Agrovet Solutions

Agrovet Solutions Wholesalers of veterinary medicines,feed suppliments

लिमिटेड स्टॉक...
26/08/2024

लिमिटेड स्टॉक...

19/03/2024
आज "ऍग्रोव्हेट सोल्युशन्स" ला चौदा वर्षे पूर्ण झाली. सर्व पशुपालकांचे, पशु वैद्यकीय अधिकाऱ्यांचे, सर्व कंपनी प्रतिनिधीचे...
11/10/2023

आज "ऍग्रोव्हेट सोल्युशन्स" ला चौदा वर्षे पूर्ण झाली. सर्व पशुपालकांचे, पशु वैद्यकीय अधिकाऱ्यांचे, सर्व कंपनी प्रतिनिधीचे तसेच माझ्या सर्व मित्रांचे व हितचिंतकांचे मनापासून आभार. असेच प्रेम, शुभेच्छा आणि आशीर्वाद असू द्यावे...... 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

ऍग्रोव्हेट सोल्युशन्स आता दत्तनगर चौक, आंबेगाव येथे...,... अवश्य भेट द्या 🙏🙏🙏
08/10/2023

ऍग्रोव्हेट सोल्युशन्स आता दत्तनगर चौक, आंबेगाव येथे...,... अवश्य भेट द्या 🙏🙏🙏

12/03/2023

पशुसंवर्धन विभागाच्या वतीने शिर्डी येथे देशातील सर्वात मोठे राष्ट्रीय स्तरावरील 'महापशुधन एक्पो-२०२३' दि. २४ ते २६ मार्च २०२३ या कालावधीत आयोजित करण्यात आले आहे.

यामध्ये देशाच्या विविध राज्यातील पशुधनांच्या शंभराहून जातींचा आणि पशुसंवर्धनासह कृषी, दुग्ध आणि मत्स्यव्यवसायासंबंधींचे शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी राष्ट्रीय स्तरावरील संस्थांचा आणि तज्ज्ञांचा सहभाग असणार आहे. तसेच देशी गोवंश संवर्धनासाठी नामवंत जातिवंत जनावरांसाठी बक्षिसे देखील ठेवण्यात आली आहेत.

या प्रदर्शनाच्या माध्यमातून देशी गोवंश संवर्धनाचे महत्त्व पटवून देवून देशी गोवंशामध्ये अनुवंशिक सुधारणा घडवून आणणे, सुशिक्षित बेरोजगारांना पशुपालनाद्वारे स्वंयरोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे आणि त्यायोगे ग्रामीण अर्थव्यवस्था बळकट करणे, दूध मांस अंडी उत्पादनास चालना देणे, जनावारांची उत्पादन क्षमता वाढवून उत्पादन खर्च कमी करणे, वैरण उत्पादनास चालना देणे, मुरघास हायड्रोपोनिक अझोला तंत्रज्ञान यासारख्या विषयांबाबत पशुपालकांना प्रात्यक्षिकांसह तज्ज्ञांकडून मार्गदर्शन करण्यात येणार आहे.

सुमारे ४६ एकरच्या विस्तीर्ण परिसरात संपन्न होणाऱ्या या प्रदर्शनात पशुधनासाठी ४५०, बचतगटांसाठी ६०, पशुसंवर्धन विषयक १०० आणि पशुसंवर्धन, कृषि विषयक बाबींच्या व्यावसायिकांसाठी १०० स्टॉल्स असणार आहेत. तसेच ६५ प्रकारच्या विविध पशुपक्ष्यांच्या जाती या प्रदर्शनात सहभागी होणार आहेत. नागपूर येथील महाराष्ट्र पशु विज्ञान व मत्स विज्ञान विद्यापीठासह राज्यातील चारही कृषी विद्यापीठांचा यामध्ये सक्रीय सहभाग राहणार असून या प्रदर्शनाच्या निमित्ताने पाच लाख शेतकऱ्यांचा सहभाग या प्रदर्शनात राहणार आहे.

या 'महापशुधन एक्स्पो ' मध्ये राज्यातील प्रत्येक जिल्ह्यासाठी स्वतंत्र स्टॉल्स देण्यात येणार असून त्या ठिकाणी संबंधित जिल्ह्यांनी त्यांची वैशिष्ट्ये असणारी माहिती प्रदर्शनाला भेट देणाऱ्यांसाठी प्रकाशित करावी असे सर्वांना आवाहन आणि जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी आणि पशुपालकांनी मोठ्या संख्येने या प्रदर्शनास भेट द्यावी ही विनंती.

19/02/2022

शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा....

सर्व गाडामालकांचे मनःपुर्वक अभिनंदन........ परत भिररररररररररर
16/12/2021

सर्व गाडामालकांचे मनःपुर्वक अभिनंदन........ परत भिररररररररररर

नवी जागा....नवे ध्येय.... नवी स्वप्ने........नवी ऊर्जा
19/11/2021

नवी जागा....नवे ध्येय....
नवी स्वप्ने........नवी ऊर्जा

06/10/2021
पशुपालकांना मिळतील पाच लाख रुपये, गोपाल रत्न पुरस्कार करिता करा आवेदन:तीन श्रेणीत मिळणार पुरस्कार - सर्वश्रेष्ठ दुग्ध उत...
27/08/2021

पशुपालकांना मिळतील पाच लाख रुपये, गोपाल रत्न पुरस्कार करिता करा आवेदन:
तीन श्रेणीत मिळणार पुरस्कार - सर्वश्रेष्ठ दुग्ध उत्पादक शेतकरी जो देशी गाईंचे पालन करत आहे, कृत्रिम गर्भादान टेक्निशियन, दुग्ध संघ/संस्था.
प्रथम पुरस्कार - ५ लाख रुपये
द्वितीय पुस्कार - ३ लाख रुपये
तृतीय पुरस्कार - २ लाख रुपये

गोपाल रत्न पुरस्कार करिता ऑनलाईन आवेदन करायचे आहे
https://gopalratnaaward.qcin.org/ या संकेस्थळावर करावे.

For transforming the entire ecosystem of awards conferred by the Government of India especially building credibility and trust by focusing on merit, objectivity, transparency..

24/07/2020

कारखानदार, व्यापाऱ्यांनो जरा शेतकऱ्यांचा आदर्श घ्या.

👉🏻 चार महिने *दुध देणारी गाय* शेतकरी ,... गर्भार व भाकड ...काळात १२ महिने सांभाळतो.

केवळ उन्हाळ्यात *फळ देणारा आंबा* ८ महिने सांभाळतो..
बैलाचे काम नांगरट,पेरणी , कुळवणी,वखरणी साठी हंगामी लागते , पण १२ महिने त्यांना सांभाळतो. त्यांचा खुराक चारा पाणी यामध्ये कधी भेदभाव नसतो..
दुष्काळ तर कायम पडतो , म्हणून कुणाचा खुराक चारा पाणी शेतकरी थांबवत नाही.. खरीप व रब्बी हंगामात विहीरींना पाणी असते ,
मजूराला खूप काम असते , पण उन्हाळ्यात विहीरीचे पाणी कमी होते .शेतात पीक नसतं ,म्हणून मजूरी अर्धी देत नाही.
कधीतरी दहा वर्षात एकदा शासन कर्ज माफी देते ..
पण शेतकऱ्याने मजुराला व जनावरांना वाऱ्यावर सोडल्याच्या घटना नाहीत. कारखानदार , व्यापारी तोट्यात धंदा आल्यास दिवाळखोरी जाहीर करतो, फर्म बंद करतो , नवीन फर्म चालू करतो. पण शेतकऱ्याच्या उताऱ्यावर बोजा असतो , त्याला व्यवसाय बदलता येत नाही...

दोन महिने लॉकडाऊन मध्ये कारखाने,दुकाने बंद काय राहीली तर जणू दुष्काळ पडला...
नोकर,पगार कपात ,
पुढे कामाचे तास वाढवणार .
मालक असावा तर बळीराजा सारखा. शासन, कारखानदार, व्यापारी सगळे शोषण करतात शेतकऱ्याचे, पण खरा राजा शेतकरीच..अरे एकदा करून पहा तोट्यात व्यवसाय, तुम्ही तर कामगारांचा जीव घ्याल.. कायम तोट्यात व्यवसाय करूनही दारातली भाकड गाय किंवा म्हातारं कुत्रं शेतकरी उपाशी मरू देत नाही.

*🇮🇳जय जवान*🌳🌴
*🇮🇳जय किसान*🌳🌴

Address

Ambegaon

Opening Hours

Monday 9am - 8pm
Tuesday 9am - 8pm
Wednesday 9am - 8pm
Thursday 9am - 8pm
Friday 9am - 8pm
Saturday 9am - 8pm

Telephone

9922435804

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Agrovet Solutions posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Practice

Send a message to Agrovet Solutions:

Share