15/03/2024
*धाराशिव जिल्ह्याच्या विकासाचा महामेरू: प्रा. डॉ. तानाजीराव सावंत साहेब.*
लोककल्याणकारी नेता, विकासाचा महामेरू म्हणजेच प्रा. डॉ. तानाजीराव सावंत साहेब. साहेबांचा जन्म एका सामान्य शेतकरी कुटुंबात झाला, शिक्षणाची प्रचंड गोडी असलेल्या साहेबांकडे आज इलेक्ट्रॉनिक इंजिनिअरिंगची पदवी असून त्यांनी पी.एच.डी देखील केली आहे. आता हे सगळं सांगण्यामागचे कारण म्हणजे, महाराष्ट्राचा राजकारणात फार थोडे लोक असे आहेत जे उच्चशिक्षित देखील आहेत व ज्यांची मातीशी नाळ जोडलेली आहे. सावंत साहेब हे त्यातलेच एक.
सावंत साहेबांकडे बघितलं की आश्वस्थ वाटतं. कारण एका सुशिक्षित, अभ्यासू आणि कष्टकरी वर्गाची जाणीव असणाऱ्या माणसाच्या हातात आपले नेतृत्व आहे. साहेबांचा प्रवास अगदी स्वच्छ आणि प्रामाणिक असा राहिलेला असून, तो आपल्या सर्वांपुढे जसा आहे तसा मांडतांना साहेब स्वतः देखील कधी संकोच करत नाहीत. पूर्व आयुष्यात काही काळ प्राध्यापक राहिलेल्या तानाजीराव सावंत साहेबांच्या बोलण्यात शब्दाला कायम सत्याची धार, आवाजात जरब आणि व्यक्तिमत्त्वात निर्भिडपणा दिसून येतो. साहेब जिथे गेले तिथे साहेबांनी सोनं केल्याचे आज संपूर्ण महाराष्ट्राने आपल्या डोळ्यांनी पाहिलंय.
साहेब प्रतिनिधित्व करत असलेला भूम परंडा वाशी हा मतदारसंघ महाराष्ट्रात दुष्काळी तालुका म्हणून ओळखला जात होता. मात्र या जिल्ह्यांमध्ये हरितक्रांती करण्यासाठी व दुष्काळाचा ठसा कायमस्वरूपी पुसण्यासाठी या तालुक्यात उदय झाला तो प्रा. डॉ. तानाजीराव सावंत यांचा. साहेबांनी आपल्या भूम परंडा वाशी मतदारसंघाला 'सुजलाम सुफलाम' करण्यासाठी शिवजल क्रांती आणली आणि ती यशस्वी देखील करून दाखवली. डॉ. तानाजीराव सावंत यांच्याकडे विकासाची मोठी दृष्टी असल्यामुळे भूम परंडा वाशीच्या विकासाचा गेल्या कित्येक वर्षाचा बॅकलॉग भरून काढण्यासाठी साहेब २४ तास परिश्रम घेत आहेत.
विकासाची गंगा खेचून आणायची असेल तर केवळ मतदार संघात वजन असून उपयोग नसतो तर सरकार दरबारी वजन असेल तरच कोणतेही काम तत्काळ मार्गी लागतं, हे साहेब मंत्री झाल्यापासून अनुभवायला मिळालं. गेल्या कित्येक वर्षांपासून प्रलंबित असलेला कृष्णा मराठवाडा सिंचन प्रकल्प व्हावा यासाठी साहेबांनी वेळोवेळी पाठपुरावा केला आणि या प्रकल्पासाठी साहेबांनी तब्बल ११ हजार ७०० कोटी इतका निधी खेचून आणला. साहेबांच्या या प्रयत्नामुळे आज या प्रकल्पाचे काम अंतिम टप्प्यात आले आहे.
या सिंचन प्रकल्पामुळे तब्बल १३३ गावामध्ये हरितक्रांती होणार आहे. परंडा, भूम, वाशी, कळंब, धाराशिव, तुळजापूर, उमरगा, लोहारा व बीड जिल्ह्यातील आष्टी या ९ तालुक्यातील एकूण ३३ हजार ९४५ हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येणार आहे. या भागातील शेतकरी कायम पोट जाळणाऱ्या दुष्काळाने होरपळून निघाला आहे. कधी पावसाअभावी, कधी अतिवृष्टीने तर कधी अवकाळी पावसाने या भागातील शेतकऱ्याच्या नशिबाची पार त्रेधा उडवली. शेतात राबण्याची, अहोरात्र कष्ट करण्याची हिंमत असलेल्या या भागातील शेतकऱ्याला कायम सतावणारा प्रश्न होता हक्काच्या पाण्याचा. ही पाण्याची गरज ओळखून या भागाला मराठवाड्याचे हक्काचे पाणी मिळवून देण्याचं काम आदरणीय सावंत साहेब करत आहेत. लवकरच आपल्या जिल्ह्यात या प्रकल्पाचं पाणी वाहण्यास सुरुवात होणार आहे. शिवजल क्रांती आणि कृष्णा मराठवाडा सिंचन आणून जिल्ह्यात खऱ्या अर्थानं हरित क्रांती आणण्याचे काम आदरणीय सावंत साहेबांनी केले असेच म्हणावे लागेल.
आरोग्यमंत्री म्हणून शपथ घेतल्यानंतर साहेबांनी धाराशिव जिल्ह्याचा चेहरा मोहरा बदलण्यासाठी जिल्ह्यात आरोग्याच्या अनुषंगाने विविध योजना आणल्या आहेत. आशिया खंडातला पहिला सुसज्ज असा फिरता दवाखाना साहेबांनी आपल्या धाराशिव जिल्ह्यात राबवला. इतकचं नाही तर साहेबांनी जिल्ह्यात आरोग्याच्या विकासासाठी मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून दिला. यामध्ये अनेक ठिकाणी प्राथमिक आरोग्य केंद्र, उपजिल्हा रुग्णालय उभारणी आणि अनेक रुग्णालयांचे श्रेणीवर्धन करण्यात आले. यामुळे गेल्या कित्येक वर्षांपासून आपल्या जिल्ह्यातील नागरिकांची उपचारासाठी होणारी पायपीट आता थांबली आहे.
राजकारण करत असताना साहेब सामान्य गोरगरीब जनतेच्या हितासाठी कायम आग्रही राहिले. कोणतेही पद असो, साहेबांनी एखादी गोष्ट ठरवली की साहेब ती पूर्ण करणार हे गणित ठरलेलं आहे. याचाच पुरावा द्यायचा तर, धाराशिव जिल्ह्यातील विकासकामे आणि राज्याच्या सक्षम आरोग्य यंत्रणेकडे बघितले की आपल्याला लक्षात येईल. आज विकसित जिल्ह्याला पुन्हा पुन्हा विकसित केल्याचे पुरावे देणारे लोक असताना साहेबांनी अविकसित अशा धाराशिव जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून पदभार स्वीकारल्यानंतर तेथील पाणी प्रश्न, बेरोजगारी, शेतकऱ्यांचे प्रश्न अशा मूलभूत प्रश्नांवर काम केले. २१ महिन्यात तब्बल ८५० कोटींचा निधी आज धाराशिव जिल्ह्यातील आरोग्य विकासासाठी साहेबांनी आणला. ही जिल्ह्याला मिळालेली मोठी उपलब्धी म्हणावी लागेल.
राज्याचे आरोग्यमंत्री या नात्याने गेल्या २१ महिन्यात जनतेच्या हिताचे तब्बल २२ निर्णय घेत यशस्वी अंमलबजावणी देखील केली. आज दुर्गम भागातील महिला आरोग्याचे बळकटीकरण, गर्भवती, ज्येष्ठ नागरिक, नवजात शिशू, तरुण अशा सर्व वर्गातील जनतेला सामावून घेणाऱ्या व त्यांच्या आरोग्यासाठी हितकारक असलेल्या योजना साहेबांच्या नेतृत्वाखाली राज्यभरात राबवताना आपण पाहिले आहे.
आरोग्य खात्याचे काम सांभाळणे ही मोठी जिकीरीची गोष्ट असून राज्याचा आरोग्यच्या गाडा सक्षमपणे चालविण्यासाठी योग्य निर्णय, यशस्वी व प्रभावी अंमलबजावणी, काटेकोर नियोजन, योग्य निर्णयक्षमता असणे अत्यंत गरजेचे असून साहेबांच्या अंगी हे सर्व गुण दिसून येतात.
साहेबांची एक शिकवण नेहमीच असते की, तुम्ही समोरच्या माणसाला त्याच्या पैशाच्या श्रीमंतीवरती तोलू नका, त्या माणसाचा स्वभाव आणि माणुसकी याच्यावरती किंमत ठरवा, कारण ते नेहमीच बोलतात पैशापेक्षा माणसाची श्रीमंती खूप मोठी आहे. आपण जितकी माणसं आपल्या सोबत जोडू तीच माणसं अगदी शेवटपर्यंत आपल्यासोबत राहणार आहेत. श्रीमंती आज असेल तर उद्या नसेल ह्या गोष्टी बदलत राहतात. पण प्रेमाने आणि आपुलकीने जोडलेली माणसं आणि त्यांच्या असलेल्या आशीर्वाद हे कधीच बदलत नाही. माणूस आणि माणुसकी हीच खरी श्रीमंती आहे साहेबांची हीच शिकवण प्रेरणा देणारी ठरते आणि साहेबांचा एक कार्यकर्ता म्हणून आम्ही ती जोपासत आहोत. त्यांच्या पावलावर पाऊल ठेवण्याचा आम्ही देखील एक प्रामाणिक प्रयत्न करणार आहोत.
असे लोकांच्या मनातले, दूरदृष्टी असलेले, संवेदनशील, कार्यकुशल व धडाकेबाज व्यक्तिमत्त्व असलेले आमचे लाडके नेते, आदरणीय प्रा. डॉ. तानाजीराव सावंत साहेबांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा! साहेब आपणास उदंड निरोगी आयुष्य लाभो हीच आई तुळजाभवानीच्या चरणी प्रार्थना!