29/10/2024
यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ व बीव्हीजी इंडिया लिमिटेड दरम्यान विद्यार्थ्यांना "इंटर्नशिप- अप्रेंटिसशिप- ऑन जॉब ट्रेनिंग" संधींसाठी सामंजस्य करार
मुक्त विद्यापीठातील विद्यार्थ्यांना विविध उद्योगांमध्ये रोजगार संधी उपलब्ध व्हाव्यात यासाठी विद्यापीठाने व्यावसायिक शिक्षण व कौशल्य विकास विभागाचे गठण केले आहे. स्पर्धेच्या युगात पारंपरिक विद्यापीठातील विद्यार्थ्यांना अनेक संधी उपलब्ध होतात, परंतु मुक्त विद्यापीठातील विद्यार्थ्यांना निवड प्रक्रियेत प्राधान्य दिले जात नाही, त्यामुळे कौशल्य असून देखील हे विद्यार्थी विविध संधीपासून दूर ठेवले lजातात. यावर उपाय म्हणून नुकताच मुक्त विद्यापीठ व देशातील अग्रगण्य अशा बीव्हीजी इंडिया लिमिटेड या कंपनीत विद्यार्थ्यांना "इंटर्नशिप- अप्रेंटिसशिप- ऑन जॉब ट्रेनिंग" संधी उपलब्ध करुन देण्याविषयाचा सामंजस्य करार करण्यात आला. या अंतर्गत पहिल्या वर्षात ५००० युवकांना राज्य व केंद्र सरकारच्या विविध प्रशिक्षण योजनांद्वारे प्रशिक्षित करुन त्यांना शासनाकडून स्टायपेंड उपलब्ध करुन देण्यात येणार आहे.
मुक्त विद्यापीठाच्या वतीने या प्रसंगी कुलगुरू डॉ संजीव सोनवणे सर, प्र-कुलगुरू प्रा. बीसेन सर,व बीव्हीजीचे संस्थापक - अध्यक्ष श्री हणमंतराव गायकवाड यांच्या वतीने अप्रेंटिसशिप विभाग प्रमुख श्री रवी घाटे यांनी करारावर सह्या केल्या. निरंतर शिक्षण विभागाचे प्रमुख डॉ जयदीप निकम सर तसेच व्यावसायिक शिक्षण व कौशल्य विकास विद्याशाखाचे संचालक व नियोजन अधिकारी प्रा. राम ठाकर सर, वित्ताधिकरी डॉ गोविंद कतलाकुटे, परीक्षा नियंत्रक बी.पी.पाटील, BVG उत्तर महाराष्ट्र प्रमुख श्री बाळासाहेब कंक्राळे व अप्रेंटिसशिप विभागाचे विपणन प्रमुख श्री प्रमोद पवार , विद्यापीठातील विविध विभागाचे संचालक या प्रसंगी उपस्थित होते.
Pramod Vasant Pawar
BVG India Ltd Hanmantrao Gaikwad Satara Mega Food Park BVG Life Sciences Limited Health Care BVG AgroTech Private Limited BVG Life Sciences Ltd BVG AgroTech Private Limited Yashwantrao Chavan Maharashtra Open University