07/04/2020
कास / खोकला
( डॉ सचिन नांदेडकर )
सौ .शेख ( वय ३९ ) , माझे कोणतेही औषध घेण्याची तयारी आहे फक्त मला पातळ औषध नको . का नको ? असे विचारल्यावर आधीच तोंडस चव नाही त्यात कफ सिरप घेतल्यावर तात्पुरते बरे वाटून आठवडे आठवडे तोंडाची चव जाते असे उत्तर आले . तालीसादी चूर्ण वा अन्य औषधे आठवडाभर दिल्यावर काही प्रमाणात खोकला कमी झाला . रात्रीचा मांसाहार पूर्ण बंद करणार असाल तरच पुढचे औषध देईन असे सांगून तेच औषध ४ ते ५ वेळा १५ दिवसांसाठी दिल्यावर काही वर्षांचा खोकला बरा झाला . खोकला तत्काळ बरा करणे आवश्यक अन्यथा त्याचे रुपांतर क्षयात होते . व्यवहारात कोरडा ( वात ) ओला ( कफ ) असे खोकल्याचे लाक्षणिक दोन प्रकार करता येतात .
सामान्य कारणे :
फ्रीजचे गार पदार्थ , तळलेले , दीर्घ उपवास , विरुद्ध आहार, वारंवार सर्दीसाठी औषध घेणे, वेग धारण , दिवसा झोपणे , रात्रीचे जागरण , गार पाण्याने आंघोळ , पडजीभ = टोन्सिल्स सूज, मोठ्याने ओरडणे , रात्री जेवणानंतर फळे , मिठाई खाणे , अपक्व मांस सेवन , जेवणानंतर ताक इ .
लक्षणे :
घसा दुखणे , कोरडी ढास लागणे , शिर शुल , घशात टोचणे , स्वरभेद , घसा , पडजीभ , टोन्सिल्स यांची सूज , कफ पडणे , ताप , निद्रानाश , छातीत वेदना , श्वास ..
चिकित्सा :
१ ) आहार विहारातील कारणे अगोदर थांबवावी .
२) छाती पाठ शेकणे , कोरडा खोकला तेल लावून शेकावे
३) गरम पाण्याच्या गुळण्या सकाळी रात्री .
४) धने , जीरे , लवंग , सुठ चहा .
५) हळद दुध सकाळ रात्री . लंवंग वेलदोडा चाटण मधासह .
६) पंचकर्म : लेप , स्वेदन , वमन , विरेचन , बस्ती , नस्य इ
७) औषधे : सितोपलादी चूर्ण , तालोसादि / मरीचादि / लवंगादि वटी / पिप्पाल्यासव, कानाकासव ,यष्टी घन , कासकुठार , लक्ष्मी विलास , च्यवन प्राश , अमृत प्राश इ
( अवस्थेनुरूप आयुर्वेद डॉक्टर / वैद्य सल्ल्यानेच .. )
आमचे काही विद्यार्थी वैद्य मित्र वैद्यकीय अधिकारी आहेत , क्षयाचा खोकला व त्यासाठी औषधोपचार त्यांना नित्याचे आहे . कासासाठी त्यांनी आयुर्वेदीय औषधे दिल्यानंतर ड्रग रेझीस्टन्स जाऊन पुन्हा लक्षणे निर्माण होण्याचे प्रमाण बर्याच रुग्णात कमी झाले असा त्यांचा अनुभव आहे . रसायन चिकित्सेचा यासाठी उत्तम उपयोग होतो .
Dr Sachin Nandedkar
# Ayurvedmitra clinic # ABC : Morn : Kelkar Rd., 513 Shaniwar Peth ,Pune 30 .
# Laxmi Road : Even : Sai Platinum , 559 Sadashiv Peth , Pune 30.
Ph : 020 24453939 / 9960224989
itpayurveda.com
https://www.facebook.com/Dr-Sachin-106683704229477/