14/04/2025
भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर आदरणीय व्यक्तिमत्त्व! केवळ पुस्तकी शिक्षण घेतल्याशिवाय समजणार नाही असं बहुआयामी व्यक्तिमत्त्व! 'शिक्षणाला प्रायोरिटी' हे त्यांचं अंत:करणापासून मानणं होतं. आपण हे नक्कीच लक्षात घेतलं पाहिजे की, जी व्यक्ती सातत्याने काहीनाकाही शिकण्याच्या प्रोसेसमध्ये असते, त्या व्यक्तीला मानवतेचं मूल्य नक्कीच कळतं...
शिक्षण म्हणजे काय, केवळ पुस्तकी शिक्षण का? पुस्तकं आणि पुस्तकाबाहेर शिकण्याची प्रवृत्ती म्हणजे शिक्षण असं मला सविनय सांगावसं वाटतं... प्रज्ञासूर्य डॉ.बाबासाहेब आंबेडकर आपल्या सगळ्यांचे !
माझ्या लहानपणापासून मी पाहते आहे, डॉ.बाबासाहेब आंबेडकर या विषयावर भांडणारी, वादविवाद करणारी काही माणसंही आपल्या सभोवताली तेव्हाही होती आणि आजही आहेत. जेव्हा जेव्हा मी हे सर्व पाहते तेव्हा वाटतं, ना त्यांना डॉ.बाबासाहेब आंबेडकर समजले, ना त्यांचा धम्म... "जय भीम" म्हटल्यानंतर भिंतीवर भिंती बांधणारेही खूप, लगेच जातीयवाद सुरू होतो. आधी इतकंच डोक्यात वादळ घोंघावत होतं, पण जसं जसं डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचं व्यक्तिमत्त्व उलगडत गेलं, समजत गेलं, तसं तसं माझ्या मनामध्ये त्यांच्या कार्य-कर्तृवाविषयी प्रचंड आदर आणि स्वतःमध्ये अजून अजून सुधारणा करण्याची इच्छा निर्माण झाली.
प्रामाणिकपणे सांगायचं तर,
डॉ. बाबासाहेब आंबेडकर माझ्या श्रद्धेची, हृदयाची संवेदना आहेत, आणि विचारांचा प्रेरणादायी
प्रकाशसुद्धा!
"महापुरुषांचा पराभव" हे वाक्य मला माझ्या वागणुकीतून कधीच सिद्ध करायचं नाही आणि त्यासाठी या सगळ्या महापुरुषांना एकच आदरांजली ती म्हणजे त्यांच्याच शब्दात सांगायचं तर, " शिका आणि त्या शिक्षणाचा समाजासाठी उपयोग करा..." आज त्यांना माझ्याकडून आदरांजली म्हणजे त्यांनी लिहिलेलं बुद्ध आणि धम्म पुस्तक वाचन... मला स्वतःला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व्हायचं कारण जसं भक्ती मार्गातून संत पद मिळते तसं ज्ञानमार्गातून देखील आणि संत कोण असतात ??? जे शुद्ध असतात ते संत असतात आणि ते सगळे तथाता आहेत.. डॉ आंबेडकरांनी ज्ञानाचा मार्ग सगळ्यांसाठी खुला केला त्यांच्या जिवंत उदाहरणाने.. शिक्षणाने माणूस फक्त प्रगल्भ होत नाही तर तो आधी माणूस होतो आणि तो शुद्ध होतो यावर माझा खूप खूप विश्वास आहे ..
भक्ती
Pic Credit - एकांच्या फेसबुक वॉल वरून हा फोटो ज्यांनी काढला असेल ते जर माहिती असेल तर कृपया मला नक्की सांगा.