20/09/2024
बालाजी शिक्षण प्रसारक मंडळामध्ये दिले संस्काराचे धडे
बालाजी शिक्षण प्रसारक मंडळाचे बालाजी विश्व विद्यालय (सेमी इंग्रजी )व बालाजी इंग्लिश मीडियम स्कूल (CBSE) मध्ये नेहमीच विद्यार्थ्यांसाठी व शिक्षकांसाठी संस्कारक्षम व्याख्याने आयोजित केले जातात. सध्याची पिढी वाहवत चालली असल्याने वेगवेगळ्या माध्यमातून त्यांना मार्गदर्शन करणे ही काळाची गरज ठरली आहे म्हणून बालाजी शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष सदाशिव आण्णा पवार यांनी संस्कारक्षम व्याख्यानाचे आयोजन केले होते. दि. 19 सप्टेंबर रोजी रोटरीयन डॉ.सुमेधा भोसले आणि डॉ.मनोज गोखले यांनी शिक्षकांना व विद्यार्थ्यांना अतिशय मोलाचे मार्गदर्शन केले. बालाजी विश्व विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री .विनायक म्हसवडे यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला.दोन्ही विद्यालयाच्या मुख्याध्यापकांनी पाहुण्यांचा
शाल श्रीफळ आणि सन्मान चिन्ह देऊन सत्कार केला. आजच्या पिढीला भेडसावणाऱ्या समस्या व त्यावरील उपाय याविषयी मार्गदर्शन करण्यात आले. नेहमी वाचन करावे,शरीरिक व मानसिक स्वास्थ्य अबाधित राहण्यासाठी व्यायाम करावा, ध्यानधारणा, प्राणायाम करावा,सकस चौरस आहार घ्यावा, मोबाईलचा अतिवापर टाळावा, नेहमी सकारात्मक विचार करावा.या विषयी मार्गदर्शन केले.बालाजी इंग्लिश मीडियम स्कूल चे मुख्याध्यापक गणेश मिटपल्लीवार यांनी उपस्थितांचे आभार मानले.अतिशय आनंदाच्या वातावरणात कार्यक्रम पार पडला.