10/10/2023
break the silence : कारण बोलणं आवश्यक आहे !
१० ऑक्टोबर जागतिक मानसिक आरोग्य दिन संपूर्ण जगभरात दरवर्षी साजरा केला जातो कारण मानसिक आजार काय आहेत त्यावर उपचार आहेत कि नाही असेल तर तो आजार ओळखायचा कसा आणि या मानसिक आजाराविषयी सामान्य माणसांना कळावं त्यांच्यातील मानसिक आजाराविषयीच्या गैरसमजांना दूर करता यावं यासाठी हा मानसिक आरोग्य दिवस अनेक पातळ्यांवर साजरा केला जातो .
आपण आपल्या शाररिक आरोग्याच्या बाबतीत फार सजग असतो . आपल्याला काही दुखापत झाली किंवा साधा ताप आला तरी आपण लगेच डॉक्टरांना गाठतो , मात्र आपल्या मनाला झालेली दुखापत आपल्याला कळूनच येत नाही , मन आजारी पडलय हे मुळात आपल्या लक्षातच येत नाही . आणि मग हळूहळू आपल्यातली मनाच्या आजाराची लक्षणे डोकं वर काढायला सुरुवात करतात .झोप लागत नाही , भूक लागत नाही , सतत उदास वाटत राहत , कामात मन लागत नाही , चिडचिड होते , कधी कधी मरणाचे विचार मनात येतात , सतत कसली तरी चिंता वाटत राहते , भीतीचे सावट सतत पाठीशी उभे असतात . आणि याही पेक्ष्या थोडं पुढे गेलं तर काही व्यक्तिंमध्ये दिसत ते आसमंध बडबड , डोळ्यांना आणि कानाला होणारे भास , विचारांचा नुसता गोंधळ ,
मानसिक आजार म्हटलं कि आपल्या डोळ्या समोर येते ती रस्त्यांवर बेवारस फिरणारे , अजागळ , फाटलेले कपडे,कचरा अंगावर घेणारे ज्यांना आपण वेडे म्हणतो , पागल म्हणतो . आणि ते होण्याचं कारण म्हणजे भूत बाधा , तंत्र मंत्र , जादू टोणा असं काहीस असतं असा पूर्वापार चालत आलेला आपला गैरसमज .
खरंतर मानसिक आजाराला आपण बळी पडतो त्याच मुख्य कारण म्हणजे ताण आणि आपले नकारात्मक विचार , आपल्याला आलेलं अपयश , कौटुंबिक कलह व जबाबदाऱ्या , नात्यांमधले गैरसमज , संपत चाललेला सुसंवाद , कामाचे अतिरिक्त ओझे.यातून ताण तणाव वाढत जातो आणि नैराश्य यायला सुरुवात होते , चिंता रोग जडतो अनिवार्य भीती उद्भवते , अनेक प्रकारची व्यसने जडतात , आणि यावर वेळेत उपचार मिळाले नाही तर आजार बळावत जातो , आजाराची तीव्रता वाढत जाते आणि व्यक्ती आपल्या वास्तविक जीवनापासून दूर जायला लागतो .
खरं तर आपल्या मनातले शल्य , दुःख आपण बाहेरच काढत नाही . आतल्या आता सगळा राग , चिडचिड दाबून ठेवतो . बऱ्याचदा लोक काय म्हणतील म्हणून आपण
आपल्याला हवं तसं वागतही नाही . त्याचा परिमाण म्हणजे आपल्या मनाचा डस्टबिन ओव्हरफ्लोव होऊन आपल्याला त्रासदायक ठरतो .
म्हणूनच आपण आपल्या मनाचं आरोग्य जपायला हवं , फार काही नाही नात्यानला टवटवीत राहता यावं साठी वेळ काढता यावा , मनाचा निचरा करण्यासाठी विचारांची आणि भावनांची देवाणघेवान करता यावी. स्वतःसाठी वेळ देता यायला हवा आणि स्वतःवर भरभरून प्रेम करता यायला हवं. रोज थोडा शाररिक व्यायाम आणि मेडिटेशन करायलाच हवं आणि प्रत्येक दिवशी मी आनंदी आणि समाधानी असल्याचं स्वतःच्या मनाला सांगता यायला हवं .
आपल्या शाररिक आजार बरोबरच आपले मानसिक आरोग्य सर्वांमध्ये टिकून राहण्यासाठी ते प्रत्यक्षात आणण्या साठी प्रयत्नशील राहुयात . मन स्वस्थ ठेवायचं असेल तर उपचाराची लाज बाळगू नका , भीती वाटू देऊ नका . मोकळे पानाने आपल्या समस्यांविषयी बोला , सदृढ मानसिक आरोग्यासाठी आपले पुढे पडलेले एक पाऊल सुद्धा सकारात्मक बदल घडवणारे असेल .
@ चारूशिला कडू क्लिनिकल सायकॉलॉजिस्ट
औंध , पुणे