12/02/2025
*राज्यस्तरीय खुली योगासन स्पर्धा उत्साहात संपन्न*
राज्यस्तरीय खुल्या योगासन स्पर्धेत रायगड जिल्ह्यातील ओंकार उतेकर यांना रौप्य पदक.
मानवसेवा विकास फाउंडेशन आयोजित प्रथम राज्यस्तरीय खुली योगासन स्पर्धा सोमवार दिनांक ३ फेब्रुवारी रोजी संत गुलाबबाबा आश्रम, टाकरखेडा मोरे, जि. अमरावती येथे पार पडली. पाचवे राष्ट्रीय योग व निसर्गोपचार संमेलन अंतर्गत या भव्य स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. अकोला, अमरावती, जालना, बीड, लातूर, बुलढाणा, मुंबई, ठाणे, रायगड, पुणे या जिल्ह्यातील स्पर्धकांनी मोठ्या संख्येने स्पर्धेत सहभाग घेतला.
रायगड जिल्ह्यातील पोलादपूर तालुक्याचे ओंकार उतेकर यांनी २८ ते ३५ वयोगटामध्ये रौप्य पदक पटकावले. हलासन, विरासन, शिर्शासन, बकासन, पार्श्वकोनासन या आसनांचे उत्कृष्ट सादरीकरण ओंकार उतेकर यांनी केले. या राज्यस्तरीय स्पर्धेचे आयोजक मानवसेवा विकास फाउंडेशन चे अध्यक्ष डॉ. नंदकिशोर पाटील आणि माजी आमदार रमेश बुंदिले यांच्या हस्ते पदक आणि प्रमाणपत्र विजेत्या खेळाडूंना प्रदान करण्यात आले.
या भव्य सोहळ्याला माजी आमदार रमेश बुंदिले, माजी नगराध्यक्ष ॲड. कमलकांत लाडोळे, भाजपा शहराध्यक्ष उमेश भोंडे, ज्ञानपीठ स्कूलचे अध्यक्ष शंकर गावंडे, संगई कन्या शाळेचे मुख्याध्यापक उत्तम मुरकुटे, पत्रकार गजानन चांदुरकर आणि स्पर्धेचे मुख्य परीक्षक ॲड. आनंद जगदेव यांची उपस्थिती होती. मान्यवरांनी योगासनांचे महत्त्व आणि त्याचा आरोग्यावर होणारा सकारात्मक प्रभाव यावर प्रकाश टाकला.
184 स्पर्धकांनी घेतला सहभाग
अंजनगाव सुर्जी (ता. प्र.)
येथील मानवसेवा विकास फाउंडेशन द्वारा प्रथम राज्यस्तरीय खुली योगासन स्पर्धा संत गुलाबबाबा आश्रम, टाकरखेडा मोरे येथे पाचवे राष्ट्रीय योग निसर्गोपचार सम्मेलन मध्ये दि ३ फेब्रुवारी रोजी आयोजीत करण्यात आली होती.
या स्पर्धेत अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला आहे. संपूर्ण महाराष्ट्रातून १८४ स्पर्धकांनी सहभाग नोंदवला आहे. अकोला, अमरावती, जालना व अंजनगाव मधील बऱ्याच शाळांनी आपल्या मुलांना सहभागी करुण घेतलें. सर्वात जास्त विद्यार्थी सहभाग नोंदविणाऱ्या संगई स्कूल ला बक्षीस देण्यात आले. सकाळी ८ ते ३ या वेळात स्पर्धा झाली व दुपारी ३ ते ६ दरम्यान बक्षिस वितरण करण्यात आले. महत्वाचे म्हणजे अमरावती वरून एक ७७ वर्षीय आजोबांनी योगा करुण मेडल मिळविले आहे. सर्व सहभागी स्पर्धकांना सहभाग प्रमाणपत्र देण्यात आले आहे.
या प्रसंगी बक्षीस वितरण सोहळ्यात प्रमूख पाहुणे म्हणून माजी आमदार रमेश बुंदिले, माजी नगराध्यक्ष ॲड कमलकांत लाडोळे, भाजपा शहराध्यक्ष उमेश भोंडे, ज्ञानपीठ स्कूलचे अध्यक्ष शंकर गावंडे, संगई कन्या शाळेचे मुख्याध्यापक उत्तम मुरकुटे, पत्रकार गजनान चांदुरकर, स्पर्धेचे मुख्य जज ॲड आनंद जगदेव, शिवसेना उपशहरप्रमूख विनोद पाटील व मानवसेवा विकास फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ नंदकिशोर पाटील उपस्थित होते. यावेळी सर्व पाहुण्यांचे भाषणे झाली.
योगासन स्पर्धा यशस्वी व्हावें यासाठी डॉ अक्षय चौधरी, डॉ चेतनकुमार भागवत, डॉ मोहन नेसनेसकर, डॉ प्रिया पाटील, अनवी चौधरी, दिपाली नेसनेसकर, डॉ अनिता कुर्मवंशी, रेणुका बोरोडे, सारिका धामोळे, ऋतुजा चऱ्हाटे, साक्षी पाटील, दिव्या मुरकुटे, दिव्या धावडे, आदित्य मुरकुटे, केयुर पटेल, अद्वय डबीर, माधुरी लामखडे, मनीषा कोथे, वैशाली मावळे यांनी अथक परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्र संचालन कु. दिव्या मुरकुटे तर आभार डॉ मोहन नेसनेसकर मानले.