Anandvan De- Addiction & Rehabilitation Centre

Anandvan De- Addiction & Rehabilitation Centre Anandvan de-addiction centre is one of the active rehabilitaion and treatment centre in pune. Since

07/06/2025
यशस्वी सलग १५ वे वर्ष - कॉमन मॅन ने दिला 'दारू नको दूध प्या' संदेशआनंदवन व्यसनमुक्ती व पुनर्वसन केंद्राच्या वतीने आयोजन ...
31/12/2024

यशस्वी सलग १५ वे वर्ष - कॉमन मॅन ने दिला 'दारू नको दूध प्या' संदेश
आनंदवन व्यसनमुक्ती व पुनर्वसन केंद्राच्या वतीने आयोजन ः दुध वाटप करून दिला संदेश
पुणे: दारू नको दूध प्या, मानवतेचा बोध घ्या… बाटली फोडा, दूध जोडा... दारुचा पाश जीवनाचा नाश… दारु सोडा आनंद जोडा… अशा संदेश देत कॉमन मॅन च्या साथीने तरुणाईने व्यसनमुक्तीचा संदेश दिला. नववर्षाच्या पूर्वसंध्येला आनंदवन व्यसनमुक्ती केंद्र व महाविद्यालयीन तरुणाईने जनजागृती केली. नववर्षाचे स्वागत मध्य धुंद होऊन न करता चांगले विचार आणि संकल्प ठेवून करा असे सांगत दूध वाटप करण्यात आले.
डेक्कन जवळील गुडलक चौक येथे आनंदवन व्यसनमुक्ती व पुनर्वसन केंद्रातर्फे दारू नको, दूध प्या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. उपक्रमाला कात्रज डेअरी, मराठवाडा मित्र मंडळ कॉलेज आॅफ कॉमर्स आणि आपलं फाऊंडेशन यांनी सहकार्य केले. यावेळी केंद्राचे अध्यक्ष डॉ.अजय दुधाणे, दत्तात्रय सोनार, ऋषिकेश इंगळे,कृष्णा बाटाणे, विशाल शिंदे, सागर कांबळे, राहुल बॉम्बे, अनिरुद्ध आळंदी, संजय हिरवे, प्रकाश पवार, अमित शिंदे, कात्रज डेअरीचे चेअरमन बापू पासलकर, पांडुरंग कोंढाळकर, कुमार मारणे, मनोज लिमये, आपलं फाउंडेशनचे मनीष भोसले, अशोक टिहाळे, दीप गाठोळे, सिद्धी सावंत, एकता बोंबले, समृद्धी मैत्री, मराठवाडा वाणिज्य महाविद्यालयाचे दशरथ गावीत, प्रा. पुनम शिंदे, सिंहगड विधी महाविद्यालयाचे नितीन भंडारी, शंकरराव चव्हाण विधी महाविद्यालयाचे डॉ. गजेंद्र ढमाले यावेळी उपस्थित होते.
डाॅ. अजय दुधाणे म्हणाले, नवीन वर्षाचा पहिला दिवस हा अतिशय महत्त्वाचा असतो. या दिवसाची सुरुवात चांगले संकल्प करून करायला हवी. परंतु व्यसनाधीनतेचे वाढते प्रमाण बघता तरुणाई नवीन वर्षाचे स्वागत ही दारू पिऊन करताना दिसते. यामुळे व्यसनाधीनता वाढत जाते. नवीन वर्षाची सुरुवात चांगल्या पद्धतीने करावी आणि व्यसनाधीनतेची झालर नववर्षाच्या पूर्वसंध्येला नसावी यासाठी दूधाचे वाटप करून दारू नको दूध प्या हा उपक्रम राबविला जातो.
मराठवाडा मित्र मंडळ कॉलेज आॅफ कॉमर्समधील एनएसएसच्या विद्यार्थ्यांनी देखील सक्रिय सहभाग घेतला. तर दारु नको दूध प्या, हा संदेश देत दूध वाटप देखील केले.

नशामुक्त भारत साठी आनंदवन व्यसनमुक्ती केंद्राचे कार्य महत्वाचे*पुणे दिनांक 29/ 9 /2024 रोजी आनंदवन व्यसनमुक्ती केंद्र चं...
01/10/2024

नशामुक्त भारत साठी आनंदवन व्यसनमुक्ती केंद्राचे कार्य महत्वाचे*पुणे दिनांक 29/ 9 /2024 रोजी आनंदवन व्यसनमुक्ती केंद्र चंदन नगर पुणे ( IRCA )येथे केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री श्री मा.नामदार वीरेंद्र कुमार यांनी भेट दिली यावेळेस त्यांनी व्यसनमुक्ती. मध्ये उपचार घेत असलेल्या लाभार्थ्यास त्यांनी संवाद साधला यावेळी बोलताना भारत हा युवकांचा देश असून तो व्यसनापासून दूर राहिला तरच आपण सक्षम भारत घड़वू यासाठी आनंदवन सारख्या संस्था काम करीत आहेतच परंतु प्रत्येकानें आपण जबाबदार नागरिक मानुन समाजात चालू असनारे अंमली पदार्थ अवैध विक्री प्रशासना समोर आनली पहिजे . या प्रसंगी जिल्हा समाजकल्याण अधिकारी प्रवीण कोरगंटीवार उपस्थित् होते यावेळी मंत्रीमहोदय यांच्या हस्ते केंद्रात उपचार घेत असलेल्या लाभार्थीनी व्यसनावर आधारित हस्तलिखित मनोगत याचे प्रकाशन केले . पुणे आनंदवन व्यसनमुक्ती केंद्राचे अध्यक्ष डॉ. अजय दुधाने यांच्यासह संतोष पटवर्धन , विशाल शिंदे , केतन जैन , सूरज कांबळे , राहुल बाँबे , अनुपकुमार कुंडेतकर , कृष्णा बताने , सागर कांबळे, धैर्यशील हुलगे, डॉ.कमल गुप्ता आदी सर्व सहकारी उपस्थित होते यावेळी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन समुपदेशक ऋषिकेश इंगळे यांनी केले तर कार्यक्रमाचे आभार अध्यक्ष डॉ. अजय दुधाने यांनी मानले. सदर कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला .

26/09/2024

गणपती विसर्जन एक वियोग नाही तर एक नवा आरंभ आहे.बाप्पा तुझी कृपा सदैव आमच्यावर राहू दे…गणपती बाप्पा मोरयापुढच्या वर्षी लव...
17/09/2024

गणपती विसर्जन एक वियोग नाही तर एक नवा आरंभ आहे.बाप्पा तुझी कृपा सदैव आमच्यावर राहू दे…गणपती बाप्पा मोरया
पुढच्या वर्षी लवकर या… #सार्वजनिकगणपती

आज आमच्या आनंदवन संस्थेत गणपती बाप्पा विराजमान
07/09/2024

आज आमच्या आनंदवन संस्थेत गणपती बाप्पा विराजमान

सशक्त भारताचा एकच नारा आयुष्यात व्यसनाला देवू नका थारा..न काम का न काज कानशा हे दुश्मन जान काजब जागेगी ये आत्मा,होगा तभी...
27/08/2024

सशक्त भारताचा एकच नारा आयुष्यात व्यसनाला देवू नका थारा..न काम का न काज का
नशा हे दुश्मन जान का
जब जागेगी ये आत्मा,
होगा तभी नशे का खात्मा।
नशे को छोड़ो, रिश्ते जोड़ो।अशा घोषणा देत चंदननगर येथील आनंदवन व्यसनमुक्ती केंद्रामध्ये व्यसनमुक्तीची दहीहंडी फोडण्यात आली. व्यसन सोडा फुलेल जीवन, नशा छोडो बोटल तोडो, दिल पे नशा ये भारी है,
सबसे बड़ी बीमारी है।व्यसनमुक्त समाज घडवूया आनंददायी जीवन जगूया... अशा आशयाचे फलक दहीहंडीला लावण्यात आले होते. आनंदवनमध्ये एका नव्या आयुष्याची सुरुवात उत्साहाने करु, असा संकल्प सर्वांनी केला. आनंदवन व्यसनमुक्ती केंद्राचे अध्यक्ष डॉ. अजय दुधाणे यांच्या संकल्पनेतून या दहीहंडी चे आयोजन करण्यात आले होते. यासाठी संतोष पटवर्धन, सूरज कांबळे, ऋषिकेश इंगळे, धैर्यशील हुलगे , विशाल शिंदे, केतन जैन,सागर कांबळे , प्यांच्या पुढाकाराने हा उपक्रम पार पडला.डॉ.अजय दुधाणे म्हणाले, कोणत्याही प्रकारची अंमली पदार्थ सेवन किंवा नशा न करता देखील सण-उत्सवांचा आनंद घेता येतो. व्यसनाधिन तरुणांमध्ये सकारात्मक उर्जा निर्माण करण्याच्या उद्देशाने हा उपक्रम घेण्यात आला. व्यसनमुक्तीची दहीहंडी फोडून व्यसनांमुळे युवकांना व्यसनापासून दूर ठेवण्यासाठी प्रयत्न होणे आवश्यक राज्यात सर्वच थरांत वाढणारी व्यसनाधीनता पाहून समाजामद्धे एक व्यसनमुक्तिचा संदेश व जनजागृती व्हावी या उद्देशाने या माध्यमातून प्रयत्न करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. #नशामुक्तभारतअभियानआनंदवन

सामाजिकन्याय व विशेष सहाय विभाग आयोजित “ नशामुक्त भारत अभियानअंतर्गत “ विद्यार्थीवर्गसाठी व्यसन्मुक्तीवर व्याख्यान व जनज...
13/08/2024

सामाजिकन्याय व विशेष सहाय विभाग आयोजित “ नशामुक्त भारत अभियानअंतर्गत “ विद्यार्थीवर्गसाठी व्यसन्मुक्तीवर व्याख्यान व जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी समाजकल्याण विभागाचे सहायक आयुक्त श्री. विशाल लोंढ़े यांच्यसह अनेक शासकीय कर्मचारी उपस्थित होते. आनंदवन व्यसनमुक्ती केंद्राचे संतोष पटवर्धन, ऋषिकेश इंगळे, सूरज कांबळे , सागर कांबळे उपस्थित होते. युवकांचा अतिशय छान सहभाग या कार्यक्रमास लाभला. #नशामुक्तभारतअभियानआनंदवन व्यसनमुक्ती केंद्र संपर्क 091393 92828/9373763636

दारूच्या व्यसनामुळे अनेक घरे उध्वस्त झाली आहेत ! तुम्हालाही दारूच्या व्यसनातून कायमची मुक्ती हवी असल्यास आजच संपर्क करा....
28/06/2024

दारूच्या व्यसनामुळे अनेक घरे उध्वस्त झाली आहेत ! तुम्हालाही दारूच्या व्यसनातून कायमची मुक्ती हवी असल्यास आजच संपर्क करा. आनंदवन व्यसनमुक्ती केंद्र :- 9139392828
.

आज २६ जून आंतरराष्ट्रीय अंमली पदार्थ सेवन व अवैध वाहतुक विरोधी दिन जनजागृती कार्यक्रम@ FC रोड   - अंमलीपदार्थ विरोधी मोह...
26/06/2024

आज २६ जून आंतरराष्ट्रीय अंमली पदार्थ सेवन व अवैध वाहतुक विरोधी दिन जनजागृती कार्यक्रम@ FC रोड -
अंमलीपदार्थ विरोधी मोहिमेत सहभाग घेत तरुणाईने केली जनजागृती
आनंदवन व्यसनमुक्ती केंद्र, आपलं फाऊंडेशन च्या वतीने आयोजन : आमदार सिध्दार्थ शिरोळे यांचा सहभाग
पुणे : अंमली पदार्थांच्या विळख्यात तरुणाई मोठया प्रमाणात अडकत असल्याच्या अनेक घटना पुण्यामध्ये वारंवार समोर येत आहेत. याचा प्रसार रोखला नाही, तर संपूर्ण तरुण पिढी उध्वस्त होईल, त्यामुळे अंमली पदार्थाचे सेवन करु नका... अंमली पदार्थापासून दूर रहा... असा संदेश देणारे फलक हातात घेऊन तरुणाईने अंमलीपदार्थ विरोधी मोहिमेत सहभाग घेत जनजागृती केली. यावेळी त्यांनी से नो ड्रग्सचा संदेशही दिला.आनंदवन व्यसनमुक्ती व पुनर्वसन केंद्र, आपलं फाऊंडेशनच्यावतीने जागतिक अंमलीपदार्थ सेवन व अवैध वाहतूक विरोधी दिनानिमित्त जनजागृतीपर कार्यक्रमाचे आयोजन फर्ग्युसन महाविद्यालयाच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर करण्यात आले. यावेळी आमदार सिध्दार्थ शिरोळे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक स्वप्नाली शिंदे, आनंदवन व्यसनमुक्ती केंद्राचे अध्यक्ष डॉ. अजय दुधाणे, दत्तात्रय सोनार, विशाल शिंदे, ऋषिकेश इंगळे, संतोष पटवर्धन, सागर कांबळे तसेच आपलं फाउंडेशनचे मनिष भोसले, पवन जैनक, अंकित नाका, अथर्व नाईक, रजत श्रीवास्तव, गुरुप्रसाद रंधे, दैविक भालेराव, कार्तिक घाटगे आदी उपस्थित होते. आमदार सिध्दार्थ शिरोळे म्हणाले, आज दारुपेक्षा भयंकर व्यसनाच्या विळख्यात तरुणाई अडकत आहे. व्यसन लागणाºया गोष्टींची हल्ली सहज उपलब्धता होते, त्यामुळे त्याचा वापर सर्रास होत असल्यामुळे व्यसनाधीनतेचे प्रमाण वेगाने वाढत आहे. पुण्यात अंमली पदार्थांचे व्यसन हा आकर्षणाचा विषय आहे. ते आकर्षण कमी करण्यासाठी आपण प्रयत्न केले पाहिजेत. यासाठी प्रत्येक अभियानात आपण सहभागी होऊया, असेही त्यांनी सांगितले.
डॉ. अजय दुधाणे म्हणाले, पुण्यामध्ये अंमली पदार्थ सेवनाच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. गेल्या काही वर्षात अमली पदार्थ व्यसनांची दाहकता इतकी वाढली की, समउपदेशनाची सुरूवातही १४ ते १५ वयोगटातील मुलांपासून सुरू झाली आहे. त्याचबरोबर व्यसन करण्याचे विविध प्रकार देखील समोर येत आहेत. पुण्यातील तरुणाईमध्ये व्यसनांचे प्रमाण वाढत आहेच, त्याचबरोबर तरुणींमध्ये प्रमाण देखील वाढत आहे. तरुणाईला व्यसनाधीन होण्यापासून रोखण्यासाठी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते .

Address

Anandvan Deaddiction & Rehabilitaion Center
Pune
411014

Alerts

Be the first to know and let us send you an email when Anandvan De- Addiction & Rehabilitation Centre posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Practice

Send a message to Anandvan De- Addiction & Rehabilitation Centre:

Share

Share on Facebook Share on Twitter Share on LinkedIn
Share on Pinterest Share on Reddit Share via Email
Share on WhatsApp Share on Instagram Share on Telegram

Manovikas internet deaddiction & psychiatric treatment centre

Manovikas is the Anandvan's most Ambitious project ! Anandvan is providing counseling and treatment from last 10 years in Deaddiction sector! In this science and technologies world a new addiction is taking its place and its SCREEN ADDICTION ! This addiction is affecting almost all age groups, from small kids to senior citizens ! In this addiction TV, Mobile, Computers, Laptops are involved. In short we all are getting addicted to the internet! Because of this addiction we are wasting our valuable time. Why are we wasting our time? Why are we overusing it? Are we loosing our efficiency ? Are we entering into a virtual world? If you want answers for all of these questions then you must visit and get to know about Anandvan's Manovikas Internet De-addiction center. Visit our website to know more http://anandvan.org