MY.KrishnaNand

MY.KrishnaNand Nabhi Santulan and Fitness Personal Trainer. Relax spa therapy is designed as per an individual body, mind, intellect and spirituality.

Yoga Professional, Medical Yoga Therapist, Pranayam, Power Yoga Coach, Flower / Aroma Therapist, Dietician, Detoxification, Deep Tissue Massager, Thai & Swedish SME, Reflexology international school certified. The aesthetic medical yog beauty within. The Relax Spa Pune focus is on medical yog, massage in sports, business and organizations developed alongside athletics, medical yoga and joint movements . The self experience of body building over decades, Gym personnel trainer, Massager, Yoga Therapist and student of Medical Yog. पिंड पिंड में ब्रम्हांड!!!

20/12/2024

*पृथ्वीवरील सर्वोच्च गुरुत्वाकर्षण शक्ती अंथरुणात आहे...*
*सकाळी कितीही लवकर उठण्याचा प्रयत्न करा पण अंथरूण तुम्हांला खेचून ठेवते...* 🤣

28/08/2024

आवडल्यास पुढे सगळ्यांना पाठवा

16/07/2024

*भारत..* *फुकट्यांचा देश...*

भारत सरकार तथा राज्य सरकार यांच्या विविध योजनांचा अभ्यास करता भारत हा फुकट्यांचा देश होतो की काय अशी भीती निर्माण झाली आहे. जनतेला फुकट वाटा आणि सत्ता भोगा अशी परिस्थिती आज भारतात आहे. येथील जनतेला सुविधाही हव्यात पण वैयक्तिक स्वार्थ त्याहून मोठा. नेमकी हीच मानसिकता राजकारण्यांनी ओळखून फुकट वाटण्याचा सपाटाच लावला आहे.
एसटी बस मोफत केली. गरज नसताना लोक फिरत आहेत. परिस्थिती ही आहे की बसमध्ये पाय ठेवायला सुद्धा जागा नाही. निराधार योजना आणली पण चांगला भक्कम आधार असणारे लोक सुद्धा या योजनांचा भरपूर फायदा घेत आहेत. शेतकऱ्यांना शेत विमा, विविध सबसिडी, शेतकरी सन्मान निधी,विहीर, पंप, पाईप ,स्पिंकलर , म्हशी बकऱ्या..etc.. मोफत योजनांचा पाऊस पडत आहे.
पीएम आवास योजनेअंतर्गत मोफत घरे... मोफत आरोग्य पाच लाखापर्यंतचे आरोग्य विमे.. मोफत धान्य मोफत गोदाम... आता महिलांना लाडकी बहिण योजना... थोडक्यात काय तर मध्यमवर्गीय, नोकरदार, आणि टॅक्स पेयर सोडले तर एक घटक असा ठेवला नाही ज्याला फुकट काही मिळणार नाही. वरून जनतेची ओरड आहेकी पेट्रोल स्वस्त करा.. वस्तू स्वस्त करा... तिकडे शेतकऱ्यांना धान्याला अजून भाव हवा... इकडे जनतेला स्वस्ताई हवी.
ह्या योजना हव्यात पण खरोखर ज्याला गरज आहे त्यालाच. या योजनांचे दुष्परिणामही आता दिसत आहेत. काम करायला कुणी तयार नाही, कामावर मजूर मिळत नाही. शेतीच्या कामे निंदणी खुरपणीसाठी आधी स्त्रिया मिळायच्या... आता कदाचित त्याही कमी होतील. ग्रामीण भागात तर ही स्थिती आहे की महिन्याला हजार रुपये जरी कमावले तरी सर्व खर्च निभावतो कारण गोदाम मोफत किंवा कमी किमतीत मिळते. सबसिडीवर सिलेंडर मिळतात... वृद्धांना निराधार चे पैसे मिळतात, घर तर आधीच फुकट आहेत. यामुळे जनता कमालीची निष्क्रिय झाली, व्यसनी झाली. ग्रामीण भागामध्ये आता दारू पुरतेच काम करताना काही लोक दिसतात. ह्या योजनांनी जनतेचे भले व्हायचे असते तर गेल्या पन्नास वर्षातच झाले असते. कित्येक वर्षांपासून दारिद्र्यरेषेखाली असणारे लोक आजही दारिद्र्यरेषेखालीच आहेत. आजही ते तेच आयुष्य जगतात कारण त्यातून बाहेर निघण्याची मानसिकता सरकारने कधी निर्माण होऊच दिली नाही. सर्व काही मोफत किंवा आरामात बसून मिळत असताना उगीच कामाची दगदग करणार कोण. आता त्यांच्या डोळ्यात स्वप्नही निर्माण होत नाहीत. आधीच व्यसनाधीन असलेला बाप आजूबाजूला वातावरणही व्यसनाचे परिणामी या वर्गातील मुले शाळेत तेवढे लक्ष देत नाहीत आणि तरुण वयात तेही व्यसनाच्या अधीन होत आहेत. याचा ही सर्व्हे सरकार ने एकदा करायलाच हवा. पण राजकीय लोकांना याची काही देणं घेणं नसावे. या तरुण वर्गाला स्वतःकडे आकर्षित करत ते त्यांच्याच रॅलीची महफिल वाढवत आहेत. पण या फुकट खाऊ बरबाद पिढ्यांचे भविष्य काय. इतके दिवस फुकट घेऊनही हे लोक जर तिथेच असतील तर यांच्यावर होणारा खर्च निष्फळ वाया जात नाही का. टॅक्स भरणारा वर्ग रात्रंदिवस मेहनत करून कुटुंबाला चांगले आयुष्य देण्याचे स्वप्न रंगवत सतत कष्ट करत मिळालेला त्यांचा तो पैसा...आणि त्यातून भरला जाणारा टॅक्स हा देश चालवतो, मोफत बसून खाणारी जनता नव्हे. भारत हा जगातील सर्वात जास्त लोकसंख्या असणारा देश आहे, याचा अर्थ जगण्यासाठी, चांगल्या सुख सुविधांसाठी येथे बरीच स्पर्धा करावी लागणार आहे. असे असताना एवढ्या मोठ्या लोकसंख्येला जर फुकट वाटप होत असेल तर ही धोक्याची घंटा नक्कीच असणार आहे. इथे देश महत्त्वाचा की वैयक्तिक राजकीय स्वार्थ हे आता जनतेनेच ओळखणे आवश्यक आहे. हे असेच सुरू राहिले तर जनताच एक दिवस फुकट योजनांच्या विरोधात रस्त्यावर उतरेल. टॅक्स पेयर्स यांनी टॅक्स का भरावा, कारण ते कष्ट करून त्यांच्या कुटुंबाला आवश्यक असणाऱ्या सर्व सुविधा निर्माण करत आहेत. त्यांना कुठल्याच मोफत ची अपेक्षा नाही. मग त्यांचा कष्टाचा पैसा जर असा फुकट वाटला जात असेल तर त्यांनी टॅक्स का भरावा. कारण पैसा तसाही पाण्यातच जाणार आहे.

20/05/2024

पोस्ट दुसऱ्या कुणाची तरी होती मला आवडली म्हणून शेअर करतोय .
तुम्हाला आवडली तर जरूर शेअर करा.

*सर्व चार चाकी वाहनांच्या मालकाना आवाहन:*

जून महिन्यात आपण परगावी जाताना आपल्या गाडीत खालील गोष्टी सोबत असू द्या.
*१* . छोटा खड्डा घेण्यासाठी खुरपे, टिकाव किंवा जाड लोखंडी सळई.
*२* . गावराण आंब्याच्या कोयी, चिचोके, लिंबोळ्या, बदाम, सीताफळ, किंवा कोठल्याही बहुवर्षिय झाडांच्या बिया
*3* . प्रवासात टप्याटप्यावर गाडी थांबवा
*4* . रस्त्याच्या कडेपासून सुमारे ५-६ फूट दूर सोबत घेतलेल्या लोखंडी हत्याराने फक्त ४-५ इंच खोल खड्डे घ्या.
*5* . त्या खड्यात २ बिया टोचून खड्डा मातीने झाका. व माती थोडी दाबा.
*6* . सुमारे २५-३० फूट अंतरावर बिया टोचण्याचे कार्य रीपीट करा. To
(टीप: ८-१५ दिवसानंतर जरी पाऊस पडला तरीही जमिनीत गाडलेल्या बिया जास्त करून रूजतात.
( #टीप: स्वानुभवानुसार सर्वात जास्त 'चिंचोके' सोयीचे होते.)

झाले. पाऊस पडले की बिया रूजविण्याचे कार्य निसर्ग करेल. रस्ते ४-६ पदरी करताना काढावे लागलेले वृक्ष पुन्हा उगवतील. जास्तीत जास्त लोकांनी मनावर घेतल्यास वसुंधरा पुनश्च सुजलाम सुफलाम होईल. गरज आहे थोडीशी मेहनत घेण्याची.
*कार्बन कमी होवून उष्णता कमी होईल. सावली क्षेत्र वाढेल. पर्जन्यमान वाढेल. पर्यावरणाचा, सृष्टीचा अशाप्रकारे आपण विमा उतरवू शकतो.*
कल्पना आवडली असल्यास कृती करून सहभागी व्हावे.
*सर्व चार चाकी वाहनांच्या मालकाना आवाहन:*

जून महिन्यात आपण परगावी जाताना आपल्या गाडीत खालील गोष्टी सोबत असू द्या.
*१* . छोटा खड्डा घेण्यासाठी खुरपे, टिकाव किंवा जाड लोखंडी सळई.
*२* . गावराण आंब्याच्या कोयी, चिचोके, लिंबोळ्या, बदाम, सीताफळ, किंवा कोठल्याही बहुवर्षिय झाडांच्या बिया
*3* . प्रवासात टप्याटप्यावर गाडी थांबवा
*4* . रस्त्याच्या कडेपासून सुमारे ५-६ फूट दूर सोबत घेतलेल्या लोखंडी हत्याराने फक्त ४-५ इंच खोल खड्डे घ्या.
*5* . त्या खड्यात २ बिया टोचून खड्डा मातीने झाका. व माती थोडी दाबा.
*6* . सुमारे २५-३० फूट अंतरावर बिया टोचण्याचे कार्य रीपीट करा. To
(टीप: ८-१५ दिवसानंतर जरी पाऊस पडला तरीही जमिनीत गाडलेल्या बिया जास्त करून रूजतात.
( #टीप: स्वानुभवानुसार सर्वात जास्त 'चिंचोके' सोयीचे होते.)

झाले. पाऊस पडले की बिया रूजविण्याचे कार्य निसर्ग करेल. रस्ते ४-६ पदरी करताना काढावे लागलेले वृक्ष पुन्हा उगवतील. जास्तीत जास्त लोकांनी मनावर घेतल्यास वसुंधरा पुनश्च सुजलाम सुफलाम होईल. गरज आहे थोडीशी मेहनत घेण्याची.
*कार्बन कमी होवून उष्णता कमी होईल. सावली क्षेत्र वाढेल. पर्जन्यमान वाढेल. पर्यावरणाचा, सृष्टीचा अशाप्रकारे आपण विमा उतरवू शकतो.*
कल्पना आवडली असल्यास कृती करून सहभागी व्हावे.

Happiness is free. Don't wait for it.Live now & then.Krishna Palande कोकणी_tales कोकणा सारखी हिरवळ शोधून सापडायचि नाय Mi...
11/05/2024

Happiness is free.
Don't wait for it.
Live now & then.
Krishna Palande कोकणी_tales कोकणा सारखी हिरवळ शोधून सापडायचि नाय
Ministry of Ayush, Government of India Mahila Morcha BJP
INDIA ELECTION NEWS Marathi Mandal Italy "ऋणानुबंध"
Marathi mandal Abu dhabi Dubaikar Dadus मित्र मंडळ
Physio & Sports येवा कोकण आपलोच असां Goa Tourism Department
गोवा युवा महोत्सव- A Youth Revolution Goa Congress Yoga International The Gym Group

अक्षय्यतृतीयेच्या आरोग्यदायी शुभेच्छा.जेव्हा सुर्य एकाच दिवशी दोन तिथी पाहतो तेव्हा एका तिथीचा क्षय झाला असे समजतात. अक्...
10/05/2024

अक्षय्यतृतीयेच्या आरोग्यदायी शुभेच्छा.
जेव्हा सुर्य एकाच दिवशी दोन तिथी पाहतो तेव्हा एका तिथीचा क्षय झाला असे समजतात.
अक्षय म्हणजे ज्याचा क्षय होत नाही. वैशाख शुक्ल तृतीया या तिथीचा कधीही क्षय होत नाही, म्हणून अक्षय तृतीया असे म्हणतात.
आजच्या दिवशी केलेल्या संकल्पांचा कधीही क्षय होत नाही अशी अनुभुती आहे. आणि म्हणूनच आज भविष्याच्या दृष्टीने नविन संकल्प करा.
तुम्हा सर्वांना अक्षय्य तृतीयाच्या निरामय आरोग्य शुभेच्छा .💐
देव आपले बरे करो.
Courtesy - Krishna Palande
Mahila Morcha BJP Swami Ramdev INDIA ELECTION NEWS
Goa Tourism Department Goa Congress Physio & Sports
The Gym Group कोकणी_tales येवा कोकण आपलोच असां
कोकणा सारखी हिरवळ शोधून सापडायचि नाय
गोवा युवा महोत्सव- A Youth Revolution

09/05/2024
Bodybuilding motivation for years since childhood. During the life journey relaxation and emotional well-being is equall...
07/05/2024

Bodybuilding motivation for years since childhood. During the life journey relaxation and emotional well-being is equally important.
Mind building is required alongside body building.
Massage therapy is one of learning and journey for lifestyle.
During this week learning tips and tricks. Learning is never ending. Although one is certified with international recognition, the simple yet unique techniques are towards knowing unknown pleasure. From physical to deep tissues, cellular level. of a class Niramay Yogchikitsa Kendra

मान आणि सन्मान  #मानदुखी  #मानेमध्ये  #दुखी   आपल्या संभाषणात अनेक वेळा रूपक म्हणून वापरले जाते.CSP किंवा गोठलेल्या स्ना...
05/05/2024

मान आणि सन्मान
#मानदुखी #मानेमध्ये #दुखी

आपल्या संभाषणात अनेक वेळा रूपक म्हणून वापरले जाते.

CSP किंवा गोठलेल्या स्नायू, ग्रीवाच्या खांद्याचे दुखणे, बोट सुन्न होणे, अल्ना वैद्यकीय परिभाषा संदर्भात ही कथा वैद्यकीय योग (मेडिकल योग) प्रॅक्टिकल क्लासमध्ये सामायिक केली. सिद्धांत वर्गातील महत्त्वाची एक मणका संरचना समाविष्ट करण्यात आली होती आणि वैद्यकीय योग कर्षण #स्कंधबंधासन (पट्टा वापरून #शोल्डर ट्रॅक्शन) दोन प्रकारांचा विषय होता.

एक योग थेरपिस्ट म्हणून, तन इतिहास सोबत मन समजावून घेणे महत्वाचे आहे. साधक त्याच्या/तिच्या मनात काय आहे ते तुम्हाला सांगू शकत नाही. एक योग थेरपिस्ट म्हणून तुम्हाला वाक्य, ओळीं शब्दांमधून वाचण्याची, उमजून घेण्याची गरज आहे. वेदनांमागील भावना समजून घेण्यासाठी प्रत्येक वाक्य, शब्द महत्त्वाचा आहे, व्याधि (व्याधि).
व्याधी के आधि?
स्वीकृती महत्वाची आहे. गैर-स्वीकृती हे विकृती, वेदना होण्याचे एक प्रमुख कारण आहे.
व्याधि के आधी दुःख कसे होते?
शब्द मागे भाव आहे. शब्दों के पीछे भावना हैं. शब्द एक मन आहे. ध्यान से मन को जानना है.

एक रूपक म्हणून, ताईंनी ऑफिसची एक छान गोष्ट सांगितली आणि मी माझ्या ऑफिसच्या घटनेशी देखील जोडतो कारण मी 2022 मध्ये CSP वेदना सहन करत होतो आणि निरामय परीक्षण, निरीक्षण आणि उपचारांती यशस्वी पणें निरोगी झालो.

ऑफिसमध्ये ऑफिसमध्ये एक व्यक्ती डब्बा (टिफीन) आणते आणि लंच ब्रेकमध्ये सर्व पॅन्ट्रीमध्ये जेवतात.

एक दिवस सर्वांनी आपापले टिफिन उघडले आणि टिफिन वाटून घेतले. एकाने टिफिन उघडला आणि बटाटा भाजी होती. आलू की सब्जी?

दुसऱ्या दिवशी सर्व सहकारी जेवणाच्या वेळी जमतात. प्रत्येकाने टिफिन उघडला. टिफिन उघडला जातो आणि आलू की सब्जी? सहकाऱ्यापैकी एक
आज पण म्हणाले *आलू की सब्जी*? (जेवणासाठी बटाट्याची भाजी पुन्हा?)

तिसऱ्या दिवशी सर्वांनी टिफिन उघडला आणि तोच माणूस पुन्हा आलू की सब्जी असल्याची घटना. (बटाटा भाजी). भुवया उंचावतात, प्रतिक्रिया उमटतात.

तो ऑफिसमध्ये नवीन असल्याने, त्याच्या एका सहकाऱ्याने त्याला विचारले की त्याला आलू आवडत नसेल हे पत्नी, आचारीस सांगत नाही का? तुझ्या बायकोला सांगा की तू रोज आलू की सब्जी बनवू नकोस, तेव्हा त्या माणसाने उत्तर दिले की "मीच भाजी बनवतो."

पार्श्वभूमी समजून घेतल्याशिवाय प्रतिक्रिया अतीसामान्य आहे. एखाद्या माणसाच्या स्वतःच्या मर्यादा असू शकतात आणि टिफिनसाठी त्याच भाजी SUBZI ची वस्तुस्थिती त्याने स्वीकारली असेल. नकळतपणे तुलना, तुच्छता CONTEMPT. (अनावश्यक तुलना हे मनातील वेदनांचे कारण आहे.)

न्यायाशिवाय वस्तुस्थिती स्वीकारा. नो CONTEMPT.

जी व्यक्ती वस्तुस्थिती आहे तशी स्वीकारत नाही, हे मनातील दुःखाचे एक कारण आहे. हे कारण मानेच्या वेदनांमागे आहे.

आपल्या संभाषणात अनेकदा मानदुखीचा वापर केला जातो आणि बरेच जण शारीरिक संबंध समजून न घेता फक्त भावना म्हणून शब्द ऐकतात आणि त्याउलट प्रतिक्रिया देतात पण!

बोटांमधील सुन्नपणाचे आधुनिक विज्ञान एका विशिष्ट अवयव, क्षेत्रावर लक्ष केंद्रित करून निदान केले जाईल. ती म्हणजे हाताची बोटे, नसा, हात किंवा खांद्याच्या वेग चाचणीसह ULNA. एक संपूर्ण उपाय असताना, योग थेरपिस्टने शरीर आणि मनावरही लक्ष केंद्रित केले जाते. या शारिरीक शरीररचनेमागे मन कसे आहे तसेच अन्नाचे सेवन महत्वाचे आहे. खाणे, पिणे, झोपणे सर्वांगीण विचार असतो.

सीएसपी (CSP) असलेल्या व्यक्तीने कदाचित जीवनाची परिस्थिती, नैसर्गिक जीवनशैली स्वीकारली नसेल. शारीरिक स्थितीशी मनाचा संबंध वाचणे किंवा समजून घेणे महत्त्वाचे आहे.

हे फिजिकल ड्रॉप डाउन समजून घेणे महत्त्वाचे आहे परंतु *नॉन-स्वीकृती* च्या मागे असलेले मन हे मूळ कारण विश्लेषण म्हणून जाणून घेणे देखील तितकेच महत्त्वाचे आहे.

वास्तविक जीवनात अनेक प्रसंग, व्यक्ती जीवनातील वास्तव स्वीकारत नाही. त्याच्या/तिच्या स्वतःच्या कृती विरोधाभास आहेत. जीवनात क्रोध सर्वात मोठा बोझ आहे आणि क्षमा सर्वात सुंदर आणि सरल मार्ग जो जीवनाला बोझहीन आहे 🌹
जीवन म्हणजे वादळ संपण्याची वाट पाहणे नव्हे, तर पावसात नाचायला शिकणे.

जीवन विरोधाभासांनी भरलेले आहे, परंतु मान दुखणे टाळण्यासाठी एखाद्याने स्वीकार करणे आवश्यक आहे.

तुम्ही स्वतःला तसेच मित्र, कुटुंब, नातेसंबंध जसे आहे तसे स्वीकारले आहेत का?

तुम्हाला मानेत दुखत आहे का?
निदान केले जाते मात्र निरामय आरोग्य आणि समाधानासाठी Niramay Yogchikitsa Kendra निरामय आयुर्वेद व होमिओपॅथी प्रचार केंद्राशी संपर्क साधा MY.KrishnaNand Medical.Yog.UAE

ऑनलाइन सल्लामसलत उपलब्ध आहे. मे आठवडा सेवा सप्ताह आहे ज्यामध्ये मोफत सल्लामसलत उपलब्ध आहे. भेटीची वेळ घ्या. दुसरे मत महत्वाचे आहे. www.Yog4You.com ला भेट द्या.

All credit to आचार्या अस्मिता ताई and आचार्य Kedar Pargaonkar आणि आमचे मार्गदर्शक Krishna Palande गुरुजी.

INDIA ELECTION NEWS Ministry of Ayush, Government of India
Swami Ramdev
Yoga International
Yoga Alliance Professionals
श्रीसमर्थ योग थेरपी आणि योगा क्लास
Mahila Morcha BJP
Medical Yoga
Dubaikar Dadus मित्र मंडळ
Planet Marathi OTT
Marathi mandal Abu dhabi
Marathi Mandal Italy "ऋणानुबंध"
Marathi Bhashik Mandal Toronto (MBM) - Community

Address

Pune

Alerts

Be the first to know and let us send you an email when MY.KrishnaNand posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share

Share on Facebook Share on Twitter Share on LinkedIn
Share on Pinterest Share on Reddit Share via Email
Share on WhatsApp Share on Instagram Share on Telegram