09/03/2020
I will like to share a post by dr.keskar about Mask awareness
*🥀करोना व्हायरस ची छाया झाली गडद ! .... कोणता मास्क वापरू ? .... जनतेला भेडसावतोय प्रश्न भयानक !🥀*
*🌹डॉ पद्मनाभ केसकर*
EMS Instructor , Ruby Hall Clinic , Pune
मोबाईल ९७६२२५८६५०
सध्या Corona virus च्या भीती मुळे मोठ्या प्रमाणावर परदेशात मास्क खरेदी करण्यासाठी झुंबड उडली आहे तसेच मास्क चा तुटवडा मोठ्या प्रमाणावर भासत आहे .... भारतात पण थोड्याच दिवसात हि परिस्थिती उद्भवणार आहे . परदेशातील नातेवाईक , माझे पेशंट्स मला जेव्हा सल्ला विचारतात कि कोणता मास्क वापरू ? तेव्हा ३ पर्याय समोर दिसतात -
१) कापडी disposable surgical मास्क
२) N95
३) कोणताच मास्क वापरण्याची गरज नाही
या वरीलपैकी कोणता पर्याय बरोबर आहे ?
याचा मी थोडा अभ्यास करायचा ठरवला - त्यासाठी काही संदर्भ अभ्यासले , WHO च्या guidelines विचारात घेतल्या तसेच काही तद्न्य डॉक्टरांशी , चेस्ट फिजिशियन शी चर्चा केली आणि खाली दिलेले उत्तर तयार केले ... काही मतभिन्नता असू शकतात .
*🌹डॉ पद्मनाभ केसकर*
EMS Instructor , Ruby Hall Clinic , Pune
मोबाईल ९७६२२५८६५०
*उत्तर -*
ढोबळमानाने मास्क चा विचार केला तर २ प्रकारात विभागणी होते -
*🌸१) सर्जिकल मास्क*
जे सर्वसामान्य जनतेतला अपेक्षित असतात .
हे non-woven फॅब्रिक ( polypropylene ) पासून बनवलेले असतात .
हे स्वस्त असतात .
हे droplet infection पासून संरक्षण करतात .
🌸हे disposable असतात म्हणजे एकदा वापरून फेकून देणे अपेक्षित असते - यांचे आयुष्य साधारण ३ ते ८ तास असते ( भारतीय जनता हे मास्क दिवसोंदिवस वापरत राहते ... जेवताना , खाताना , रात्री झोपताना टेबल वर काढून ठेवायचा - परत उचलायचा - नाका तोंडावर बांधायचा - या मुळे उलट न होणारे इन्फेकशन होण्याचा संभव असतो )
या मास्क ची रोजच्या रोज योग्य पद्धतीने विल्हेवाट लावणे गरजेचे असते ( proper disposal ) अन्यथा त्यातील स्रावाने उलट साथ जास्त पसरण्याचा धोका जास्ती राहतो .
*हे मास्क - Exhaling इन्फेकशन स्प्रेड रोखण्यासाठी वापरले जातात* आणि त्या अनुषंगाने त्याचे टेस्टिंग केलेले असते . म्हणजे ज्याला सर्दी - खोकला झालेला आहे त्याने हा मास्क वापरल्यास त्याच्या सर्दी - खोकल्याचे droplet भोवतालच्या वातावरणात पसरत नाहीत आणि इन्फेकशन स्प्रेड रोखला जातो .
✅सर्जिकल मास्क हा चेहऱ्यावर बसताना त्याचे प्रॉपर सिलिंग होत नाही व बाजूने बाहेरील हवा आत जात राहते त्यामुळे बाहेरील infection आत जाऊ न देण्यात हा मास्क फार प्रभावी काम करत नाही .
Inhaled म्हणजे श्वसनात बाहेरून आत जाणारे इन्फेकशन मग ते कोरोना व्हायरस ( COVID 19 ) असो किंवा H1N1 असो किंवा अन्य कोणतेही व्हायरल इन्फेकशन असो ते रोखण्यात या मास्क चा फार उपयोग नाही . ( सध्या एक पोस्ट व्हायरल होते आहे - करोना व्हायरस चा आकार मोठा असल्याने सर्जिकल मास्क वापरला तरी या विषाणू पासून संरक्षण होईल याला काहीही आधार नाही ( No evidence based proof ) )
*२) Respirator मास्क*
या गटात N95 या मास्कचा समावेश होतो .
या मध्ये असलेल्या फिल्टर च्या quality प्रमाणे याचे ३ प्रकार मिळतात - FFP1 , FFP2 , FFP3 .
✅यातील - FFP2 व FFP3 या प्रकारच्या फिल्टर ने - Corona ( COVID १९ ) , H1N1 , SARS , MERS व इतर सर्व व्हायरस फिल्टर होतात .
या प्रकारच्या ( N95 ) मास्क ने Inhaled इन्फेकशन म्हणजे बाहेरून आत मध्ये जाणारे इन्फेकशन , सूक्ष्म धूलिकण , घातक गॅसेस रोखले जातात व या मास्कचे टेस्टिंग - Inhaled रूट च्या अनुषंगाने झालेले असते .
हे मास्क Disposable ( एकदा वापरून फेकून देणे ) आणि Reusable ( फिल्टर बदलून परत वापरता येणारे ) अशा दोन्ही पद्धतीत मिळतात .
Corona virus ( COVID 19 ) व अन्य virus ने बाधित रुग्णांचे उपचार करणाऱ्या डॉक्टर्स नी रुग्णांपासून स्वतःला infection होऊ नये म्हणून हा मास्क वापरणे अपेक्षित आहे तसेच Virus ने बाधित रुग्णाची सेवा करणाऱ्यांनी पण बचावासाठी हा मास्क वापरणे अपेक्षित आहे .
All healthcare providers who are treating confirmed or suspected cases of COVID 19 should wear N95 mask of FFP2 or FFP3 category .
सर्वसामान्य जनतेने काहीही त्रास नसताना केवळ साथीत स्वतःचा बचाव करण्यासाठी हा मास्क वापरण्याची काही गरज नाही .
म्हणजे वरील प्रश्नातील तिन्ही पर्याय बरोबर आहेत .
COVID 19 अर्थात सध्या सुरु असलेल्या Corona virus च्या साथी दरम्यान Mask वापरा संबंधी खालील पद्धतीने strategy असावी म्हणजे resources वर ताण पडणार नाही -
*🌹१) No Mask of any type - ज्यांना सध्या कोणताही त्रास नाही ( सर्दी , खोकला , ताप इत्यादी ) त्यांनी भीती पोटी कोणताही मास्क वापरायची गरज नाही* .
✅केवळ गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळणे , हस्तांदोलन टाळणे , मेटल रेलिंग , दरवाजे - कड्या व इतर सार्वजनिक वस्तूंना हात लावल्यास Sanitizer ने किंवा साबणाने हात धुणे तसेच घशात खवखव वाटल्यास त्वरित कोमट पाण्यात मीठ टाकून गुळण्या करणे इत्यादी उपाय करावेत .
*शिंकताना किंवा खोकताना तोंडावर हात ठेवावा ही पारंपरिक समजूत चुकीची आहे* त्याने तुमचा हात हा Virus चे आगार बनते व त्यानंतर तुम्ही जिथे जिथे हात लावता तिथे तिथे हे virus स्प्रेड होतात , पुढील व्यक्तीने त्या जागेला / वस्तूला हात लावला की त्याच्या हातावर ते Virus चिकटतात व त्याने नाका तोंडाला हात लावला की त्याच्या शरीरात जातात .
*म्हणून शिंकताना - खोकताना तोंडावर हाताचे कोपर ठेवून शिंकावे* हाताचा हा भाग सहसा कुठेही touch होत नाही w काही वेळात बाह्य तापमानाला हे तिथे चिकटलेले Virus स्प्रेड होण्याआधी मरून जातात .
✅The Corona virus can travel via coughing and sneezing for a distance of about 2 metres. And can settle on surfaces, doors , k***s and stay alive for upto 2 hours. So the mechanism for Transmission of this viruses will be majorly via the surfaces.
Better to avoid touching surfaces, door k***s, balcony and staircase railing, etc.,
*✅ मास्क पेक्षा महत्वाचे म्हणजे Hand hygiene, वारंवार साबणाच्या पाण्याने हात धुणे , गुळण्या करणे , प्रतिकार शक्ती वाढवणे जास्ती महत्वाचे आहे .*
*🥀२) Simple Surgical Mask - ज्या व्यक्तीला सर्दी , खोकला आहे तिने हा मास्क वापरावा* त्यामुळे त्याचे droplet इन्फेकशन बाह्य वातावरणात पसरत नाही . घरात सर्दी - तापाचा रुग्ण असेल तर इतरांनी सुद्धा हा मास्क वापरण्यास हरकत नाही .
या मास्कचा तुटवडा भासल्यास आजारी रुग्णांनी मोठा सुती रुमाल त्रिकोणी घडी करून नाका तोंडावर बांधला व रोज तो गरम पाण्यात साबणाने धुतला तरी त्यांच्यापासून इतरांना droplet मार्फत होणारे व्हायरल इन्फेकशन टाळता येते .
*🌸३) N95 मास्क - ज्याला आपण Respirator मास्क म्हणतो तो महाग असतो व त्याची उपलब्धता पण कमी असते . तो केवळ *Corona virus किंवा अन्य virus iinfection ची बाधा झालेल्या रुग्णाला ट्रीटमेंट देणाऱया डॉक्टर्स नी हा mask वापरणे अतिशय गरजेचे आहे तसेच Corona virus ग्रस्त रुग्णाची सेवा करणाऱ्या त्याच्या घरातील जवळच्या नातेवाईकांनी हा मास्क वापरणे सुरक्षिततेच्या दृष्टीने गरजेचे आहे .*
*कोणताही मास्क लावताना किंवा काढताना त्याच्या पुढील भागाला स्पर्श करू नये , पाठीमागून मास्क काढावा किंवा घालावा*
सध्या सुरु असलेल्या COVID 19 साथीच्या वेळी घाबरून सर्वांनीच घरात बसणे हे त्या देशाच्या Economy च्या दृष्टीने योग्य नाही ... किती काळ घरात बसाल ? ... स्वस्थ लोकांनी घराबाहेर पडायला काहीही हरकत नाही , पण होता होईल तो सार्वजनिक गर्दीची ठिकाणे टाळावीत . उलट *ज्या लोकांना सर्दी , खोकला , ताप आहे त्यांनी पूर्ण बरे होईपर्यंत घरामध्ये स्वतःला विलग ( Isolation ) करावे व गर्दीच्या ठिकाणी जाऊ नये*
*🌹डॉ पद्मनाभ केसकर*
EMS Instructor , Ruby Hall Clinic , Pune