21/02/2025
“पुणे ते कन्याकुमारी १७६० की. मी. सायकल प्रवास १२ दिवसात पूर्ण”
सांगवी :- पुणे ते कन्याकुमारी हा सुमारे १७६० कि.मी. चा सायकल प्रवास सात सायकल स्वारांनी (वयोगट ५५ ते ६६) अवघ्या १२ दिवसात पूर्ण करणाऱ्या सिंहगड ग्रुपच्या सदस्यांना ओयासिस काउंसेलर्स फाऊंडेशन तर्फे सन्मानित करण्यात आले. ओयासिस काउंसेलर्स फाऊंडेशन ही समाजसेवी संस्था मनोशारीरिक विकास, मानवता, आरोग्य, शिक्षण व सेवा या क्षेत्रात कार्यरत आहे. युवकांनी यातून प्रेरणा घेऊन “गॅझेट टू ग्राउंड” जाण्याचा गुरुमंत्र फाउंडेशन चे संस्थापक अध्यक्ष डॉ राजेंद्र मोरे (आर्मी मेडिकल कोर-से. नि.) यांनी प्रास्ताविक भाषणात दिला. कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे प्रा. ॲड. नितीन कदम, गडकोट प्रेमी, मृ.ए.सो. सांगवी चे अध्यक्ष मा.सुहास तळेकर, प्रा. क्षितिज कदम उपस्थित होते. श्री. सुनील तांबे यांनी पुणे ते कन्याकुमारी सायकल प्रवासा चे रोमांचकारी अनुभव कथन केले. जीवनामध्ये आपण असे काम केले पाहिजे की, पुढच्या पिढीला त्यातून काहीतरी आदर्श घेता आला पाहिजे असे मौलिक विचार प्रा.ॲड. नितीन कदम यांनी व्यक्त केले. पसायदानाने कार्यक्रमाची सांगता झाली. सुत्रसंचलन सचिव समृद्धी मोरे व आभारप्रदर्शन डॉ राजेंद्र मोरे यांनी केले.