22/08/2019
कंबरदुखी ( Back Pain)
कंबरदुखी हे एक सर्वसामान्य आजार आहे. दिवसातील जर सर्वसाधारण १० पैकी आपण म्हणू ४ रुग्ण हे ह्याच आजाराचे असतात. प्रत्येक वयोगटात ह्याचे रुग्ण असतात असे म्हंटले तरी हरकत नाही . कंबर दुखी हा विषय का तर आज काही झाला तरी MRI करूयात किंवा करा हि नवीनच ट्रेंड सुरु झाली आहे , तसेच काही रुग्ण हीच कंबरदुखी अंगावर काढून घेतात आणि त्याचे शेवट operation करून घेणं ,लोकांच्या मनातला शंका कुशंका कंबरदुखी बाबतीत सर्व गोष्टी मी डॉ निखिल हिवरकर तुम्हाला समजावण्याचा प्रयत्न करेल.
पाठदुखी साठीचे करणे :
१. वजन जास्त असणे ( obesity )
२ . जड वजन उचलणे ( जिम , कामावर वजनदार वस्तू उचलणे इत्यादी )
३. वयोमानाने ( जसे वय वाढत जाते तसे मणक्याचे त्रास सुरु होतात कारण एकच वयोमानाने होणारी झीज आणि कॅल्शियम ची कमतरता.)
४ . मार लागणे किंवा पडणे किंवा आज कालच्या जगात सर्वसामान्य म्हणजे गाडी वरून पडणे
५ . उशीर परियंत बसून काम करणे किंवा खूप वेळ उभा राहून काम करणे
६. सांधिवात
७. मणक्याचा टी .बी / कॅन्सर (metastasis )
असतील इतर हे कारण असू शकतात पण ९९% हि करणं असतील .
कंबरदुखी ची लक्षणे :
कंबर दुखी हे सौम्य किंवा तीव्र , अचानक किंवा दीर्घकालीन असू शकते.
१. - हे दुखणे एकतर कंबरे पुरतच राहू शकते अथवा ते दुखणे पाया कडे सरकू शकते ( ज्याला आपण RADIATING pain म्हणू )
२. कंबर दुखी वाकून काम करताना तीव्र होऊ शकते किंवा बसून आणि काही जड उचल्याने हे दुखणं वाढू शकते
३. बऱ्याच रुग्णांमधी कंबर दुखी आराम करून किंवा झोपल्यानंतर बरं वाटतं.
४. पायाला मुंग्या येणे बधिरपणा असणे किंवा पायातील ताकद कमी होणे ( ह्या पैकी लक्षणं असणे म्हणजे ह्याला तपास करणे गरजेचे आहे )
५ . वयोमानाने होणाऱ्या कंबरदुखी सोबत कुबड येणे हे हि असू शकते
६. काही वेळ चाल्यानंतर जर कंबर दुखी किंवा पायाकडे येणारे दुखणे वाढू शकते ( claudication )
७. जर कंबर दुखी ची करणं टी. बी असेल तर कंबरदुखी सोबत इतर टी. बी चे लक्षणं असतील .
कंबरदुखी साठी ट्रीटमेंट :-
निदाण करण्या साठी बऱ्याच वेळेस - XRAY ,MRI किंवा CTSCAN ची गरज लागू शकते.
कंबरदुखी जर तीव्र आणि दीर्घकालीन असेल तर त्यांना उपचार करणे गरजेचे आहे
१. गोळ्या औषध ( ह्या मध्ये pain killer , muscle relaxants, calcium चा समाविष्ट होतो)
२. फिजीओथेरपी physiotherapy ( ह्या मध्ये ट्रकशन शेख व इतर मशीन चा वापर करून दुखणं कमी करता येते )
३. NERVE ROOT BLOCK ( ज्याला आपण मणक्यातील दिलेलं इंजेकशन असा म्हणू )
४. शस्त्रक्रिया ( शेवटचा पारियाय किंवा गरज असल्यास OPERATION करून हे दुखणं कमी करावा लागत.