04/07/2022
स्वामी विवेकानंद, एक तरुण आदर्श, एक महान विद्वान, "युग प्रवर्तक" ज्यांनी संपूर्ण जगाला आपल्या ज्ञानाच्या अफाट संपत्तीने आणि शक्तिशाली विचारांनी भारतीय संस्कृतीच्या सुगंधाने फुलवले. त्स्वामी विवेकानंद यांनी आपल्या अमोघ तत्वज्ञानातून युवकांना प्रेरणा दिली. "उठा! जागे व्हा!! आणि ध्येय प्राप्त झाल्याशिवाय थांबू नका" या प्रेरणादायी वाक्यांमधून तरुणांना प्रेरित केले भारतीय सनातन संस्कृतीची ध्वजा सातासमुद्रापार नेणारे स्वामी विवेकानंद .'प्रेम, बंधुता आणि सद्भावनेने जीवनातील प्रत्येक संघर्षाला सामोरे जाता येते', हे स्वामी विवेकानंद यांचे अनमोल विचार प्रत्येकासाठी प्रेरणादायी आहेत. भारतीय तत्त्वज्ञानाचा विश्वामध्ये प्रसार करणारे महान तत्त्वज्ञ स्वामी विवेकानंद.
स्वामी विवेकानंदांनी भारतीय संस्कृतीची व्यापकता आणि सर्वसमावेशकता संपूर्ण जगाला पटवून दिली. भारतीय समाजाने विशेषतः देशातील तरुणांनी भारत मातेलाच आपले दैवत मानून तिच्या सर्वांगीण विकासासाठी प्रयत्न केले पाहिजे, असे त्यांनी सांगितले. तरुणांना त्यांनी केलेले उपदेश हे आज अनुकरणीय आहेत, त्यामुळे त्यांच्या विचारांचा प्रचार आणि प्रसार करणे गरजेचे आहे .स्वामी_विवेकानंदयांच्या स्मृती दिनानिमित्त विनम्र अभिवादन..!🙏