08/07/2022
शरीराचं servicing : बस्ति चिकित्सा
आयुर्वेदातील पंचकर्मातील एक महत्वाचे कर्म. यांस अर्ध चिकित्सा म्हटले जाते. वात दोषाच्या आजारांवर एक जालीम उपाय म्हणजे बस्ति. हे सगळं आत्ताच का बरं सांगायचं? तर पावसाळा सुरू झाला आहे आणि हाच वात प्रकोपाचा (वाताचे आजार वाढण्याचा) काळ असतो. पिंडी ते ब्रह्मांडी या सूत्रानुसार वातावरणामध्ये वात दोष वाढविणारे बदल झाले की साहजिकच औषध घेऊन नियंत्रणात आलेले किंवा पथ्य पाळून कमी झालेले वाताचे आजार वाढतात. सांधेदुखी, पाठदुखी, कंबरदुखी, मानदुखी, पक्षाघात, थरथर, spondylosis, spondilitis, मलावष्टंभ (constipation), हाता-पायांना मुंग्या येणे, स्पर्शज्ञान कमी होणं, विविध प्रकारच्या वेदना, पोटात गॅस पकडणे, मुळव्याध, फिशर असे सर्व प्रकार म्हणजे प्रकुपित वात वाढल्याची लक्षणे आहेत. बस्ति म्हणजे औषधसिद्ध तूप, तेल, काढे, दूध इत्यादि गुदद्वारावाटे (संडासच्या जागेतून) देणे. रुग्ण तपासून त्याच्या प्रकृतीनुसार कशाचा आणि किती प्रमाणात बस्ति द्यायचा हे निश्चित होते. हाडं, हाडांची पोकळी, सांधे अशा काही अवयवांपर्यंत जिथे फक्त पोटात औषधे देऊन आजार बरे करणे किचकट असते आहे अशा ठिकाणी बस्तीसारख्या पंचकर्माचा विशेष उपयोग होतो. परिणामही लगेच दिसून येतो.
बस्ति चिकित्सेचे फायदे -
* वाताचे आजार मुळापासून नाहीसे होतात.
* स्नायु बळकट होतात.
* हाडांचा ठिसूळपणा कमी होतो.
* वेदना कमी होतात.
* वजन कमी होते. अंग हलके होते.
* कृश व्यक्तीचे वजन वाढते , स्थूल व्यक्तीचे वजन कमी होते.
* भूक आणि पचनशक्ती वाढते.
* वर्ण सुधारतो.
* त्वचा स्निग्ध होते.
* मधुमेह, थायरॉईड, वंध्यत्व तसेच पाळीच्या तक्रारींसाठी विशेष उपयोगी.
सध्याच्या बैठ्या जीवनशैलीचा विचार करता शरीराचे संतुलन टिकवून ठेवायचे असेल तर बस्तिसारखा दुसरा रामबाण उपाय नाही. आणि हे शारीरिक संतुलन कितीही मोठ्या premium च्या policy ने विकत घेता येत नाही. दगदग, धावपळ, खाण्यापिण्याच्या बिघडलेल्या वेळा आणि पद्धती ह्यामुळे शरीरात वाढलेले दोष काढून टाकायचे असतील म्हणजेच शरीराचे servicing करायचे असेल तर शरीराची अंतर्बाह्य शुद्धी हवीच आणि त्याची सुरवात बस्तीने झाली तर अजूनच उत्तम..
तर मग आजच संपर्क करा..
वैद्य आनंद जराड MD ( पंचकर्म)
7020319651.
वैद्य स्मिता जराड 8329953535.
आयुश्वरी आयुर्वेद व पंचकर्म क्लिनिक. 38/17 , पहिला मजला, ईश्वरी अपार्टमेंट , ऋतुरंग पार्क , धनकुडे वस्ती , बाणेर , पुणे - 411045.
पंचकर्मासह संपूर्ण आयुर्वेदिक चिकित�