Doctor Sneha Joglekar

Doctor Sneha Joglekar Sansneh Mind & Body Healing Center In collaboration with JSC Educational Trust we have started
POST

27/03/2022

********************************
*@ २६ मार्च @*
*जागतिक संगीतोपचार दिन*
********************************

आज जागतिक संगीतोपचार दिन !

संगीतोपचार एक स्वास्थ्यवर्धक उपाय. आजार, व्याधी शरीराला विळखा घालत आहेत, त्यावर बऱ्याचदा औषधांच्या मात्राही काम करीत नाहीत. संगीतात असणाऱ्या अनोख्या संमोहन शक्तीमुळे सध्या रोगांवर पूरक उपचार म्हणून संगीतोपचार लोकप्रिय होत आहे.

संगीत हे नेहमीच आनंद देणारं, मनःशांती मिळवून देणारं असतं. कोणतही काम करीत असताना एकीकडे गाणं चालू असलं कि काम चुटकीसरशी संपतं. कामाचा शीण तेव्हढासा जाणवत नाही.

सकाळच्या वेळी फिरायला जाताना कानात इयर-प्लग्ज घालून गाण ऐकत गाण्याच्या ह्रिदम बरोबर भराभर चालणारे लोक आजकाल खूप दिसतात. जिम मध्ये तालबद्ध गाण्यांच्या साथीने सगळे वर्कआऊट्स होत असतात. वशपींळीं च्या खुर्चीत मोठ्ठा ‘आ’ करून, तोंड बधीर करून बसलेले असताना आणि तिथून कधी एकदा सुटका होतेय त्या क्षणासाठी अधीर झालेले असताना जर का लरलज्ञर्सीपव मध्ये मंद, सुखद वाद्यसंगीत वाजत असलं तर आपलं लक्ष दुखण्यापासून थोडं दूर हटतं. अंगाई गीताच्या सुरांनी चुळबुळ करणारी छोटी बाळ चट्कन झोपेच्या आधीन होतात.

संगीत हे मनाला, चित्तवृत्तींना शांत करतं हे तर सर्वश्रुत आहे. पण संगीताचा उपयोग रोगनिवारणा साठी देखील करता येतो याबद्दल मात्र अजून फारशी कुणाला माहिती नाही. आपल्या वेदांपैकी सामवेदात संगीताबद्दल विस्तृत माहिती आहे. संगीत हे आयुर्वेदाचा देखील खूप जुना भाग आहे.

भारतीय शास्त्रीय संगीतात राग-समय चक्राची संकल्पना फार महत्वाची मानली जाते. त्या नुसार दिवसाच्या प्रहराप्रमाणे राग गायले जातात. जसे सकाळी गायचे राग म्हणजे भैरवचे प्रकार, तोडीचे प्रकार इ. दुपारी सारंगचे प्रकार, पटदीप, भीमपलास इ. संध्याकाळच्या रागामध्ये भूप, कामोद, यमनकल्याण वगैरे आणि रात्रीच्या रागामध्ये बागेश्री, मालकौंस, भिन्न षड्ज इ. रागाचा समावेश होतो.

आयुर्वेदात त्रिदोष म्हणजे कफ, पित्त आणि वात ही संकल्पना आहे. हे त्रिदोष आपल्या शरीरात असतात. त्यांचं प्रमाण हे व्यक्तीपरत्वे भिन्न असत. या दोषांचं प्रमाण हे नेहमी संतुलित असावं लागत. कोणताही एक दोष वाढला की आजार येतो. या दोषांच्या वेळा ठरलेल्या असतात. दिवसभरात दोन चक्रात त्या वेळा विभागलेल्या असतात. म्हणजे सकाळी ६ ते १० कफाचं प्रमाण जास्त असत. १० ते १२ पित्त आणि २ ते ६ वात. दुसऱ्या सायकलमध्ये ६ ते १९ कफ, १० ते २ पित्त आणि २ ते ६ वात.

ज्या वेळेला त्रिदोषांपैकी जो दोष वाढलेला असतो त्यानुसार रागाची निवड केली जाते (अर्थात तो राग त्या वेळी गायचा राग असतो). मात्र त्यात थोडा बदल करावा लागतो. म्हणजे एखाद्या स्वराची षीशाऊशपलू किंवा शपशीसू वाढवून तो राग गायला किंवा वाजविला गेला तर रोग निवारण होण्यास मदत होते.

राग विशिष्ट पद्धतीने वाजविला किंवा गायला तरच त्याचा परिणाम होतो एरवी त्याने नुसते मनोरंजन होते. शारंगदेवाच्या ‘संगीत-रत्नाकर’ या ग्रंथात याविषयीचे श्लोक आहेत. त्रिदोषांपैकी प्रत्येक दोषाचे पाच प्रकार आहेत आणि ते शरीरात वेगवेगळ्या ठिकाणी काम करतात. त्या नुसार राग बांधलेले आहेत.

आधुनिक वैद्यक शास्त्रात आता संगीतात असलेल्या रोगनिवारक शक्ती (हिलिंग पॉवर) बद्दल नवीन शोध लागत आहेत. संगीताच्या माध्यमातून उपचार करण्यासाठी आपल्या शरीरातल्या पेशींना कंपनाच्या साह्याने सचेत केलं जातं. या कंपनामुळे रोग्याच्या जाणीवेवर परिणाम होतो व त्याला आरोग्याचा लाभ होतो. त्या साठी रोगाचं अचूक निदान करून त्याला ऐकवण्यासाठी नेमक्या रागाची निवड करून तो किती वेळ आणि कोणत्या समयी ऐकायचा हे ठरवावं लागतं.

चेन्नईतील राग रिसर्च सेंटर सध्या भारतीय राग आणि त्यांचा रोग निवारणासाठी कसा उपयोग करून घेता येईल याबद्दल अभ्यास आणि संशोधन करीत आहे. या साठी संगीतज्ञ, डॉक्टर्स, मानसोपचारतज्ञ यांची एक टीम काम करते आहे.

मुंबईत प्रसिद्ध सतारवादक व संगीतकार पं.शशांक कट्टी (शांक-नील फेम) यांनी गेली अनेक वर्ष या संदर्भात अभ्यास व चिंतन करून डॉक्टर्स आणि आयुर्वेदाचार्य यांच्या बरोबर काम करून स्वतःची ‘सूर-संजीवन’ या नावाची एक उपचार पद्धती विकसित केली आहे. इच्छुकांना ते या विषयीच प्रशिक्षणही देतात. रोगनिवारणासाठी विशिष्ट रागांची निवड करून ते विशिष्ट पद्धतीने वाजवून त्यांनी अनेक सीडीजची निर्मिती केली आहे.

डोकेदुखी, पोट दुखी, संधीवात, असिडीटी, मधुमेह, कोलायटिस, यकृताचे विकार, अस्थमा, रक्तदाब, निद्रानाश, फिट्स अशा अनेक विकारावर संगीतोपचार फार उपयुक्त ठरत आहेत. अर्थात चालू असलेली औषध पूर्णपणे बंद करून चालत नाही. पण त्यांच्या जोडीने पूरक उपाय म्हणून ह्या उपचारांचा खूप फायदा होतो.

औषधांची मात्रा कमीकमी करीत पूर्णपणे बंद करून रोग बरा होऊ शकतो. नुसत करमणूकीचं साधन न रहाता आरोग्य सुधारण्यासाठी आता संगीताचा उपयोग करण्यात येतो आहे.

आधुनिक जीवनाचा परिपाक म्हणून निरनिराळ्या प्रकारच्या व्याधी वाढीस लागल्या आहेत. अ‍ॅलोपथिच्या मर्यादा लक्षात आल्यामुळे गेल्या अनेक वर्षापासून सुजोक, रेकी, प्राणिक हिलिंग इत्यादी अनेक पूरक वा पर्यायी उपचार पद्धती लोकप्रिय झाल्या आहेत. त्यांच्याच जोडीने आता येणाऱ्या काळात संगीतोपचार पद्धती लोकप्रिय झाली तर त्यात नवल वाटायला नको.

*संकलन : संजीव वेलणकर, पुणे*
*९४२२३०१७३३*
*संदर्भ : इंटरनेट/सुलोचना देवलकर*

*संकलन : मिलिंद पंडित, कल्याण*

********************************

18/03/2022

👏� 👏� 👏� 👏�

*"क्लँपिंग थेरपी,"*

देवाची आरती करताना असो किंवा उत्साहाच्या क्षणी टाळ्या या आपसुकच वाजवल्या जातात.

*मानवी शरीरात 340 प्रेशर पॉईन्ट्स असतात. त्यापैकी 27 हाताच्या तळव्यामध्ये आढळतात. असे Kairali Ayurveda group चे डॉ. राहुल डोग्रा सांगतात.*

त्या प्रेशर पॉईंटवर विशिष्ट दाब दिल्यास, मसाज केल्यास अनेक आरोग्यदायी फायदे मिळतात. अनेक वेदना कमी करण्यास मदत होते.

*क्लॅपिंग थेरपी – 😗
*खोबरेल तेल किंवा तीळाचे तेल हाताला लावून मसाज करा. ते हळूहळू त्वचेमध्ये शोषले जाते. दोन्ही हात एकमेकांवर ठेवा. ते डोळ्यासमोर ताठ ठेवा. खांदे थोडे सैलसर ठेवा. हा उपाय सकाळच्या वेळेस अधिक फायदेशीर ठरते.*

*सकाळच्या वेळेस 20-30 मिनिटं टाळया वाजवल्यास तुम्ही फीट आणि अ‍ॅक्टीव्ह रहाल. कारण टाळ्या वाजवल्याने रक्तप्रवाह सुधारतो. रक्तवाहिन्यांमधील अडथळे दूर होण्यास मदत होते. तसेच घातक कोलेस्ट्रेरॉलचा त्रासही कमी होतो असा सल्ला डॉ. डोग्रा देतात.*

*टाळी वाजवल्यानंतर कोणत्या 5 अँक्युपंचर पॉईंटला चालना मिळते 😗
1. Hand valley point
2. Base of thumb point
3. Wrist point
4. Inner gate point
5. Thumb nail point
या ’5′ पॉईन्ट्सला चालना दिल्यास खालील फायदे होतात-

1. हृद्याच्या आणि फुफ्फुसांच्या कार्याला चालना मिळण्यासाठी, त्यासंबंधी व्याधी कमी होण्यासाठी मदत होते. यामुळे अस्थमाचा त्रासही कमी होतो.

2. पाठीचे, मानेचे आणि सांध्यांचे दुखणे कमी होते.

3. गाऊट्च्या त्रासापासून सुटका मिळवण्यासाठी क्लॅपिंग थेरपी फायदेशीर ठरते.

4. लो ब्लड प्रेशरच्या रुग्णांना ही थेरपी फायदेशीर ठरते.

5. टाळ्या वाजवल्याने पचनाचे विकार सुधारतात.

6. क्लॅपिंग थेरपीमुळे लहान मुलांची आकलनक्षमता सुधारते. अभ्यासातील गती सुधारते.

7. क्लॅपिंग थेरपीमुळे मुलांचा मेंदू तल्लख होण्यास मदत होते.

8. क्लॅपिंग थेरपीमुळे शरीराची रोगप्रतिकारशक्ती सुधारते तसेच अनेक आजार दूर ठेवण्यास मदत होते.

9. मधूमेह, अर्थ्राईटीस, रक्तदाब, नैराश्य, डोकेदुखी, निद्रानाश,केसगळती, डोळ्यांचे विकार यासारख्या समस्या कमी करण्यासाठी क्लॅपिंग थेरपी मदत करते.

10. सतत एसीमध्ये बसणारे आणि काम करणार्‍यांमध्ये घाम येत नाही. अशा लोकांनी क्लॅपिंग थेरपी केल्यास रक्तप्रवाह सुधारतो. यामुळे शरीर शुद्ध होण्यास मदत होते.

*आज १८ मार्च**आज जागतिक निद्रा दिवस.*दरवर्षी १८ मार्च हा दिवस ‘जागतिक निद्रा दिवस’ म्हणून साजरा करण्यात येतो. या दिवशी न...
18/03/2022

*आज १८ मार्च*
*आज जागतिक निद्रा दिवस.*
दरवर्षी १८ मार्च हा दिवस ‘जागतिक निद्रा दिवस’ म्हणून साजरा करण्यात येतो. या दिवशी निद्रेविषयी आजारांची जनजागृती करण्यात येते. झोप न लागणे हा आजार आहे, याविषयी सामान्य जनता अनभिज्ञच आहे. त्यामुळे झोप न येणाऱ्या एकूण व्यक्तींपैकी फक्त एकचतुर्थांश व्यक्तीच झोप येत नसल्यामुळे डॉक्टरांकडे जाऊन उपचार घेतात. सर्व शारीरिक क्रियांप्रमाणेच झोप ही क्रियादेखील अत्यंत महत्त्वाची आहे. झोपेमुळे शरीराचे कार्य चांगल्या पद्धतीने होण्यास मदत होते. त्यामुळे प्रत्येक व्यक्तीने ६ ते ९ तास झोपणे आवश्यक असल्याचे अनेक मानसोपचारतज्ज्ञ डॉक्टर सांगतात. स्लीप हायजिन’ पाळणे आवश्यक असल्याचे म्हटले आहे. प्रत्येक मानवी शरीरात घड्याळ (बायोलॉजिकल क्लॉक) असते. हे घड्याळ सूर्योदय आणि सूर्यास्ताप्रमाणे सुरू असते. त्यामुळे सूर्योदयापूर्वी उठणे आणि सूर्यास्त झाल्यावर झोपणे ही शरीराची शिस्त आहे. त्यामुळे सकाळपासून सायंकाळपर्यंत शरीर विशिष्ट रसायने तयार करीत असते. त्यामुळे व्यक्ती जागी राहू शकते. सूर्यास्तानंतर शरीरातील विशिष्ट रसायने कमी झाल्याने झोप येऊ लागते. पण, कृत्रिम प्रकाशामुळे रात्री उशिरापर्य९४ाची सवय स्वत:च शरीराला लावल्याने अन्य आजारांना निमंत्रण मिळू शकते. रसायन प्रक्रिया बिघडल्याने शरीरावर परिणाम होत असतो. काही महिन्यांपूर्वीच सर्वोच्च न्यायालयाने शांत, पूर्ण वेळ, चांगली झोप हा मूलभूत अधिकार असल्याचे सांगितले होते. त्यामुळे झोपेकडे योग्य लक्ष द्यावे, असे तज्ज्ञांचे मत आहे.
हल्ली व्हॉट्सअप, फेसबुकसह विविध समाजमाध्यमांनी तरुणांसह सर्वच वयोगटातील नागरिकांना आपल्या कवेत घेतले आहे. रात्री उशिरापर्यंत ही माध्यमे सोबत बाळगल्याने रात्रीच्या झोपेवर त्याचा दुष्परिणाम होत असल्याचे निदर्शनास आले आहे. रात्री उशिरा झोपणे, सकाळी उशिरा उठणे, झोप अपुरी झाली तर दिवसभर आळसावणे, असे हे चक्र सलग पाच ते सात वर्षे राहिल्यास मधुमेह, रक्तदाबासह विविध आजाराचा गंभीर धोका ‘आ’ वासून आपल्यासमोर उभा राहणार हे एका अभ्यासातून पुढे आले आहे. प्रत्येक माणसाला रात्री किमान ८ तासांची गुणात्मक झोप आवश्यक असते. अशी झोप मिळाली नाही तर मधुमेह, रक्तदाब, यासह कर्करोगासारखे बरेच आजार जडण्याची शक्यता असल्याचे विविध अभ्यासातून पुढे आले आहे. जगभरात ३५ ते ४५ टक्के नागरिकांना निद्रानाशाचा आजार आहे. *आपल्या झोपेच्या चार अवस्था असतात.*
त्यात रेम अवस्था महत्त्वाची असून १, २, ३ आणि रेम या चारही अवस्थेचे चक्र ९० मिनिटांचे असते. एक व्यक्ती सरासरी ६ तास झोपली तर तिच्या झोपेची चार चक्र पूर्ण होतात. रेम अवस्थेत मेंदूतल्या पेशी उत्तेजित होतात. या अवस्थेत जिथे गरज आहे, तिथल्या भागात मेंदूची दुरुस्ती होते, परंतु हल्ली रात्री तरुण पिढीमध्ये व्हॉट्सअप, फेसबुकसह समाज माध्यमांचा वापर वाढला असून त्यामुळे त्यांच्या झोपेवर विपरीत परिणाम होत आहे. भारतात मध्यरात्री १२ ते ३ वाजेपर्यंत सर्वात जास्त गाढ झोपेची वेळ असते. यावेळी मेंदूत मिलॅटोनीम हार्मोन्सचे प्रमाण वाढते. या हार्मोन्समुळे झोप येते. या मिलॅटोनीमचा संबंध सूर्याशी असतो. सूर्यास्त झाल्यावर हे हार्मोन्स मेंदूत सक्रिय होतात, परंतु रात्री व्हॉट्सअप, फेसबुकचा जास्त वापर करणाऱ्यांमध्ये हे हार्मोन्स तयार होण्याचे प्रमाण मंदावलेले असते. साहजिकच अशा व्यक्तींमध्ये हळूहळू निद्रानाशाचा आजार बळावू लागतो आणि हेच चक्र सातत्याने पाच ते सात वर्षे सुरू राहिल्यास रक्तदाब, हृदय, कर्करोगासह सगळेच आजार बळकावण्याचा धोकाही वाढतो. शालेय विद्यार्थ्यांमध्ये शैक्षणिक स्पर्धा वाढली आहे. त्यांच्या शाळा, शिकवण्या याबरोबरच वाढलेल्या अभ्यासक्रमांमुळे त्यांची जीवनशैलीही बदलली आहे. तेव्हा या मुलांमध्ये निद्रानाशाचा आजार लहानपणीच सुरू होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
*झोपेची सायकल म्हणजे?*
झोपेच्या चार अवस्था असतात. त्यात रेम अवस्था महत्त्वाची असते. १,२,३ आणि रेम अशा ४ अवस्थांची एक सायकल होते. ही सायकल ९० मिनिटांची असते. पहिल्या ३ अवस्था ७० मिनिटांच्या आणि रेमची अवस्था वीस मिनिटांची असते. एक व्यक्ती जर सरासरी ६ तास झोपेल तर ४ सायकल पूर्ण होतात. रेम अवस्थेत मेंदूतल्या पेशी चार्ज होतात. जिथे गरज आहे, तिथल्या भागात या अवस्थेत मेंदू दुरुस्ती करतो. ही तंदुरुस्तीची नैसर्गिक प्रक्रिया खंडित होते. त्यामुळे आजार बळावततात, असे झोपेचे वैद्यकशास्त्र म्हणते. प्रत्येकाने किमान आठ तासांची आणि वयाची पन्नासी गाठलेल्यांनी किमान साडेसात तासांची झोप घेणे महत्त्वाचे आहे.

संदर्भ.इंटरनेट

31/01/2022
Try it
27/01/2022

Try it

22/01/2022

ॲक्युप्रेशर

ही पद्धत आपण सहज अगदी सोपी विना औषधी उपचार आहे आणी ती शिकल्यास स्वतः साठी अथवा कुटुंबासाठी वापरता येउ शकते. यातील सखोल ज्ञान घेतल्यास बरेचश्या आजारांवर आपणमात करु शकतो. मायग्रेन, सांधेदुखी, किडणी तसेच पोटाचे विकार , लठ्ठपणा, मनाचे आजार, सर्दी, कान दुखी व इतर अनेक आजार आहेत जे बरे होऊ शकतात.
यात चार प्रकार आहेत
१. शरीरावर बिंदु दाबन
२. हात व पायाच्या तळव्यांवर तेल अथवा क्रीम ने मसाज देउन लाकडाच्या किंवा क्रीस्टल च्या छोट्या काठी ने बिंदु दाबन
३. हाताला आजारानुसार सिड थेरपी देणे
४. कानावरच्या बिंदुंना योग्य प्रेशर देणे
सध्या सगळे अती औषधे, वारंवार बदलणारे हवामान, डॅाक्टरांच्या भरमसाठ फीज, यामुळे कंटाळलेला आहे.
ॲक्युप्रेशर हा घरच्या घरी करता येणारा उपचार आहे. योग्य बिंदु दाबन व मर्म स्थाने माहीत झाली कि आपण नक्की स्वतःला तसेच इतरांना देखील मदत करु शकतो. तसेच व्यवसाय म्हणुन ही छान आहे. घरातल्याघरात छोटेखानी क्लीनीक सुरु करता येउ शकते.
याचे लेव्हल १,२आणि ३ असे कोर्स आहेत. थेरपीस्ट साठी तिनही कोर्स अनिवार्य असतात तसेच रेग्युलर प्रॅक्टास मुळे चांगले करीयर ही घडवता येते.
अधीक माहीती साठी
मला संपर्क करु शकता
डॅा. स्नेहा जोगळेकर
संस्नेह माइंड ॲण्ड बॅाडी हिलींग सेंटर
शॅाप नं १०, साई सयाजी कॅार्नर,
वनाझ, पौड रोड, कोथरुड
९५२९५ १५४२८

https://youtu.be/jlZ5WaOCj60
07/01/2022

https://youtu.be/jlZ5WaOCj60

Pep talk by Dr Snehaa Joglekar JSC Educational Trust and Manu sena International tie ups for maharashtrian products made by smart sakhi

https://youtu.be/208BzXYMeFc
05/01/2022

https://youtu.be/208BzXYMeFc

women's day 2021 like, share, comment and Forward if you really like it.Business Enquiry mail: mastmumbai3118 .com...

 #कोथरुड  #पुणे येथे अत्यल्प दरात बाह्योपचार निसर्गोपचारातुनसंपर्क 9529515428/ 7821954465
23/12/2021

#कोथरुड #पुणे येथे अत्यल्प दरात बाह्योपचार निसर्गोपचारातुन
संपर्क 9529515428/ 7821954465

15/12/2021

At the outset, we must understand what we can gain out of this wonderful practice
At the physical level, yoga and its cleansing practices have proven to be extremely effective for various disorders. To get a sampling of how yoga benefits health disorders, please visit the Yoga Therapy section.

More importantly, yoga is extremely effective in:
Increasing Flexibility – yoga has positions that act upon the various joints of the body including those joints that are never really on the ‘radar screen’ let alone exercised.
Increasing lubrication of the joints, ligaments and tendons – likewise, the well-researched yoga positions exercise the different tendons and ligaments of the body.
Surprisingly it has been found that the body which may have been quite rigid starts experiencing a remarkable flexibility in even those parts which have not been consciously work upon. Why? It is here that the remarkable research behind yoga positions proves its mettle. Seemingly unrelated “non strenuous” yoga positions act upon certain parts of the body in an interrelated manner. When done together, they work in harmony to create a situation where flexibility is attained relatively easily.
Massaging of ALL Organs of the Body – Yoga is perhaps the only form of activity which massages all the internal glands and organs of the body in a thorough manner, including those – such as the prostate - that hardly get externally stimulated during our entire lifetime. Yoga acts in a wholesome manner on the various body parts. This stimulation and massage of the organs in turn benefits us by keeping away disease and providing a forewarning at the first possible instance of a likely onset of disease or disorder.
Complete Detoxification – By gently stretching muscles and joints as well as massaging the various organs, yoga ensures the optimum blood supply to various parts of the body. This helps in the flushing out of toxins from every nook and cranny as well as providing nourishment up to the last point. This leads to benefits such as delayed ageing, energy and a remarkable zest for life.
Excellent toning of the muscles – Muscles that have become flaccid, weak or slothy are stimulated repeatedly to shed excess flab and flaccidity.

Source Internet

Dr Snehaa Joglekar

15/12/2021

१० गोष्टी आरोग्याच्या !

१) सकाळी उठल्यावर पाउण इंच आल्याचा तुकडा चावून खाल्ला कि शरीराची अंतर्गत ताकद (stamina) वाढायला फार मदत होते !

२) सकाळी उठल्यावर खूप पाणी पिण्यापेक्षा एक फळ खा . रात्रभर दमलेल्या हृदयाला त्याने शक्ती मिळते !

३)दिवसभरात खूप पाणी पिण्याचा सल्ला काहीजण देतात . पण प्रमाणापेक्षा जास्त पाणी पिणे हे वृक्क (kindney) साठी धोकादायक आहे . अनावश्यक अति- अंबू (पाणी )- पान म्हणजे जास्त पाणी पिणे हे मधुमेह्सारख्या रोगाला निमंत्रण देण्यासारखे आहे ! दिवसभरात अडीच ते पावणेतीन लिटर पाणी शरीरास योग्य आहे !

४)हाडांची ताकद वाढण्यासाठी सकाळी आठच्या सुमारास शरीराचे सांधे उघडे करून कोवळ्या उन्हात बसले कि त्वचेखाली विटामिन डी तयार होते . ज्याच्या मदतीने शरीरात कॅल्शियम चे पचन आणि शोषण वेगाने व्हायला मदत होते . कोणत्याही बाजारातल्या गोळ्यांपेक्षा हा उपाय खुपच प्रभावी आहे !

५) रोज तीन ते चार तुळशीची पाने चावून खाल्ली कि शरीराची रोगप्रतिकारक शक्ती चांगली वाढते !

६) दुधातून हळद घेतली तर रक्तशुद्धी होते आणि शरीरातील घातक रोगजंतू मरतात.

७) दुधात एक चमचा सुंठ घालून ते उकळून घेतले कि असे दुध पित्त प्रकृतीच्या लोकांना चांगले पचते !

८) दुपारच्या जेवणानंतर ताजे आणि कमी आंबट ताक घेणे आरोग्यदायी आहे !

९) रोज आवश्यक तेवढा व्यायाम केला कि शरीराच्या अनेक तक्रारी कमी होतात !

१० ) सूर्यनमस्कार हा भारतीय उपखंडातील वातावरणासाठी उत्तम व्यायाम आहे !

वैद्य राहुल काळे .

13/12/2021

अहंकार टाळा
अहंकार ही एक मानसिक वृत्ती असते. अहंकारी मन हे नेहमी भूतकाळात असते. आपल्याशी कोण कसा वागेल, कुणी काय म्हटलं, त्याला कसे प्रत्युत्तर द्यायचे हेच अहंकारी मनात चालत असते. अहंकारामुळे जे समाधान मिळते ते क्षणभंगुर असते. अहंकारी मनात नेहमी माझ्यापेक्षा जास्त किंवा माझ्यापेक्षा कमी हेच चालत असते. एखाद्याने आपल्यापेक्षा जास्त किमतीची वस्तू खरेदी केली, की अनेकजण स्वतःचा अहंकार स्वतःच दुखवून घेतात.
तसेच मी चांगला, मला सगळे येते, सगळे कळते, मी जे बोलतो व करतो तेच बरोबर, बाकीचे सगळे अनाडी असे अहंकारी मनाला सतत वाटत असते. दुसरे कसे आणि कुठे चुकतात हे सांगितल्यावर अहंकार सुखावतो. अहंकारी मन दुसऱ्याला सतत खाली पाडते. कुणाला तरी दुखावले तर अहंकारी मनाला चांगले वाटते. मी कुणीतरी आहे, असा आभास त्याला होतो.

जागृत अवस्था आणि अहंकार या दोन्ही गोष्टी बरोबर राहू शकत नाहीत. जो अहंकारी असतो तो जागृत नसतो आणि जो जागृत असतो तो अहंकारी नसतो. कारण जागृत अवस्थेत माणूस चांगल्या रीतीने विचार तसेच विश्‍लेषण करू शकतो. अहंकारी मन हे सगळे काही वैयक्तिक घेते.
काही दिवसांपूर्वी मला एक "एसएमएस' आला. नारदाने भगवान विष्णूला विचारले, "पृथ्वीवर बहुतेक लोक दुःखी का आहेत?' तेव्हा भगवान विष्णू म्हणाले, "सगळ्यांकडे सगळे आहे, पण एकाचे सुख हे दुसऱ्याचे दुःख आहे. त्यामुळे जास्त लोक दुःखी आहेत.' अहंकार हा कधीच एखाद्याला सुखी राहू देत नाही. शक्‍यतो अहंकाराला दूर ठेवा. मानसिक स्वास्थ मिळवण्याचा हा एकच उपाय आहे.

डॅा स्नेहा

Address

501, Sai Ram Apts, Lokmanya Nagar, Above SUBWAY, Paud Road, Kothrud
Pune
411038

Opening Hours

Monday 10am - 8pm
Tuesday 10am - 8pm
Wednesday 10am - 8pm
Thursday 10am - 8pm
Friday 10am - 8pm
Saturday 10am - 8pm
Sunday 10am - 8pm

Telephone

+918484913301

Alerts

Be the first to know and let us send you an email when Doctor Sneha Joglekar posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Practice

Send a message to Doctor Sneha Joglekar:

Share

Share on Facebook Share on Twitter Share on LinkedIn
Share on Pinterest Share on Reddit Share via Email
Share on WhatsApp Share on Instagram Share on Telegram

Category