12/10/2015
महाराष्ट्र राज्यातील सर्व केमिस्ट बांधवांना नम्र विनंती आहे की
येणाऱ्या 14 ऑक्टोबर च्या आंदोलनात सक्रीय सहभाग घेऊन ONLINE औषध विक्री करणाऱ्या विरोधात एकत्र येऊन संघटनेच्या लढ्याला यशस्वी करायचे आहेत...
मागील काही वर्षापासून देशभरात "~ONLINE~"
शॉपिंग च्या नावावर बाजारातील वस्तु घर बसल्या खरेदी करण्याचे खुळ आपल्या देशातील लोकांना लागले आहे, पिझ्झा,बर्गर, आमलेट, सैंडविच,केक..... अश्या वस्तु पासून सुरुवात झालेला "~ONLINE~" शॉपिंग चा बाजार नंतर किराणा, कपड़ा,ज्वेलरी,शूज,सौंदर्य प्रसाधने,इलेक्ट्रिल सामान, लैपटॉप,कॉम्पुटर, मोबाईल आणि आता औषधी विक्री पर्यन्त हा "~ONLINE~"
शॉपिंग चा भस्मासुर पोहचला आहे.
ज्या मुळे देशभरातील रिटेल, व्होलसेल,घाऊक औषधी विक्री करणाऱ्या केमिस्ट बांधवांवर विपरीत परिणाम होणार तर आहेतच सोबतच सामान्य जनतेच्या आरोग्यला घातक अश्या गोळ्या औषधी ज्या डॉक्टर च्या सल्याशिवाय नियमाने विक्री करताच येत नाही, अश्या औषधीची हे "~ONLINE~" शॉपिंग वाले बिनभोभटपणे विकतील त्या मुळे समाजाचे सार्वजनिक आरोग्य धोक्यात येऊन त्याचा विपरीत परिणाम होईल
उदा . नशा करिता वापरल्या जाणारी addicted औषधि,सेक्स करिता वापरल्या जात असलेली औषधे कामोत्तेजक औषधे गर्भपाताची औषधे झोपेची औषधे हि विनासायास मिळतील व त्यामुळे सामाजिक स्वास्थ बिघडेल
👍♻♻♻✊
आम्ही आजपर्यंत समाजाचे आरोग्य रक्षक म्हणून काम केले असून हे "~ONLINE~" वाले आरोग्य भक्षक बनू पाहत आहेत म्हणून आम्ही याला विरोध करीत आहोत . समाजाने आम्हाला सहकार्य करावे हि विनंती करावी
हे भूत घालवण्यासाठी चळवळ उभी करावी लागेल व केमिस्ट फार्मासिस्ट च अस्तित्व टिकविन्याकरिता
प्रत्येक केमिस्ट सदस्याला ही आपली वैयक्तिक जबाबदारी समजून या आंदोलनात उस्फुर्त सहभाग घेऊन, आपल्या कड़े आलेल्या प्रत्येक कस्टमरला ह्या "~ONLINE~"औषधि ने होणारे दुष्परिणाम आणि त्या मुळे समाजात वाढत जाणारी नशेची सवय ह्या सर्व गोष्टी बद्दल माहीती देऊन जनतेच्या आरोग्या बाबत आपले महत्व किती आहे ह्याची जाणीव त्यांना करून द्यावी...!
प्रत्येक केमिस्ट बांधवाने ह्या लढ्यात सक्रिय सहभाग घेऊन या आंदोलनाला यशस्वी करावे...|
"~ONLINE~MEDICINE~SHOPING~" ला विरोध करून यावर बंदी घालण्याची मागणी सरकार कड़े करावी... ही नम्र विनंती
🙏🙏✊🙏🙏
आपल्या आस्तित्वसाठी
झटणाऱ्या आपल्या सर्वांचे लाडके नेतृत्व मा.आप्पाजी व मा.अनिल भाऊ नावंदर आणि संघटनेतील सर्व पदाधिकार्यांचे हात बळकट करावे.
आरोग्याचे अग्रदूत आम्हीच आहोत हे जनता आणि प्रशासनाला दाखवून द्यावे
✊♻♻♻✊
🙏🙏धन्यवाद🙏🙏