतुलित करण्यासाठी पुरेशी झोप, योग्य आहार, योग, व्यायाम आणि आयुर्वेदिक उपचार आवश्यक आहे.
For more information Contact-8149687354