21/06/2024
Lovely Feedback by my student. योग हा फक्त शरीरासाठी न करता स्वतः च्या सर्वांगीण उन्नतीसाठी करावा. आणि जेव्हा आपला हा उद्देश आपले शिष्यगण अंगीकारतात तेव्हा खूप समाधान जाणवते. तेच हा Feedback वाचून जाणवलं. मी आज जागतिक योग दिनाची पर्वणी साधून हा मनोबल वाढवणारा Feedback share करतेय. 🙏🌹🙏
-------‐-------‐------‐------------------‐------------------------
माझे मागचे वर्षं खरंच माझी परीक्षा घेणारे ठरले. नॉर्मल जॉब तर होताच पण शिवाय Algorand Regional Ambassador व्हायचे ठरवले तेव्हा खरी मज्जा यायला लागली. कारण ती टीम मला आवडते. प्रचंड डायनॅमिक टीम आहे. जग फिरून आलेली लोकं आहेत. त्यांना भेटले प्रत्येकवेळी नवीन गोष्टी कळतात. काम जोरदार करतात आणि पॉलिटिक्स पण. 😁
महाराष्ट्र, गुजरात, बंगाल, आसाम, दिल्ली, बिहार, तेलंगणा, US मध्ये राहत असले तरी भारतीयच असलेले टीम हेड्स. अनेक रंगाची, स्वभावाची, वेगवेगळ्या स्किल्स च्या लोकांबरोबर काम करायला मिळू लागले. खरा प्रॉब्लेम सुरु झाला जेव्हा नॉर्मल जॉब तर सुरु होताच पण या Ambassador गिरी करताना करावी लागणारी तयारी, प्रवास आणि सतत लोकांच्याशी बोलणे मला अंगावर यायला लागले. सतत डोक्यात सुरु असलेले विचार, ते करणे जमले नाही की त्याचा तयार होणारा स्ट्रेस नकळत माझ्यावर परिणाम करू लागला. दर दोन महिन्यांनी मी आजारी पडू लागले. सर्दी , खोकला, ताप .. खोकला कमी व्हायला २०-२५ दिवस. त्यात बरोबर प्रवास, स्टेजवर जाऊन बोलायचे. पाणी पित स्टेजवर बोलणे पूर्ण करायचे. नंतर बॅकस्टेज जाऊन १५-२० min लागलेली ढास. ऑक्टोबरमध्ये शेवटी ठरवले.. आता बास करावं.. अति होतंय .. सोडून दिले..
टीमचा मोठा इव्हेंट तोंडावर आलेला असताना मी असं वागतेय म्हणल्यावर मला पण मन खात होते. परत काम सुरु केले आणि त्यांना काम पूर्णपण करून दिले. टीमने पण खूप समजून घेऊन मदत केली.
त्यानंतर जो एक महिना गेला ना तो माझ्यासाठी टर्निंग पॉईंट ठरला. आपण जेव्हा वीक असतो तेव्हा प्रत्येक जण सल्ला देत असतो जो आपण ऐकण्याच्या मनस्थितीत पण नसतो. या सगळ्यात एव्हाना कळूनच गेले होते की मला स्ट्रेस हॅन्डल करता येत नाहीय पण कुठलेही काम सोडायचे नाही हे पक्के केले होते. पण त्यावर उपाय पण शोधायला सुरवात केली.
इच्छा असली की मार्ग दिसायला लागतात ना तसेच काहीसे झाले. रोजच्या सारखे योगा क्लास सुरु होता. शेवटचे मेडिटेशन सुरु होते. ते झाल्यावर माझी योग टीचर म्हणाली, मीत तू प्रचंड स्ट्रेस घेत आहेस का?
मी एकदम आश्चर्यचकित झाले .. मी काही बोलणार तोपर्यंत म्हणाली , तू संध्याकाळी फोन कर मला..
मी फोन करून तिला पहिला प्रश्न विचारला तुला कसे कळले?
ती म्हणाली , "मनाने किंवा मेंदूने थकलेली लोकं ध्यानाला बसली की डावीकडे झुकतात आणि जे शारीरिक कष्टाने खूप थकतात ते उजवीकडे झुकतात. तू clearly डावीकडे झुकलेली दिसतेस मला. तू योगा फक्त व्यायाम म्हणून करतेस .. हिलिंग म्हणून कर "
मी, "ते कसे करणार ?"
तिने जे उपाय सांगितले त्याने जे माझ्यात बदल झालेत ते आश्चर्य करणारे आहेत. मागच्यावर्षी पेक्षा दुप्पट काम आणि दुप्पट प्रवास करत आहे. स्ट्रेस येत नाही का? तर प्रचंड येतो .. आणि येत राहणार पण फक्त तो स्वतःवर हावी होऊ कसा नाही द्यायचा हे नक्की कळू लागलंय !
मागच्या आठवड्यात संध्याकाळी बेंगलोरला निघाले. flight ला उशीर झाला. शांतपणे लॅपटॉप काढून काम करू लागले. पाऊस सुरु होता. खिडकीतून बाहेर बघितले कि वीज चमकलेली दिसत होती. हॉटेलला पोचायला रात्रीचे १२.३० झाले. दिवसभर इव्हेंट झाला रात्री परत पुणे. काल परत बेंगलोरला निघाले. उद्याच्या प्रेसेंटेशनची तयारी आठवडाभर सुरूच होती. घरून निघताना अंग मोडून आल्यासारखे वाटले. प्रवासात त्रास नको म्हणून गोळी घेतली. गोळी घेऊन २-३ तास झाले तरी फरक जाणवेना. सडकून ताप येणार हे तर सरळ कळतच होते.
थोड्यावेळाने लक्षात आले .. गोळी घेऊन परिणाम होत नाहीय म्हणजे हा स्ट्रेस आहे.. एअरपोर्टवर सरळ शांत डोळे मिटून बसले. मेडिटेशन सुरु केले. Flight मध्ये पण थोडं वेळ केलं. बेंगळुरूमध्ये उतरताना I was fit as a fiddle 😂
सुरवातीलाच म्हणाले ना , या टीममध्ये गजब पॉलिटिक्स सुरु असते. अर्थात आज मी टार्गेट होते. एक कलीग सतत टोमणे मारत होता. सुरवातीला पूर्वीची मित डोकावली.. अस्वस्थ झाले. पण थोड्यावेळाने त्याच्या डोळ्यात बघून हसले आणि मनात म्हणाले , भेट नेक्स्ट टाइम !!
आता राहून राहून वाटते .. अडीच वर्षे न चुकता योगा करतेय पण त्याच्या खरा अर्थ गेले सहा महिन्यात कळतोय.. त्यामुळे होणारे बदल माझे मलाच आश्चर्यचकित करून जातात हे खरं ! मकरसंक्रातीला १०८ सूर्यनमस्कार घातले होते .. २१ जूनला करेन असं ठरवतेय !
मीत ठोसर