
03/09/2025
10 ते 15 वर्षापूर्वी 20 ते 35 वयाच्या युवकांमध्ये #उच्च_रक्तदाब दिसत नव्हते. आता याच वयोगटात आत्ता 35 ते 45 टक्के तरुण हा अधिक रक्तदाब घेऊन फिरताना दिसतात.
@ #कारणे स्पर्धात्मक आयुष्य, कामाचा ताण, कमी आराम, निकृष्ट दर्जाचा आहार, हालचाल नाही, लहानपणाच्या लठ्ठपणा, स्मोकिंग आणि दारू
@ #सिस्टोलिक वरचा आकडा (हृदय आकुंचन वेळ) 120 पासून पुढे 160 पर्यंत #डियास्टोलिक खालचा आकडा (हृदय प्रसारण वेळ) 90 पासून 120 पर्यंत सतत राहणे हे अधिक धोकादायक असते.
@ #वाईट_कोलेस्टेरॉल रक्त वाहिन्यांच्या आतील स्तरांमध्ये वाढते. रक्त पुढे जाण्याचा मार्ग अरुंद होतो, पुढे रक्त पुरवठा कमी दाबाने होत होत अचानक बंद होतो म्हणजे अटॅक बसतो. हीच गोष्ट प्रत्येक महत्त्वाच्या अवयवाबद्दल होते, कल्पना करा मेंदू, हृदय, किडनी, लिव्हर इ.
@ #उपाय लाईफ स्टाईल बदल, तपासण्या करून डॉक्टरांच्या कडून मेडिसिन्स चालू करणे.
@ #तपासण्या lipid profile, LFT, KFT, sodium potassium balance, uric acid, sugar level, urine albumin creatinine ratio, इ.
@मीठ, साखर कमी करणे, देखरेखी खाली योग्य तो व्यायाम (जिम, योगा वा इतर प्रकार) करून वजन कमी करणे, #आहार हिरव्या पालेभाज्या, फळभाज्या, फळे, डाळी, कडधान्ये, ड्राय फ्रूट, बिया घेणे, बेकरी उत्पादने कमी करणे, #तेल_तूप प्रमाणात आणि हृदयासारख्या अवयवांना पोषक असे वापरणे,
@ #आनंदी आणि #सकारात्मकता वागण्यात बोलण्यात आणि विचार करण्यात ठेवणे इ.
-डॉ. #नितिन_शिवराम_लोंढे.
(Preventive medicine, Life style modification, diet and yoga therapy expert)
(जनशिल हॉस्पीटल, नेहरूनगर)