Shree Baneshwar Swast Aushadhi Seva

Shree Baneshwar Swast Aushadhi Seva Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Shree Baneshwar Swast Aushadhi Seva, Medical Center, Suyash Niwas , shop no. 2, बाणेर गाव स्वागत कमानी जवळ, बाणेर, Pune.

28/10/2019

दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा

विजयादशमीच्या शुभेच्छा
08/10/2019

विजयादशमीच्या शुभेच्छा

15/12/2018

जेनेरिक औषधे

जेनेरिक ह्या शब्दाचा अर्थ एखाद्या वस्तु समुहाचा प्रातिनिधिक समान गुण. औषधांच्याबाबत ही समानता ह्या बाबतीत असते की जेनेरिक औषधे निर्माण होतात पण कुठलीही ठराविक कंपनी आपले लेबल त्यांना लावून विशिष्ट ब्रँडनाव त्यांना देत नाही.
सामान्य जनतेच्या दृष्टीने स्वस्त असलेली ही औषधे कुठल्याही कंपनीने ब्रांडिंग न केल्याने मूळ नाव व मूळ किंवा अत्यल्प नफा असलेल्या किंमतीत उपलब्ध होतात.
त्यामुळे जेनेरिक औषधांची दुकाने चालवणे आव्हानात्मक ठरते.
त्यातील जमेची बाजू म्हणजे भारत सरकारने जनौषधी योजना सुरू करून नागरिकांत जेनेरिक औषधांबद्दल सकारात्मक मत तयार केले आहे आणि ते योग्यच आहे. अव्वाच्या सव्वा वाढवलेल्या किंमतीत औषध घेण्या ऐवजी वाजवी दरात घेणे केव्हाही योग्य.
अहो , हाय स्ट्रीट वरचा शोरूम वाला जसे मनाप्रमाणे दर लावतो व स्वतःच्या झालेल्या खर्चाची वसुली करतो , तसाच प्रकार औषधांच्या बाबतही आहे.
कंपन्यांना आर एंड डी , मार्केटिंग , ब्रांडिंग, पेटेंटिंग वर येणारा खर्च त्या औषधांच्या किंमतीतून वसूल करतात .
आपला सदसद् विवेक जागृत ठेवून आपण रास्त दरातील औषधेच घेतली पाहिजेत. जितकी अधिक जनता जेनेरिक औषधे विकत घेईल तितका जास्त प्रतिबंध कंपन्यांच्या अंधाधुंद व्यापारावर येईल.
आपल्याला देशाच्या आर्थिक उलाढाली मध्ये देशहित वाढ करायची असेल तर औषधांमध्ये जेनेरिक ची उलाढाल वाढली पाहिजे.
कारण जेनेरिक कंपन्या अत्यल्प दरात औषधे देतात. त्यांना जिवंत ठेवण्यासाठी विकत घेणार्यांची संख्या वाढवावीच लागेल.
अहो जेनेरिक औषधे ही कंपन्यांसाठी तयार केलेली स्टँडर्ड औषधेच आहेत ज्यावर कंपन्या आपले नाव जोडून नफा कमावतात.
मी स्वतः वैद्यकीय व्यावसायिक आहे आणि ही सेवा देतांना ह्यातलं लोकहित आणि देशहित दोन्ही किती महत्वाचे आहे ह्याचा अनुभव घेत आहे.
अधिकाधिक लोकांनी सजग व्हावे व जेनेरिक औषधेच खरेदी करावीत ही जाणीव मी उत्पन्न करण्याचा प्रयत्न करीत आहे.
आपण जाणत्या राज्यातले जाणते नागरिक होऊन जेनेरिक औषधे च खरेदी करावी ही विनंती करीत आहे.

डॉ. सौ.माधवी मंदार रारावीकर

07/11/2018

Wishing you joy and prosperity this Diwali

Happy Dasara
18/10/2018

Happy Dasara

15/08/2018

Shree Baneshwar swast aushadhi seva have all generic brands of medicines.Do visit to save at least 30 to 70% in your medicine bills.

Address Shop no.2 ,Suyash Nivas , Lane near Baner gaon swagat board, Main road, Baner

Ph-8805553040
Email. madhavi_raravikar@yahoo.co.in

All standard generic medicines.Especially BP , Diabetes ,  calcium , vitamins , supements. Anti inflammatory , antibioti...
03/06/2018

All standard generic medicines.Especially BP , Diabetes , calcium , vitamins , supements. Anti inflammatory , antibiotics.
Medicines can be ordered over phone.
Dr. Raravikar
Ph 8805553040
Email. madhavi _raravikar@yahoo.co.in

26/05/2018

सर्वेपि सुखिनः सन्तु सर्वे सन्तु निरामयाः

श्री बाणेश्र्वर स्वस्त औषधी सेवा
हा जेनेरिक औषधी सेवा उपक्रम नोव्हेंबर 2017 मध्ये सुरु करण्यात आला. दर्जेदार जेनेरिक औषधे हे आमचे
आश्वासन आम्ही पूर्ण केले. जनमानसात स्थान निर्माण केले.
श्री बाणेश्र्वर स्वस्त औषधी सेवा ही 'जेनेरिकार्ट' ह्यांची चेन फ्रँचायजी आहे.
दिवसेंदिवस औषधोपचारांचे वाढत जाणारे दर सामान्य व्यक्तींना आवाक्याबाहेर वाटू लागले आहेत.म्हणुनच जेनेरिक औषधे उपलब्ध होणे गरजेचे झाले आहे.
मला समाधान वाटते कि मी ह्या उपक्रमाची एक सक्रिय कार्यकर्ती झाले.
श्री बाणेश्र्वर स्वस्त औषधी सेवा ह्या उपक्रमाद्वारे
नागरिकांची आरोग्यसेवा घडावी हीच कामना आहे.

डॉ माधवी मंदार रारावीकर
संस्थापक
श्री बाणेश्र्वर स्वस्त औषधी सेवा

Address

Suyash Niwas , Shop No. 2, बाणेर गाव स्वागत कमानी जवळ, बाणेर
Pune
411045

Telephone

+91 88055 53040

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Shree Baneshwar Swast Aushadhi Seva posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share

Share on Facebook Share on Twitter Share on LinkedIn
Share on Pinterest Share on Reddit Share via Email
Share on WhatsApp Share on Instagram Share on Telegram

Category