19/02/2023
*आपण... We.... हम आणि जादू*
असंच एका बिझी शनिवारी एक तरुण जोडी माझ्या क्लिनिक मध्ये आली. Off course Love Marriage झालेलं होतं पण दोघेही अतिशय अस्वस्थ दिसत होते. कारण विचारलं तेव्हा ती बोलू लागली " माझंच चुकलंय सगळं.. मला पूर्ण कल्पना आहे याची.. पण मला हे सगळं नीट करायचंय. सुधारायचंय.. ते हरवलेलं नातं पुन्हा शोधायचंय.. Please help me.. " आणि ती रडू लागली. त्यालाही हे तिचं रूप नवीनच असावं कारण तोही तिच्या कडे आश्चर्याने पाहत होता.
ती डोळे पुसून पुढे बोलू लागली.. आम्ही इंजिनीरिंग च्या पहिल्या वर्षांपासून एकमेकांना ओळखतो, शेवटच्या वर्षी त्याने प्रपोज केलं, मी बराच वेळ घेऊन हो म्हणलं. वेळ यासाठीच घेतला होता की मी खूप independent आणि करिअर oriented मुलगी आहे, आपल्या जॉब वर प्रेम करणारी आणि कधीच जॉब नं सोडणारी पण तो अगदीच फॅमिली man आणि business वगैरे काहीतरी करू असा विचार करणारा.. सगळ्यांची काळजी घेणारा, स्वयंपाक येणारा, इमोशनल, प्रेमळ, कोणाच्याही मदतीला एका पायावर तयार असणारा.... Opposite poles attract each other... असं तर आपलं नाहीये नं? हा विचार आला मनात तेव्हा त्याला विचारलं मग म्हणाला... असुदे आपण करू manage.. होईल सगळं नीट.
मग मलाही उमेद वाटली, आमचं लग्न झालं, त्यानंतर काही महिन्यांनी तो गावी गेला..निमित्त होतं त्याच्या आईची तब्येत बरी नव्हती असं.. मग जॉब नको आता बिझनेस करतो असा विचार केला त्याने आणि गावी राहणं continue केलं. तो मधून मधून यायचा मला भेटायला. आमच्यातलं अंतर वाढतच गेलं. आम्ही राहात असलेल्या घराचं भाडं तोच द्यायचा पण मला काही पैसे हवेत का किंवा काही लागलं तर सांग असं काहीच विचारायचा नाही..आणि हा हे का विचारत नाही म्हणून मी रागाने त्याचाशी नं बोलणं किंवा त्याच्या कोणत्याच गोष्टीत इंटरेस्ट नं घेणं असं वागू लागले. मग तोही कमी बोलायला लागला. मग छोटया छोटया कारणांवरून भांडण व्हायला लागली.मग मला माझं स्वप्न पूर्ण करावं असं वाटायला लागलं.. ते म्हणजे परदेशात जॉब करण्याचं.. मी सगळी तयारी सुरु केली.. आणि काही महिन्यातच मला UK मध्ये जॉब ऑफर आली.. पॅकेज, कंपनी, काम, ठिकाण सगळं जुळून आलं, मग मी माझी पहिला जॉब सोडला, नोटीस पिरेड मधेच visa वगैरे सगळं केलं आणि जाण्याचं तिकीट बुक झाल्यावर त्याला सगळं सांगितलं. आधी काहीच सांगितलं नाही कारण मला असं वाटतं की काम होत नाही त्यामुळे सगळं fix झाल्यावरच त्याला आणि सगळ्यांना सांगितलं.. मी खूप खुश होते कारण ह्या गोष्टीसाठी मी खूप प्रयत्न करत होते आणि ती आता झाली होती. तोही खुश होता. मी तिकडेच होते.. काही दिवसांनी त्याने सांगितलं की मी पुन्हा जॉब करतोय आणि परत आलोय आपल्या घरीच राहतोय. मला बरंच झालं असं वाटलं. फार काही खोदून खोदून मिही विचारलं नाही.., त्यानेही सांगितलं नाही. मग आता 2 आठवड्याची सुट्टी घेऊन मी आले आहे तर आता अचानक हा म्हणतोय आपण डिवोर्स घेऊया... I am shocked... आधी मी चिडले त्याच्यावर, भांडले, ओरडले पण तो काहीच बोलला नाही.. मग खूप शांतपणे विचार केल्यावर मला काही गोष्टी समजल्या. पण त्याच म्हणणं आहे की आपण आता पुढे जायचं असेल तर Marriage Counseling करून मगच जाऊया... ती थांबली बोलायची.. आतून निराश झाली होती पण लग्न टिकेल तर केवळ याच मार्गाने असा विचार करून शांत बसली होती.
त्याच्याशी बोलल्यावर लक्षात आलं की ती कायम स्वतःचाच विचार करते, आजूबाजूची माणसं, परिस्थिती, काळ, वेळ याचं तिला काहीच भान नसतं. तिच्या ह्या self centered वागण्याचा त्याला कंटाळा आला होता आणि तो कुठेतरी आतून दुखावला गेला होता.
आपलेपणाची भावनाचं हरवून गेली होती. Generating Togetherness was a challenge...पण मग दोघांची मतं individually ऐकून घेऊन त्यांना एकत्र बोलावून घेतलं आणि आपल्यापुढे काय challenge आहे ते समजावलं आणि एक plan of action पण सांगितला.
दोघांचीही individual sessions सुरु झाली. काही दिवसांनी ती परत गेली. मग तिच्याशी ऑनलाईन बोलत होते ती म्हणाली मॅडम thank you.. आम्ही आता पूर्वी सारखेच बोलतोय अगदी तिथून निघताना त्याला सोडून जावसंच वाटत नव्हतं.. तोही खूप इमोशनल झाला होता.. मी म्हंटल वा छानच की.. मजेतच मी विचारलं काय खाऊ घातलंस त्याला.... काय जादू झाली so हा बदल झालाय? ती म्हणाली मॅडम तुम्हांला आठवतंय आपल्या पहिल्याच सेशन मध्ये तुम्ही सांगितलं होतं की तुमचा मुलगा शाळेतून घरी आल्यावर म्हणायचा की आई आपल्याला होम वर्क दिलंय.. ते इतकं लक्षत राहिलंय की आपण हा शब्द वापरायचा *मी* नाही....मला वाटतंय की ह्या शब्दाचीच ही जादू असावी.... तोही आता इकडे येण्याचा प्रयत्न करतोय, मीही सगळी नाती सांभाळायचा प्रयत्न करतीये, येण्यापूर्वी सासू सासर्यांना पण भेटून आले. खूप छान वाटलं मला आणि त्यांनाही... काय missing होतं ते कळलंय मला. Thank you so much for making me realise the situation and suggesting small tasks which helped us to make this relationship better.
हे ऐकून मला जे समाधान मिळाले ते शब्दात व्यक्त करणेच शक्य नाही. फक्त एवढेच प्रकर्षाने जाणवले.. *आपण*... We... हम या शब्दांची जादू!!!!!