16/10/2024
मित्र हो,
" "या निशा सर्वभूतानां तस्यां जागर्ति संयमी ।
यस्यां जाग्रति भूतानि सा निशा पश्यतो मुनेः ll "
आठवणींच्या मंद आचेवर मनाचं दूध आटवायला ठेवावं आणि नकोश्या आठवणींच पाणी वाफ होऊन जावं व हळूहळू जमलेली साय विरघळू लागली की त्यात नात्यांची वेलची अन् आपुलकीचं केशर घालावं. मग वात्सल्याची साखर गरजेपूरती घातली की मनाला ऋणानुबंधाचा छान रंग चढेल. तेंव्हा मनभर पसरलेल्या आपलेपणाला चांदण स्पर्श झाला की मनातली कोजागिरी साजरी झालीच म्हणून समजा...
कोजागिरी / शरद पोर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा.... !