07/10/2020
काही दिवसांपूर्वी ओपीडी ला एक तिशीतला तरुण आला. रुग्ण कृश होता. त्याचा शरीरावर एक विशिष्ट रौक्ष्य आणि चेहऱ्यावर दैन्य होते. तो समोर येऊन बसल्यावर मी नेहमी प्रमाणे विचारले, " हा बोला दादा, काय त्रास होतोय ?"
रु : डॉक्टर, मला भूत बाधा झाली आहे !
( असे उत्तर ऐकल्यावर साहजिकच थोडा चपापलो...)
मी : अच्छा, काय होतय नेमकं ?
रु : शौचाला गेलो की दरदरून घाम फुटतो, भीती वाटते, कोणीतरी छातीवर बसले आहे असे वाटते. यासाठी अनेक डॉक्टर केले काही उपयोग नाही झाला. म्हणून शेवटी एका तांत्रिकाला दाखवले, त्याने सांगितले कि मला भूत बाधा झाली आहे !
मी : हरकत नाही, आपण केस घेऊ आणि नंतर नेमका काय प्रकार आहे ते ठरवू!
व्यवस्थित केस घेतल्यावर असे लक्षात आले की -
* रुग्णाला २-३ वर्षांपासून अर्शाचा (मूळव्याधीचा) त्रास होता. त्यासह तीव्र मलविबंध आहे.
* दिनक्रम:रोज दुचाकी वरून ५०-६० km प्रवास, तिखट जळजळीत आणि अत्यंत रुक्ष - स्नेह विरहित आहार, कडधान्य भरपूर !!
याचे निदान एकच, उदावर्त !!!
मूळव्याध आणि मलावरोध आणि अगदी टिपिकल अपथ्याच्या कारणांनी वायूच्या गतीला अडथळा निर्माण होतो, साहजिकच वायू कोष्ठात भरून हृदयावर दाब निर्माण करतो.
Treatment - वायूच्या गतीला निर्माण झालेला पाइपातील (आंत्रातला) Blockage काढणे... म्हणजे वायूची गती अनुलोम करणे, या साठी आठवड्यातून ३ वेळा तेलाचा बस्ती आणि पोटात मूळव्याधीचे औषध दिले.
७ दिवसात मानगुटीवर बसलेल्या भूताचा जोर कमी होऊ लागला.👻👻
तसेच जसा मलावरोध कमी झाला तसे पूर्ण भूत उत्रवले !!! 😅😅
ओम भट स्वः !!!
वैद्य. प्रतीक रामचंद्र तोरणे
मांगिरीश आयुर्वेद चिकित्सालय,पुणे.
९३७३७५८९३३