Chandra Nursing Home

Chandra Nursing Home Cancer Screening
Cancer Prevention work out for Woman
WOMEN'S HEALTH CARE.

01/03/2024
05/02/2024

Cervical Cancer : सर्वायकल कॅन्सर म्हणजे काय? हा रोग नेमका कशामुळे होतो? तसेच, यावर लक्षणं आणि उपचार काय? या संदर्भात अधिक माहिती जाणून घेऊयात.

* CERVICAL CANCER म्हणजे काय ?

मुळात गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग (Cervical Cancer) हा स्त्रियांमध्ये आढळणारा कर्करोग आहे. सुरुवातीला या कर्करोगाची कोणतीही लक्षणं आढळून येत नाहीत. पण, हळूहळू शरीरातून पांढरा स्त्राव होणे, योनीमार्गातून दुर्गंधी येणे, लैंगिक संबंधांनंतर रक्तस्राव होणे यांसारखी लक्षणं असतात. गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग (Cervical Cancer) हा स्त्रियांमध्ये चौथा सर्वात सामान्य कर्करोग आहे.

*सर्वायकल कॅन्सरची लक्षणं कोणती?
-अनियमित मासिक पाळी
-वजन कमी होणे
-गर्भाशयातून पांढऱ्या पदार्थाचा स्त्राव होणे
-वारंवार लघवीला होणे
-छातीत जळजळ होणे
-जुलाबाचा त्रास होणे
-भूक न लागणे किंवा जेवताना पोट भरल्यासारखे वाटणे
-खूप जास्त थकवा जाणवणे
-ओटीपोटात खूप वेदना होणे किंवा सूज येणे
-बऱ्याच वेळेस थोडा ताप येणे आणि सुस्त वाटणे
-शारीरिक संबंधांनंतर रक्तस्त्राव होणे
-मासिक पाळीदरम्यान जास्त रक्तस्त्राव होणे.

*अशी' घ्या काळजी
जर तुम्हाला सर्वायकल कॅन्सरपासून स्वत:चं संरक्षण करायचं असेल तर सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपल्या शरीराची योग्य काळजी घेणं. शरीर स्वच्छ ठेवणे.

नियमितपणे या रोगाशी संबंधित चाचण्या करणे

धूम्रपानाच्या अतिसेवनानेही सर्वायकल कॅन्सर होऊ शकतो.

सर्वायकल कॅन्सर अनेक प्रकारच्या एचपीव्हीमुळे होतो.

वरील प्रमाणे काही लक्षण आढळल्यास त्वरीत (स्त्रीरोग तज्ञ) डॉक्टरांशी संपर्क करा.

10/11/2022
20/10/2022

Happy Birthday Dear Sir 🎂🎉

महिलांच्या आरोग्याकडे लक्ष देणे आज खूप महत्त्वाचे आहे. कारण कुटुंबाची काळजी घेणारी महिला कायम आपल्या आरोग्याकडे दुर्लक्ष...
03/10/2022

महिलांच्या आरोग्याकडे लक्ष देणे आज खूप महत्त्वाचे आहे. कारण कुटुंबाची काळजी घेणारी महिला कायम आपल्या आरोग्याकडे दुर्लक्ष करते,ती जागृत व्हावी आणि समाजात हे त्यांच्या विषयी आरोग्याबाबत संवेदनशीलता निर्माण व्हावी हे गरजेचे आहे. आहार,चांगल्या सवयी,योगा आणि वैद्यकीय सल्ला या त्रिसूत्रीवर महिलांचे आरोग्य टिकणे आवश्यक आहे..ह्या धकाधकीच्या जीवनात महिलांनी कामासोबत आरोग्याकडे लक्ष देणे गरजेचे झाले आहे. स्त्रीयांमध्ये संधिवात, डायबिटीस, उच्च रक्तदाबाच्या तक्रारी वाढत आहेत.स्त्रियांचे मानसिक आरोग्य,जननसंस्थेचे आजार व कॅन्सर आणि रजोनिवृत्तीच्या वेळी होणारा त्रास आदीबाबत महिलांनी योग्य वेळेस काळजी घेतली तर अनेक महिला आपला जीव,प्राण वाचवू शकतात.

सरव्हायकल कॅन्सर अर्थात गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग हा भारतीय महिलांना होणारा, स्तनाच्या कर्करोगानंतरचा दुसऱ्या क्रमांका...
06/06/2022

सरव्हायकल कॅन्सर अर्थात गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग हा भारतीय महिलांना होणारा, स्तनाच्या कर्करोगानंतरचा दुसऱ्या क्रमांकाचा कर्करोग आहे. सरव्हायकल कॅन्सर आहे हे जर लवकरात लवकर लक्षात आले तर त्यावर यशस्वीपणे उपचार करणे शक्य आहे....हा कॅन्सर ह्युमन पॅपीलोमा व्हायरस या इन्फेक्शनमुळे होतो. धुम्रपान करणाऱ्या महिला, शारीरिक संबंध कमी वयात येणे, एका पेक्षा जास्त व्यक्तीशी शारीरिक संबंध असणे, जास्त प्रसूती होणे, गर्भरोधक गोळ्या जास्त वर्ष घेणे. साधारणपणे 35 ते 50 वयाच्या दरम्यान या कर्करोगाचे प्रमाण जास्त आढळून येते. गर्भाशयमुखाचा कॅन्सर होण्यापूर्वी १० ते २० वर्ष तो होण्याच्या स्थितीमध्ये असतो. लवकर निदान झाल्यास साध्या उपचारांनीही हा आजार बरा करता येतो म्हणुन सर्व विवाहित स्त्रियांनी पॅप स्मिअर नावाची टेस्ट नियमितपणे करून घेणे आवश्यक आहे.

जगभरात 28 may हा मासिक पाळी स्वछता दिन (menstrual hygien day ) म्हणून साजरा केला जातो .तर जाणून घेवु त्यामागचा उद्देश का...
28/05/2022

जगभरात 28 may हा मासिक पाळी स्वछता दिन (menstrual hygien day ) म्हणून साजरा केला जातो .
तर जाणून घेवु त्यामागचा उद्देश काय आहे तो... त्या दिवसात स्वछता कशी ठेवावी ? मासिक पाळीत होणारा त्रास व काय पथ्य पळल्यास हा त्रास कमी होऊ शकतो ...

गरोदर पणात thyroid चा होणारा त्रास व त्यासाठी उपयुक्त आहार जाणून घ्या....
17/04/2022

गरोदर पणात thyroid चा होणारा त्रास व त्यासाठी उपयुक्त आहार जाणून घ्या....

Address

Chandra Heights, Khadi Machine Chowk, Kondhwa Bk
Pune
411048

Opening Hours

Monday 10am - 1pm
6pm - 9pm
Tuesday 10am - 1pm
6pm - 9pm
Wednesday 10am - 1pm
6pm - 9pm
Thursday 10am - 1pm
6pm - 9pm
Friday 10am - 1pm
6pm - 9pm
Saturday 9am - 2pm

Telephone

+919326208383

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Chandra Nursing Home posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Practice

Send a message to Chandra Nursing Home:

Share