17/01/2026
हठ – अद्भुत इच्छाशक्ती व दृढता या तत्वांमुळे या मार्गाला हठ मार्ग म्हणतात असा समज आहे, मात्र प्रत्यक्षात ह – म्हणजे सूर्य व ठ – म्हणजे चंद्र, या दोन्ही मार्गांचा समतोल करण्याचा मार्ग म्हणजे हठयोग होय.शरीरस्वास्थ्यापासून सुरु होऊन उन्मनी आणि मनोन्मनी अवस्थेपर्यंत याचा प्रवास आहे. योगमार्गावर जाणाऱ्या योग्याचे शरीर विषमुक्त, दृढ आणि लवचिक असले पाहिजे. प्राण मध्यम मार्गाने जायला हवे, म्हणून हठयोगाचे प्रयोजन आहे.
यातील यम व नियम हे महत्वाचे अंग असून त्याचा अंगीकार करणे अत्यावश्यक आहे. अधिक माहितीसाठी - ९०४९१३७५००