Swami Seva Marg

29/04/2026
सोमवार दि.२०/४/२०२६ श्री स्वामी समर्थ समाधी मठ  दर्शन अक्कलकोट ✨🙏🏻🪷
20/04/2026

सोमवार दि.२०/४/२०२६ श्री स्वामी समर्थ समाधी मठ दर्शन अक्कलकोट ✨🙏🏻🪷







18/04/2026
श्री स्वामी समर्थ महाराजांची आजची  गुरुवार  दि. २५/०३/२६ वस्त्रालंकार महापुजा दर्शन🌹🙏🏼
26/03/2026

श्री स्वामी समर्थ महाराजांची आजची गुरुवार दि. २५/०३/२६ वस्त्रालंकार महापुजा दर्शन🌹🙏🏼

श्री स्वामी समर्थ महाराजांची आजची समाधीची वस्त्रालंकार महापुजा दर्शन🌹🙏🏼
25/03/2026

श्री स्वामी समर्थ महाराजांची आजची समाधीची वस्त्रालंकार महापुजा दर्शन🌹🙏🏼

गुढी पाडवा✨श्री स्वामी समर्थ समाधी मठ मंदिर(चोळप्पा वाडा)अक्कलकोट 🙏🏻🌺   🙏🏻🌍♥️
19/03/2026

गुढी पाडवा✨

श्री स्वामी समर्थ समाधी मठ मंदिर(चोळप्पा वाडा)अक्कलकोट 🙏🏻🌺

🙏🏻🌍♥️

*‼️श्री स्वामी समर्थ‼️*  *🔥हुताशनी पौर्णिमा (होळी )**👉सोमवार दिनांक २ मार्च २०२६...*   *🪐होळीचे वैज्ञानिक दृष्ट्या महत्व...
01/03/2026

*‼️श्री स्वामी समर्थ‼️*

*🔥हुताशनी पौर्णिमा (होळी )*

*👉सोमवार दिनांक २ मार्च २०२६...*

*🪐होळीचे वैज्ञानिक दृष्ट्या महत्व* उन्हाळा सुरू होत असतो जमीन भाजून निघते.तिच्यातून उष्ण वाफारे निघतात.

* *🏡🍂🍂घराभोवती पानांची कुजलेली घाण तशीच असेल तर ती आरोग्याला हानिकारक असते.म्हणून तिची होळी करणे आवश्यक आहे.*

* 💫स्वच्छता ही एकदा करून पुर्णत्वास जात नसते. ती पुन्हा पुन्हा करावी लागते त्याचीच आठवण करून देणारा सण म्हणजे होळी.

*🌝उष्णता देणाऱ्या अग्नीला कृतज्ञतेने केलेला प्रणाम म्हणजे होळी.*

🌳ऋतुराज वसंत ऋतू चे आगमन म्हणजे होळी.

*🛕दिंडोरीप्रणित स्वामी सेवा मार्गानुसार 🛕*

*👇हा सण असा साजरा करतात.👇*

* *या दिवशी अंगणात थोडी जागा सारवून त्या भोवती 🔯रांगोळी काढून मधोमध शेणाच्या गोवऱ्या त्यात एरंडाची फांदी ठेवतात.*
एरंडाचा एक दांडा उभा करतात. त्याच्या भोवती लाकडे ,गोवऱ्या रचतात.त्याची पूजा करून पुरणपोळीचा नैवैद्य दाखवतात.

👳🏽ग्रामीण भागात सगळे जण एकत्र येऊन गोवऱ्या, लाकडे गोळा करून सार्वजनिक होळी करतात,पूजा करून नंतर त्यात नारळ अर्पणकरतात.

*🥥खोबऱ्याच्या वाट्या भाजून प्रसाद वाटतात.प्रत्येक सेवेकऱ्याने आपल्या घरा समोरील मोकळ्या जागेत छोटी होळी पेटवावी.*

*🧘‍♂️नंतर हातात पाणी घेवून मला व माझ्या कुटुबीयांना सुख शांती मिळावी यासाठी मी होळीचे पूजन करीत आहे असा संकल्प करावा.त्यानंतर घरातील विस्तवाने होळी पेटवावी.*

*🫵🏻पंचोपचार पूजा करून नैव्यद्य समर्पित करावा.*

*🙏असृक्पाभयसंत्रस्तै: कृत्वा त्वं होलि बाहलशै: lअतस्त्वा पूजयिष्यामि भूते भूतिप्रदा भव*

🚶🏼‍♂️असा मंत्र म्हणून *तीन प्रदक्षिणा घालाव्यात.*

🥥खोबऱ्याची वाटी किंवा नारळ भाजून त्याचा प्रसाद घ्यावा.

*तसेच घरात उपद्रव देणाऱ्या जीव कीटकांच्या *(🪳झुरळे, 🦟डास, 🪲ढेकूण , वैगरे ) कणकेच्या आकृत्या करून त्या होळीत टाकाव्यात.* म्हणजे ते जिवाणू नष्ट होतात.

🔥होळी या सणाच्या निमित्ताने मनुष्याने आपल्या अंगी असलेले वैगुण्य , दोष, प्रवृत्ती , यांची होळी करावी. संपूर्ण मराठी वर्षाच्या शेवटी या सर्व गोष्टी सोडून द्याव्यात. हाच या सणाचा उद्देश आहे.

Address

Pune

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Swami Seva Marg posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share