31/05/2026
#पंचकर्म कधी करावे? पंचकर्म कधी करू नये?
पांचभौतिक चिकित्सेतील #सुक्ष्मता हीच सुपरस्पेशालिटी
90चे दशकात पंचकर्माचा प्रभाव वाढत असताना त्यात अनेक #अपप्रवृत्तीची_घुसखोरी झाली. पंचकर्माच्या नांवाखाली निव्वळ #ऑईलमसाजस्टिमबाथशिरोधारा म्हणजेच पंचकर्मे असा गैरसमजच आजतागायत कायम आहे. त्यात केरलिय प्रकाराने कहरच केला व स्पा ने बरबटलेला कळसचं चढवला.
काही जिल्ह्यातून तर नस्य विरेचन बस्ती रक्तमोक्षण वर भर देत वमनासारखे मुख्य कर्म -पुर्वी झालेल्या चुकामुळे - हद्दपार केलं गेलयं.
प्रॅक्टिसच्या सुरुवातीच्या काळात सर्वच पंचकर्माचा प्रॅक्टिसमधे वापर असे
परंतु
गुरुकुलात त्यापलीकडे जाऊन पांचभौतिक चिकित्सेतील सुक्ष्मता सप्रमाण साक्षात्कार करूनच नजरेस आणून दिली गेली.
तेल हे वातावरील सर्वोत्तम औषध.
सांधेदुखी व सांध्यातून येणारा कटकट आवाज (सशब्दसंधी )- या कटकटीने त्रस्त रुग्ण.
ऑलपॅथीच्या ट्रिटमेंट नंतर काही महिने आयुर्वेदिय ट्रिटमेंट घेवूनही फरक नसलेने पंचकर्मे करूनसुद्धा म्हणजे स्नेहनस्वेदनबस्ती ने काही दिवस बरे वाटून पुन्हापुन्हा त्रास होतो म्हणून 2-3वेळा तीच पंचकर्मे करूनसुद्धा तो फरकही मिळणे बंद झालेले.
अश्यावेळी तो रुग्ण पांचभौतिक चिकित्सा घेण्यासाठी आलेला.
रुग्णपरिक्षणात अग्निमांद्य - सामता स्पष्ट दिसत होती
उदरपरिक्षणानुसार चिकित्सा करून 3महिन्यात उदरपरिक्षणात बरेच बदल झाले, रुग्णाचा अग्नि सुधारणा झाल्यानंतर - सामता नष्ट केल्यामुळे वेदना बंद झालेल्या परंतु कटकट आवाज बंद होत नव्हता मग तीच पंचकर्मे न करता फक्त त्यातील वातावर तेल महौषधी म्हणून तैलपान - तीलतैल - स्नेहपान - स्नेहन दिले
आता बरेचशे सांध्यातील कटकट आवाज बंद झाला परंतु पायाचे सांधेतील आवाज बंद होत नाही म्हणून #पार्थिवतैल स्नेहपान दिले - महिनाभरातच पायाच्या सांध्यातील कटकट आवाज बंद झाला
परंतु
जबड्याच्या सांध्यातील कटकट आवाज बंद होत नव्हता.
तेव्हा #आकाशीयतैल स्नेहपान दिले व पुढील महिनाभरातच जबड्याच्याही सांध्यातील कटकट आवाज बंद झाला.
#सामता असताना पंचकर्मे करू नये - असा स्पष्ट निर्देश आहेच म्हणून त्याच सामावस्थेत केलेली पंचकर्मे तेवढी फलदायी ठरली नाहीत
परंतु
सामावस्था नष्ट केल्यामुळे त्याच पंचकर्मातील फक्त स्नेहपान सुद्धा उत्तम रिझल्ट्स देवून गेले.
#सांधेदुखीवर वापरात असलेली नेहमीची व हमखासचं गुणकारी तैले - नारायण, माष, माषसैंधव, सहचर,वगैरे ची यादी केव्हाच मागे पडत गेली - मागील 15वर्षापासून सांधेदुखीवर अशी व्याधिप्रत्यानिक औषधे वापरून लाक्षणिक चिकित्सा करण्याची वेळ आली नाही.
फक्त तेल सुद्धा कितीप्रकारचे असू शकते याचा साक्षात्कारच समोर स्पष्ट दिसल्यामुळे पुढे त्यातील सुक्ष्मता वाढतचं गेली
आणि
फक्त आणि फक्त #रजनीतैल सुद्धा अनेक पंचकर्माचे काम करू शकते - याचा नित्यानुभव येवू लागला.
रजनीतैल हे #सर्वरोगनाशकतैल असल्याचा साक्षात्कारच पार्किन्सन च्या अनेक रुग्णात अनुभवला .
रजनीतैल ही वैद्यराज आ.वा. दातारशास्त्रीजींची खुप मोठी देणगी आहे - त्यातील सुक्ष्मता अनुभवास व प्रत्ययास येवू लागली की अनेक साक्षात्कारच होतात.
वैद्य दत्तात्रय माळी
पांचभौतिक सुपरस्पेशालिटी
लाईफस्टाईलमॅनेजमेंट
पुणे 97655 16755