18/03/2022
कंबरदुखीसाठी आयुर्वेदीय पंचकर्म उपचार !
सध्या कंबरेच्या दुखण्याचे प्रमाण वाढत चालले आहे. व्यक्ती स्त्री असो की पुरुष, तरुण असो की वृद्ध, सर्वांमध्ये हा त्रास आढळतो कंबरदुखी नेमकी कशामुळे होत आहे याचे कारण शोधणे प्रामुख्याने आवश्यक असते. ते न शोधताच स्वतःचे स्वतः उपचार केले तर ते तापदायक ठरू शकते. म्हणून सर्वप्रथम कंबरदुखीची विविध कारणे लक्षात घेतली पाहिजेत.
पाठीच्या मणक्यांच्या काही विकृतीमुळे कंबरदुखी होते. स्पॉण्डयलोसिसी(Lumbar Spondylosis / Spondylitis) या आजारामध्ये पाठीच्या मणक्याचे हाड, कार्टिलेज आणि डिस्क वर विपरीत परिणाम होतो. यामध्ये हाडांची झीज होते, गादी सरकते(Disc Bulge),नस दबते(Nerve Compression), सांध्यांना सूज येते(Arthritis). यामुळे कंबरेत हालचाल करतानी देवांना होतात. कडकपणा जाणवतो. या मणक्यांच्या बाजूला असलेली स्नायूबंधने दुखावल्यास देखील तीव्र स्वरूपाची कंबरदुखी निर्माण होते, म्हणून कंबरदुखी अस्थीमधील विकृतीमुळे आहे की, स्नायूंतील विकृतीमुळे आहे हे समजणे आवश्य असते.
सायटिका मज्जातंतूमध्ये ही शरीरातील सर्वात मोठी मज्जातंतू आहे, जी कमरेखालील भागातून सुरू होऊन नितंबाद्वारे तुमच्या टाचांपर्यंत पोहोचते. यामुळेच सायटिका मज्जातंतूमध्ये समस्या निर्माण झाल्यास कमेरखालील संपूर्ण भाग प्रभावित होतो. सुरुवातीला केवळ कमरेमध्ये वेदना जाणवतात. पण यानंतर होणाऱ्या वेदना असह्य ठरू शकतात. कमरेनंतर हळूहळू तुमचे नितंब (Hips) त्यानंतर पायापर्यंत दुखणे वाढत जाते. या समस्यांमुळे कमरेखालील भागात दुखण्याव्यतिरिक्त अशक्तपणा किंवा मुंग्या आल्यासारखं वाटू शकतं.तसंच दोन्ही पायांऐवजी एकाच पायात हा त्रास जाणवू शकतो.
शरीरातील चरबीचे प्रमाण वाढून त्यामुळे शरीराची जाडी वाढल्यानेही कंबरदुखीचा त्रास होऊ शकतो.
स्त्रीवर्गामध्ये या त्रासाचे प्रमाण फार मोठे आहे असे दिसते. गृहिणीला घरकामाचा पडणारा ताण तसेच गर्भाशयाशी संबंधित काही तक्रारी या कंबरदुखीस कारणीभूत ठरतात. यामध्ये मासिक पाळीच्या तक्रारी, अंगावर पांढरे जाणे (ज्यास श्वेतप्रदर म्हटले जाते.) अशा तक्रारी स्त्रियांमध्ये कंबरदुखी निर्माण करतात. अशाप्रकारे यापैकी कोणत्याही एक किंवा अनेक कारणांनी निर्माण झालेली कंबरदुखी मनुष्याला अस्वस्थ करते. बसताना किंवा उठताना कंबरेच्या ठिकाणी तीव्र किवा सौम्य अशा वेदना जाणवतात.
लक्षण
कंबर दुखणे, सकाळी उठताना बसताना त्रास होणे , कंबरेत एक प्रकारचा कडकपणा असणे , जास्त वेळ बसून राहिल्यास पाठ दुखणे, कंबर, नितंब आणि पायांमध्ये हलक्या स्वरुपात दुखणे, कमरेच्या तुलनेत पायांमध्ये अधिक वेदना होणे, एकाच पायात तीव्र वेदना जाणवणे, पायांसह पायांचीही बोटेही दुखणे, कंबर आणि पायांमध्ये मुंग्या येणे, पायांमध्ये जीव नसल्याची जाणीव होणे
पाठ-मान-कंबर दुखी हा हाडांशी व पर्यायाने वाताशी सबंधीत आजार आहे, यासाठी वात दोष कमी करणारी बस्ति पंचकर्म, वेदनाशामक कटीबस्ती, रक्तमोक्षण, जलोका, आग्निकर्म, स्नेहन-स्वेदन यांचा प्रभावी उपयोग होतो. त्याचप्रमाणे इतर आयुर्वेदिय ओषधाने या आजारावर प्रभावी व गुणकारी उपचार होऊ शकतात. यासाठी आजाराच्या सुरुवातीच्या आवस्थेत आयुर्वेदिय उपचार व शरीर शुध्दी पंचकर्म केल्यास आजार लवकर आटोक्यात येऊ शकतो
पंचकर्म
बस्ती पंचकर्म:- आयुर्वेदानुसार वाढलेला वात कमी करण्यासाठी बस्ती चिकित्सा लाभदायक ठरते. मोठे आतडे म्हणजे पक्वाशय हे वाताचे स्थान आहे, या भागात तैल काधायुक्त औषधी सोडल्यास वातशमन होते, यामुळे बस्ती चिकित्सा वातदोषासाठी, वाताच्या आजारासाठी, कंबरदुखीसाठी अतिशय गुणकारी ठरते. यात मालीश शेक करुन संडासच्या मार्गात विविध औषधी, तैल काढे सोडले जातात.
कटीबस्ती:- पिठाची पाळ करुन औषधीयुक्त तैल कंबरेच्या ठीकाणी जीरवणे होय. यामुळे वेदना, सुज, हाडाची झीज, कमकुवतपणा कमी होऊन सांध्याना मजबुती मिळते. स्पॉण्डयलोसिसी, हाडांची झीज होते, गादी सरकते, नस दबते, सांध्यांना सूज येते. यासाठी अतिशय फायदेशीर दिसून येते
रक्तमोक्षण:- सांध्याच्या आजारामध्ये वातदोषासह रक्तदोष देखील वेदना व सुज निर्माण करण्यास कारणीभुत असतो. सांध्यातील हा रक्तदोष कमी करुन वेदना शमन करण्यासाठी जलोकावचारण (जळुच्या साहय्याने रक्त काठणे) उपयोगी ठरते. वेदना व सुज कमी करुन सांध्याना मजबुती मिळते.
धन्यवाद
डॉ सचिन गायकवाड - पाटील (M.D.)आयुर्वेद
श्री विश्वांकूर आयुर्वेद
स्वतंत्र सैनिक कॉलनी
निराला बाजार
औरंगाबाद
८२३७५२३७२२ / ९४२०२७०७८५