Dr.Mahesh Sawant - Homoeopathic Physician

  • Home
  • Dr.Mahesh Sawant - Homoeopathic Physician

Dr.Mahesh Sawant - Homoeopathic Physician Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Dr.Mahesh Sawant - Homoeopathic Physician, Medical and health, DR SAWANT HOMOEOPATHIC CLINIC, GERA 77, SHOP NO. 8, KALYANINAGAR, .

02/06/2023
01/06/2023

*आरोग्य विषयक माहिती -*
*बायपोलर डिसॉर्डर* हा एक मानसिक रोग आहे. या रोगाने पीडित असलेल्या व्यक्तीला स्वतःच्या मनावर ताबा ठेवणे अशक्यप्राय होते.
सतत डोक्यामध्ये काही विचार येतात आणि त्या विचारांप्रमाणे रुग्णाची हालचाल होत राहते या रुग्णांचा मनावरचा ताबा पूर्णपणे सुटलेला असतो आणि त्यामुळेच या रुग्णांची मानसिक अवस्था स्थिर राहत नाही. *_सतत मूड स्विंग्स (Mood Swing) होणे_* हे बायपोलर डिसॉर्डरचे लक्षण मानले जाते. व्यक्ती काही वेळ खूप आनंदी तर पुढे काही मिनिटांमध्येच ती व्यक्ती रडताना दिसते.

बायपोलर डिसॉर्डरची लक्षणे वेळोवेळी बदलत असतात. याशिवाय व्यक्तीपरत्वे लक्षणांमध्ये बदल होत असतो. एका व्यक्तीमध्ये आढळलेली लक्षणे इतर रुग्णांमध्ये आढळतीलच असे नाही.

काही प्रमुख लक्षणे
॰ सतत चूळबूळ, शांत न बसणे. सतत डोक्यामध्ये विचार चालू राहणे आणि काहीतरी करावसं वाटणे. मन बिलकुल स्थिर नसणे.

॰ विनाकारण चिडचिड होणे. / राग-राग होणे.

॰ अतिआत्मविश्वास वाढत जाणे. सतत आनंदी राहणे व क्षणात दुःख होणे. आत्महत्येचे विचार येणे.

॰ निद्रानाश किंवा झोप पूर्ण न होणे किंवा सतत झोपून राहावे असे वाटणे.

॰ खूप जास्त वेळ बोलणे किंवा काहीच न बोलणे. सतत अस्वस्थ वाटणे.

॰ नेहमीच्या कामांमध्ये लक्ष नसणे. कोणत्यातरी विचारामध्ये गुंग असणे. तंद्री मध्ये असणे, स्वतःशीच बोलत राहणे, पुटपुटत राहणे.

॰ नेहमी अनिश्चित राहणे.

॰ निर्णय घेताना घाबरणे.

॰ वजन वाढणे किंवा वेगाने कमी होणे.

॰ भूक न लागणे.

बायपोलर डिसॉर्डर या मानसिक आजाराच्या उपचारांमध्ये समुपदेशन हे अतिशय महत्त्वाचे आहे. यामध्ये गप्पा किंवा चर्चा यांमधून समुपदेशनाची प्रक्रिया पार पाडली जाते. समुपदेशनाद्वारे रुग्णाची मानसिक स्थिती समजून घेण्याचा प्रयत्न केला जातो व अचूक होमिओपॅथिक औषध देण्याचा प्रयत्न केला जातो.

होमिओपॅथिक औषधांसोबतच पुढील गोष्टी केल्यामुळे अधिक फायदा होऊ शकतो.

1- समस्यांबद्दल जवळच्या व्यक्तींशी चर्चा करणे. तुमच्या जवळचे नातेवाईक किंवा मित्र यांच्याशी संवाद साधणे, चर्चा करणे.

2 - सकारात्मक विचार करणे.

3 - चांगले छंद जोपासणे

4- कोणत्याही गोष्टीचा अधिक ताण न घेणे.

5- व्यसनांपासून लांब राहणे.

6- नियमितपणे व्यायाम करणे.

7- नकारात्मक विचारांपासून दूर राहणे.

*टिप- बऱ्याच वेळा मानसिक रुग्ण किंवा मानसिक आजाराने पिडीत असणारी लोकं ड

01/10/2021

आरोग्य विषयक माहिती.
1- चुकीच्या पद्धतीने व्यायाम केल्यास त्याचा आपल्याला त्रास होऊ शकतो. त्यामुळे तज्ञ मंडळींची मदत घ्या.
2- तुमचा आजार आणि तुमची क्षमता समजून घेऊनच व्यायाम करा.
3-आजारी व्यक्तीने व्यायाम करण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.
4- Hyperthyroidism व हृदय विकार अशा आजारांमध्ये व्यायाम करण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणे अत्यावश्यक आहे.
5- व्यायाम केल्यानंतर पुरेशा प्रमाणात आराम करणे आवश्यक असते तसेच पुरेशी झोप घेणे गरजेचे आहे.

06/04/2019

Parenting

07/03/2019

मानसिक आरोग्य
मानसिक आरोग्य म्हणजे काय? आपले मानसिक आरोग्य चांगले आहे हे कसे ओळखायचे? बरीच लोकं आपल्या मानसिक स्वास्थ्याकडे पूर्णतः दुर्लक्ष करतात, मी वेडा झालोय का? मला काही वेड लागलंय का अशी कारणे सांगून डॉक्टरांकडे जाण्याचे टाळतात, उपचार घेत नाहीत आणि मग त्याचे रूपांतर अतिशय गंभीर मानसिक आजारांमध्ये होतं.

World Health Organization (WHO) जागतिक आरोग्य संघटना हिने मानसिक आरोग्याबद्दल चार गोष्टी सांगितल्या आहेत त्यानुसार आपल्याला आपलं मानसिक आरोग्य चांगले आहे हे ओळखता येऊ शकतं.

त्यापैकी पहिली गोष्ट स्वतःच्या क्षमतांची जाणीव असणे. - बरेच लोक त्यांना त्यांच्या स्वतःच्या क्षमतांची जाणीव नसते, आपले अंगभूत गुण कोणते आहेत याबद्दल त्यांना कल्पना नसते आणि त्यामुळे त्यांच्या भावी आयुष्यामध्ये त्यांना नेमकं काय करायचं हे कळत नाही. कुणाच्यातरी दबावाखाली येऊन चुकीचे निर्णय घेतले जातात त्यामुळे स्वतःच्या क्षमतांची जाणीव असणं अत्यंत गरजेचं आहे, मी काय करू शकतो आणि काय करू शकत नाही याची स्वतःला जाणीव असणे फार गरजेचे आहे.

दुसरी गोष्ट अशी आहे, दैनंदिन जीवनातील बारीकसारीक ताणतणाव यांना सामोरे जाण्याची आपली तयारी पाहिजे, त्यांच्यावर सहजपणे आपल्याला मात करता येईल असं आपल्याला आपलं व्यक्तिमत्व घडवले पाहिजे. छोट्या छोट्या संकटांना घाबरून न जाता त्यांच्यावर आपण सहजपणे मात केली पाहिजे. बरीच लोकं बारीक-सारीक तणावांना घाबरून जातात, त्यांना नेमकं सुचत नाही काय करावे आणि त्यामुळे मानसिक आरोग्य बिघडतं.

तिसरी गोष्ट अशी आहे की आपण जे काही काम करतो त्याच्यामध्ये आपण समाधानी आहोत का? आनंदी आहोत का? जर आपल्या कामामध्ये आपल्याला समाधान, आनंद मिळत नसेल तर आपण सातत्याने तक्रार करत बसू, त्या कामाचा आपल्याला आनंद घेता येणार नाही आणि त्यामुळे आपल्याला मानसिक नैराश्य, उदासीनता येऊ शकते. आपल्या कामाचा आपल्याला पुरेपूर आनंद घेता आला पाहिजे, आपण आपले छंद जोपासले पाहिजेत.

चौथी गोष्ट अशी आहे की आपण आपल्या समाजाच्या कल्याणासाठी काहीतरी चांगलं करण्याचा सातत्याने प्रयत्न केला पाहिजे. आपण या समाजाचे देणे लागतो तर आपण आपल्या समाजासाठी काही तरी चांगले कार्यक्रम, सेवा राबवण्याचा प्रयत्न केला पाहिजे.

ह्या चारही गोष्टी अतिशय महत्त्वाच्या आहेत आणि यावरुन तुम्हाला समजून येईल की तुमचं मानसिक आरोग्य चांगले आहे की नाही.

डॉ.महेश सावंत
पूणे
मो.नं.9923675754

Address

DR SAWANT HOMOEOPATHIC CLINIC, GERA 77, SHOP NO. 8, KALYANINAGAR

411006

Opening Hours

Monday 11:00 - 13:30
17:00 - 20:00
Tuesday 11:00 - 13:30
17:00 - 20:00
Wednesday 11:00 - 13:30
17:00 - 20:00
Thursday 11:00 - 13:30
17:00 - 20:00
Friday 11:00 - 13:30
17:00 - 20:00
Saturday 11:00 - 13:03
Sunday 17:00 - 20:00

Telephone

+918788884334

Alerts

Be the first to know and let us send you an email when Dr.Mahesh Sawant - Homoeopathic Physician posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Practice

Send a message to Dr.Mahesh Sawant - Homoeopathic Physician:

  • Want your practice to be the top-listed Clinic?

Share

Share on Facebook Share on Twitter Share on LinkedIn
Share on Pinterest Share on Reddit Share via Email
Share on WhatsApp Share on Instagram Share on Telegram