02/01/2024
गायीचे दूध प्यावे की म्हशीचे दूध हा वैद्यांना विचारला जाणारा खूप कॉमन प्रश्न!
याचं उत्तर आहे आपल्याला, आपल्या प्रकृतीला, अवस्थेला अनुरूप असे दूध आपण प्यावे.
गायीचे दूध हे जीवनीय, रसायन, धातूंची पुष्टी करणारे, बुद्धिवर्धक, स्तन्यजनन तसेच सारक आहे. त्यामुळे ज्यांना उष्णतेचे त्रास आहेत, ज्यांना शरीराचे पोषण करायचे आहे, अभ्यास करायचा आहे, मलावष्टंभचा त्रास आहे त्यांनी गायीचे दूध घ्यावे.
म्हशीचे दूध गायीच्या दुधापेक्षा थंड आणि जड आहे. त्यामुळे ज्यांना भरपूर भूक लागते, ज्यांना कफाचे आजार होत नाहीत त्यांनी हे दूध घ्यावे. जड असल्याने हे दूध वजन वाढवणे, शरीर कमावणे याच्या उपयोगाला येते. तसेच ज्यांना झोप लवकर येत नाही, अथवा निद्रानाशाचा त्रास आहे त्यांनी म्हशीचे दूध घ्यावे.
यामध्ये गाय व म्हैस यांची habitat लक्षात घेणे महत्वाचे आहे. गाय ही चारा शोधत फिरते. तर म्हैस ही बराच वेळ एकच ठिकाणी बसून रवंथ करत राहते. या गोष्टीचा त्यांच्या दुधावर परिणाम होत असतो. त्यामुळे ज्यांना diabetes आहे, वजन जास्त आहे, अंगात उत्साह नाही, आळस जास्त आहे त्यांनी म्हशीचे दूध टाळावे!