06/11/2025
नमस्कार. अक्षदा ही विवाह पुनर्विवाह संस्था चालवताना खूप निरनिराळे अनुभव येत असतात. अलीकडेच एका अवघ्या 26 वर्ष वयाच्या मुलीचे समुपदेशन करण्याचा योग आला. मराठवाड्यातील एका तालुका प्लेस ला राहणारी ही मुलगी. तिच्या धाकट्या बहिणीने पळून जाऊन अंतरजातीय विवाह केला त्यामुळे ह्या मुलीवर प्रचंड बंधने घालण्यात आली. आई प्रार्थमिक शिक्षिका वडील शासकीय नोकरीत वरिष्ठ पदावर कार्यरत. ही दिसायला सुंदर अगदी कॉलेज क्विन म्हणायला हरकत नाही अशी. धाकट्या मुलीने पळून जाऊन लग्न केल्यामुळे या मुलीला नोकरी सोडून घरी बसवले गेले. तिच्या अनुभवाचा शिक्षणाचा आता तरी काही उपयोग नाही अशी स्थिती. ती त्रासलेली वैतागून गेलेली आणि पर्यायाने वाढत्या तणावlमुळे नैराश्यात गेलेली. अगदी अँटी डिप्रेशन च्या गोळया सुरु झालेल्या. एका आठवड्यात 3 सेशन counselling चे झाले तेही online. पण तिला धीर दिल्यामुळे समजून घेतल्यामुळे तिच्यात अपेक्षित बदल घडून आला. एका खोलीत स्वतःला कोंडून घेऊन बसणारी ही मुलगी आता सकाळी नव्हे तर पहाटे उठू लागली. अंगणात सडा घालून रांगोळी काढू लागली किचन मध्ये जाऊन निरनिराळे पदार्थ करू लागली. चांगली पुस्तके आईच्या शाळेतील ग्रंथालयातून मागवून घेऊन वाचू लागली. मग मी पालकांशी पण संवाद साधला त्यांनाही समुपदेशन केले आणि अती बंधन घातल्याचे दुष्परिणाम समजावून सांगितले. आता 1 डिसेंबर पासून तिला परत जॉब ला जायला परवानगी मिळाली आहे. धाकट्या बहिणीने प्रेम विवाह केला म्हणजे ही पण तोच कित्ता गिरवणार ही भीती पालकांच्या मनातील घालवण्यात मी यशस्वी झालोय. आई तर voluntary रिटायरमेंट घेण्याची तयारी करत होती त्या निर्णयापासून त्या माउलीला परावृत्त करण्यातही मी यश मिळवले. आता ही मुलगी काढलेल्या रांगोळीचे फोटो मला share करते. केलेल्या उत्तमोत्तम पदार्थ्यांचे फोटो काढून पाठवते. आता यथावकाश तिच्या साठी स्थळं बघायला सुरुवात करणार आहे. एखाद्या व्यक्तीला न भेटताही फक्त ऑनलाईन समुपदेशन सुद्धा किती परिणामकरक ठरू शकते याचा प्रत्यय आला.