02/01/2024
मुलांच्या परीक्षांचा ताण येतो का?
- प्रसाद शिरगावकर
नाताळची सुट्टी आणि न्यु इयर पार्टी वगैरे करून झाली की अनेक कुटुंबांमध्ये मुलांच्या परीक्षांचे वेध लागतात. दहावी-बारावीसारख्या महत्वाच्या वर्षांच्या परीक्षा अगदी महिन्या-दोन महिन्यावर आलेल्या असतात. वर्ष-दीडवर्षं पोरं बेक्कार मेहनत घेत असतात आणि आता शेवटच्या महिन्यावर खेळ येऊन थांबलेला असतो. मुलांना ताण असतो, आईवडीलांना anxiety असतो. आपल्या मुला-मुलीने 'बेस्ट परफॉरमन्स' द्यावा अशी आईवडीलांची मनापासून इच्छा असते. त्यासाठी आपण काय करू शकू हे त्यांना समजत नसतं. किती मदत करावी, कशी मदत करावी, किती करणं पुरेसं आहे अन कुठे थांबावं हे समजत नसतं.
अत्यंत विचित्र तणावपूर्ण आणि anxious वातावरण संपूर्ण कुटुंबात असतं.
अशा तणावपूर्ण काळात नेमकं काय करावं? आपल्या मुला-मुलीला तिच्या आयुष्यातल्या महत्वाच्या परीक्षेसाठी आपण नेमकी कशी आणि काय मदत करावी? घरातल्या वातावरणातला ताण कसा सांभाळावा? ह्या प्रश्नांची उत्तरं शोधण्यासाठी आम्ही प्रसिद्ध बालमानसोपचार तज्ज्ञ डॉक्टर भूषण शुक्ल (Bhooshan Shukla) यांचा ऑनलाईन मास्टरक्लास आयोजित करतो आहोत.
हा मास्टरक्लास दहावी-बारावी सारख्या (किंवा विविध प्रवेश परीक्षांसारख्या) महत्वाच्या परीक्षांसाठी येणाऱ्या ताणासाठी अत्यंत महत्वाचा आहेच, पण मुलांच्या कोणत्याही (अगदी चौथी-पाचवीच्याही) परीक्षांचा ताण येणाऱ्या पालकांसाठीही महत्वाचा आहे.
येत्या शनिवारी सकाळी ११ वाजता हा मास्टरक्लास आहे. ऑनलाईन आहे, कुठूनही सामील होऊ शकाल.
आणि हां, हा मास्टरक्लास विनामूल्य आहे, मात्र नोंदणी आवश्यक आहे. नोंदणीची लिंक पहिल्या कमेंटमध्ये देतोय. मास्टरक्लास विषयी अधिक माहिती लिंकवर आहे.
(जागा मर्यादित आहेत, त्वरित नावनोंदणी करा.)
- प्रसाद शिरगावकर