Sukhin Ayurved

Sukhin Ayurved 'Sukhin' in Sanskrit means, a person with balanced state of physical and mental health. We are committed towards patients to help them to be a ' Sukhin'.

07/10/2018
उद्या नक्की या, आम्ही वाट पाहत आहोत 🙏🏻🙏🏻||आग्रहाचे निमंत्रण||||अर्धतपपूर्ती स्नेहसोहळा||7- ऑक्टोबर - 2018रविवारप्रमुख पा...
06/10/2018

उद्या नक्की या, आम्ही वाट पाहत आहोत 🙏🏻🙏🏻

||आग्रहाचे निमंत्रण||
||अर्धतपपूर्ती स्नेहसोहळा||
7- ऑक्टोबर - 2018
रविवार
प्रमुख पाहुणे - श्री श्याम देशपांडे , वैद्य संतोष सूर्यवंशी .

4.30 ते 5.30 - व्याख्यान
विषय - गोष्ट आपल्याच शरीराची व त्यात राहणाऱ्या मनाची
वक्ते - वैद्य संतोष सूर्यवंशी ( MD आयु )
नवी सांगवी, पुणे येथे नैसर्गिक जीवनशैली , आहारव्यवस्था व चिकित्सा यात 18 वर्षे कार्यरत

अगदी पहिल्या आयुर्वेदिक चहापासून मॉर्निंग वॉक , पौष्टिक सेंद्रिय आहार, योग, आयुर्वेद इ.इ. वाढत जाते health लिस्ट --

सगळेच follow करूनही डायबिटीस , BP, heart attack, वाढते वजन ते अगदी कॅन्सरपर्यंत आजारांची मिळते आयतीच फीस्ट ---

तरुण म्हातारे , स्त्री पुरुष सगळ्यांची एकच कथा !!
एवढे सगळे करुनही मनासारखे जगता येत नाही हीच खरी व्यथा !!

मग ऐकावे तरी कोणाचे ??
Google वर सापडेल उत्तर ??

ऐकावे फक्त आणि फक्त निसर्गाने दिलेल्या सुंदर आणि सुदृढ आपल्याच शरीर-मन-आत्म्याचे ---- यांचा समतोल हेच गमक आरोग्याचे !!

चला तर,
अलगद उलगडुया नाते निसर्ग व माणसाचे आणि भावविश्व शरीर व मनाचे !!!

आयुर्वेद व योग अवलंबित नैसर्गिक जीवनशैली व चिकित्सापद्धती आधारभूत मानून गेली 6 वर्षे सुखीन चिकित्सालय कार्यरत आहे .
त्यानिमित्ताने आयोजन -

6 ते 9 - अल्पोपहार व सुखीन चिकित्सालय पाहण्यास सर्वांना आग्रहाचे आमंत्रण.

स्वागतोत्सुक - वैद्य अवंती नित्सुरे (MD आयु )
9561736398

।। सुखीन चिकित्सालय ।।
फ्लॅट नं 5, प्रगती अपार्टमेंट , जॉगिंग ट्रॅकसमोर , तेजस सोसा. ,कोथरूड.
Land mark - नटराज गॅसजवळ , कोथरूड स्टँडमागे

कृपया पुष्पगुच्छ , भेटवस्तू आणू नये।आपल्या शुभेच्छा हीच भेट 🙏🏻

माणूस निसर्गापासून दुरावला आणि त्यामुळे आजारात वाढ झाली. नैसर्गिक जीवनशैली आणि परिपूर्ण आहार यांच्या संयोगाने सर्व आजारा...
06/07/2018

माणूस निसर्गापासून दुरावला आणि त्यामुळे आजारात वाढ झाली. नैसर्गिक जीवनशैली आणि परिपूर्ण आहार यांच्या संयोगाने सर्व आजारांना दूर ठेवू शकतो.

थोड्याशा विश्रांतीनंतर परत एकदा refreshing सरबते 😋🍹🍹मनुकांचे सरबत ( मृद्विका पानक)🍹🍹ज्याच्या नावातच द्राक्षा म्हणजे मनास...
26/05/2018

थोड्याशा विश्रांतीनंतर परत एकदा refreshing सरबते 😋

🍹🍹मनुकांचे सरबत ( मृद्विका पानक)🍹🍹

ज्याच्या नावातच द्राक्षा म्हणजे मनास प्रिय आणि मृद्विका म्हणजे मृदू , स्निग्ध , सौम्य या प्रकारचे गुण आहेत ; त्या मनुकांच्या सरबतचे गुण अवर्णनीयच !! Total health drink !!

मनुका म्हणजे वाळलेली द्राक्षे होय . द्राक्षे सूर्यप्रकाशात किंवा artificially वाळवून मनुका तयार करतात . द्राक्षाच्या वेगवेगळ्या प्रकारानुसार मनुका वेगवेगळ्या प्रकारच्या मिळतात . पण त्यांचे गुणधर्म थोड्याफार फरकाने सारखेच असतात . बियांसकट द्राक्षे वळवून तयार केलेल्या मनुका चांगल्या .

मनुकांमध्ये कॅल्शिअम , मॅग्नेशियम , लोह , फॉस्परस व पोटॅशिअम असते . आणि ही सगळी खनिजद्रव्ये organic स्वरूपात असल्याने शरीरात चांगल्या प्रकारे absorb होतात .
तसेच साखर crystalline स्वरूपात असून त्यात 30% फ्रक्टोज व 28 % ग्लुकोज असते .. त्यामुळे डायबिटीस असलेल्यानाही हे सरबत प्रमाणात चालू शकते .

कृती -
🍇रात्री काळ्या मनुका गरम पाण्यात भिजत टाकाव्यात व झाकण ठेवावे.
🍇सकाळपर्यंत या मनुका मऊ होतात.
🍇कडकडीत पाण्यात टाकल्यास 2-3 तास भिजवल्या तरी चालते .
🍇त्यानंतर त्याच पाण्यात मनुका हाताने कुस्कराव्यात .
नंतर गाळून घ्यावे . वरून पाणी मिसळू नये .
🍇गोड कमी वाटल्यास थोडी खडीसाखर घालावी .
चवीसाठी 2-3 थेंब लिंबू पिळले तरी चालू शकते .

गुणधर्म -
🍇नावाप्रमाणेच मनुका सरबत मन प्रसन्न करणारे व शरीर थंड , शांत करणारे आहे .
🍇पित्त कमी करणारे असल्याने दाह व तहान कमी करणारे .
🍇आंत्रास ( intestine) बल देऊन पोट साफ करणारे .
🍇थंड असल्याने रक्तदुष्टी कमी करणारे .
🍇स्त्री व पुरुष दोघांत प्रजनन संस्थेस बल देणारे .

औषधी उपयोग -
🍇स्निग्ध, सौम्य, थंड असल्याने वजन वढवणारी औषधे या सरबताबरोबर घ्यावीत .
🍇क्षयरोगात (T B) रोज दिवसभरात 2-3 ग्लास मनुकांचे सरबत प्यावे . याने ताकद भरून यायला मदत होते , energy वाढते . तसेच allopathy औषधे चालू असतील तर वाढणाऱ्या उष्णतेमुळे होणारा दाह कमी होतो .
🍇Anaemia मध्ये Hb वाढवते . तसेच थकवा कमी होतो .
🍇मासिक पाळी सुरू असताना स्त्रियांनी 2-3 ग्लास मनुकांचे सरबत जरूर प्यावे .
🍇थोड्या प्रमाणात BP वाढले असेल तर उपयुक्त .
🍇Pregnancy मध्ये खूपच उपयुक्त . लोह व कॅल्शिअम दोन्ही मिळते. शिवाय energy drink म्हणून उत्तम काम करते . स्निग्ध , थंड , गोड असल्याने गर्भ पोषणास मदत करते .
🍇मानसिक अस्वस्थतेत उपयुक्त

🍹🍹अशा पध्दतीने सर्वसाधारणपणे आरोग्यास अतिशय हितकारक असे हे मनुकांचे सरबत !!🍹🍹

03/05/2018

🍹🍹लिंबू सरबत ( निंबुक पानक )🍹🍹

सगळ्यांच्याच आवडीचे आणि refreshing असे हे लिंबू सरबत ! महत्वाचे म्हणजे कुठल्याही ऋतूमध्ये सहज उपलब्ध असणाऱ्या अशा या सरबतात बऱ्याच प्रमाणात औषधी गुणधर्म आहेत .

लिंबाच्या ढोबळमानाने दोन जाती आढळतात . एक म्हणजे मोठे दिसणारे इडलिंबू ( lemon ) आणि दुसरे नेहमीचे साधे लिंबू ( lime ). दोनही प्रकारच्या लिंबात citric acid असते . लिंबाचा वास आणि जी चव असते ती या citric acid मुळे . तसेच लिंबात भरपूर प्रमाणात vit C असते .

कृती -
🔸लिंबू सरबतची कृती वेगळी सांगायलाच नको .
मात्र कायम 'ताजेच लिंबू' सरबत प्यावे हे महत्त्वाचे .
🔹लिंबाचा रस साखर घालून साठवून ठेवतात व त्याचे सरबत करतात तसले नको .

गुणधर्म -
🔸लिंबू आंबट असले तरी फारसे पित्त वाढवत नाही .
🔹तोंडाला चव आणते व भूक वाढवते.
🔸कृमीघन म्हणजेच जंत मारणारे .
🔹आंबट चवीने मन प्रसन्न करणारे . Refreshing .
🔸थकवा कमी करणारे .
🔹शरीराचे उत्तम पद्धतीने cleansing करणारे .
🔸मळमळ कमी करते .

औषधी उपयोग -
🔸गॅसेस कमी करते . तसेच एका जागी साठून राहिलेला मल ( Waste product ) पुढे ढकलण्यास intestine ला उत्तेजना देते ( अनुलोमन ) त्यामुळे गॅसेसमुळे जर हृदयावर ताण आला असेल व त्यामुळें धाप लागत असेल किंवा दुखत असेल तर कोमट पाण्यातील लिंबू सरबत उत्तम काम करते .
🔹वरील करणानेच पोट दुखत असल्यास ( पोट साफ न झाल्याने तसेच गॅसेस वाढल्याने ) गरम पाण्यात लिंबू सरबत घेणे उपयोगी ठरते .
🔸उलट्या होत असल्यास अतिशय उपयुक्त . पचन होते. मळमळ थांबते . Dehydration भरून निघाल्याने थकवाही कमी होतो .
🔸लिंबू सरबताबरोबर खालील पदार्थांचा उपयोग वेगवेगळ्या आजारांवर होतो .

लिंबू सरबत ➕
१) पुदिना = acidity, गॅसेस
२) जिरेपूड = उत्तम पाचक , तोंडाला चव येण्यासाठी
३) काळे मीठ / हिंग = पोट दुखणे , गॅसेस , अपचन , छातीत दुखणे .
४) आल्याचा रस / सुंठपुड = तीव्र अजीर्ण ( अपचन )

★आजारात लिंबू सरबत घेताना उकळलेल्या व गरम पाण्यात सरबत करावे.

वैद्य अवंती नित्सुरे
📞9561736398

02/05/2018

🍹🍹कोकम सरबत ( वृक्षामल पानक ) 🍹🍹

रणरणत्या उन्हामुळे शरीरात वाढलेल्या उष्णतेवर रामबाण उपाय म्हणजे कोकम सरबत !
विशेषतः कोकणात कोकमाची झाडे आढळतात . कोकम म्हणजे ताजे फळ आणि वळवले की आमसुले .

कृती -
🔸बाजारात मिळणाऱ्या तयार कोकम सरबतात preservatives असण्याची शक्यता असते त्यामुळे आगळ वापरलेले चांगले . घरगुती, खात्रीचे असेल तर चालेल .
🔹आगळ म्हणजे कोकमाच्या ताज्या फळांचा रस. अतिशय आंबट असतो .
🔸पाव ग्लास आगळ घ्यावे . पाऊण ग्लास पाणी मिसळावे .
🔹चवीनुसार साखर व सैंधव मीठ घालावे . साखरेऐवजी गुळही वापरू शकता .
🔸यात जिरेपूड , पुदिना रस किंवा पूड घातल्यास सरबत चविष्टही बनते व उत्तम पाचक म्हणूनक काम करते .
🔹सरबत किंवा आगळ नसेल तर आमसुले भिजत टाकणे , उकळणे व त्या साखर घालून सरबत बनवता येते.

गुणधर्म -
🔸चवीला आंबट असणारे आमसूल / कोकम शरीरात सरबत स्वरूपात थंडपणा निर्माण करते .
🔹आंबट गोड चवीमुळे मनाला आवडणारे , मन प्रसन्न करणारे.
🔸भूक वाढते व तोंडाला चव येते.
🔹तहान तहान कमी होते.
🔸रक्तदुष्टी घालवणारे , पित्तशमन करणारे .

औषधी उपयोग -
🔸शितपित्तात (अंगावर पित्त उठणे व खाज येणे ) व्याधीप्रत्यनिक ( choice of drug) दिवसभर घोट- घोट कोकम सरबत प्यावे . खाज लगेच कमी होते.
🔹सर्वांग दाहात ( शरीराची आग आग होणे) उपयुक्त .
🔸मूलव्याधात भरपूर खडीसाखर घालून प्यावे .
🔹तापात उत्तम . थकवा कमी होण्यास मदत . तोंडाला चव येते.
🔸पोटात कळ येऊन पोट साफ होणे व नंतरही पोट दुखत राहणे यात गुणकारी . त्यात पुदिना किंवा जिरेपूड घातल्यास अधिक उपयुक्त .
🔹कुठल्याही आजारात उकळून थंड केलेल्या पाण्यातील सरबत प्यावे .

वैद्य अवंती नित्सुरे
📞9561736398

30/04/2018

🍹🍋कैरीचे पन्हे ( बाल आम्र पानक )🍋🍹

सध्या आंब्याचा सिझन असल्याने सुरुवात करूया कैरीच्या पन्हयाने ! आंबट - गोड चवीचे आणि म्हणूनच सगळ्यांना हवेहवेसे वाटणारे हे पन्हे !
या ऋतूत असणारा सण म्हणजे गुढीपाडवा , चैत्र- गौरीचे हळदी - कुंकू आणि अक्षतृतीया. या हळदी - कुंकू समारंभात विशेष महत्व पन्ह्याला !
चैत्रापासून पन्ह प्यायला सुरुवात करावी ते अगदी पावसाळा सुरू होईपर्यंत पिण्यास हरकत नाही.
पन्हे करण्याच्या दोन पद्धती आहेत
(१) उकडलेल्या कैरीचे पन्हे

🔸प्रथम कैरी उकडून घ्यावी . थंड झाल्यावर तिचे साल काढून टाकावे व कैरीचा गर काढावा .
🔸त्यात चवीनुसार साखर - गूळ घालून पूर्ण विरघळेपर्यंत ढवळावे .
🔸थोडी वेलचीची पूड घालावी आणि योग्य प्रमाणात पाणी मिसळून प्यावे .

(२) कच्या कैरीचे पन्हे-
🔸कैरी किसावी . १०-१५ मि साखर सैंधव मीठ लावून ठेवावी.
🔸नंतर कैरीचा कीस पिळून रस काढावा . ( मिक्सर मधून बारीक करूनही रस काढता येईल )
🔸या रसात योग्य प्रमाणात पाणी मिसळावे व चवीनुसार वेलचीची पूड .

गुणधर्म -
🔸आंबट- गोड असल्याने मनाला आवडणारे . मन प्रसन्न करणारे .
🔸थकवा कमी करणारे .
🔸भूक वाढवणारे व तोंडाला चव आणणारे .
🔸पचनशक्ती वढवणारे व पचनाचे त्रास दूर करणारे .
🔸शरीरात थंडावा निर्माण करणारे .

औषधी उपयोग -
🔸पन्ह्याला महत्वाचा उपयोग म्हणजे उन्हाचा त्रास कमी होणे . उष्माघातात औषध म्हणून वापरू शकतो इतके महत्त्वाचे .
🔸अंगाचा दाह कमी करण्यास उपयुक्त .
🔸तहान तहान होणे ( तहानच न भागणे ) यात उपयुक्त .

कच्या व उकडलेल्या कैरीच्या पन्ह्यातील फरक -
🔸कच्या कैरीचे पन्हे पचायला थोडेसे जड असते .
🔸ज्याला विशेषतः पित्ताचे त्रास आहेत त्याने उकडलेल्या कैरीचे पन्हेच प्यावे . म्हणजे पित्त वाढणार नाही .
🔸तसेच पित्ताचे व पचनाचे त्रास असणाऱ्यांनी पन्ह्यात सुंठ, जिरेपूड, सैंधव , काळे मीठ या पदार्थांचा वापर करावा.

अतिरेक टाळावा -
🔸विशेषतः पित्ताचे त्रास असणाऱ्यांनी टाळवाच .
🔸अतिरेकाने रक्त व पित्त यांचे विकार वाढू शकतात .
🔸तसेच गॅसेसचे प्रमाण वाढू शकते .
🔸रुक्षता वाढू शकते .

🍹🍹प्रमाणात मनमोकळेपणाने प्यायलेल्या पन्हयाने शरीराला फायदाच होतो. 🍹🍹

26/04/2018

उन्हाने तापलेली धरणी पावसाने भिजल्यावर जो आनंद / समाधानाचा अनुभव मिळतो तशीच अनुभूती येते सरबत प्यायल्यावर .. सगळा निसर्ग थंड - शांत होतो पावसाच्या एक सरीने ! तशीच उन्हाने पार ढेपाळलेल्या शरीरात energy येते सरबताने ! Energy drink! म्हणून अमृतच !

🍹उन्हाळ्यात सरबते म्हणजे अमृतच 🍹

🍋उन्हाच्या उष्णतेने दमलेल्या , तहानलेल्या शरीराला पोषक ठरणारी अशी ही सरबते ..
🍋 शरीरात थंडावा निर्माण करणारी .. गोड रसामुळे शरीरात तृप्ती निर्माण करणारी - म्हणजेच थकवा घालवणारी .. पण आंबट रसामुळे शरीरस्थ अग्नि मात्र न विझू देणारी .. थोडक्यात भूक कमी न होवू देणारी .. शरीराचं तर्पण करणारी.. आल्हाददायक अशी ही सरबते !
🍹शिवाय गोड चवीमुळे हृद्य .. मनाला आवडणारी .. मनाचाही शीण घालवणारी ..आणि मन प्रसन्न करणारी!!!

कशी करावी सरबते ??

🍯मठातील थंड - गार , आल्हाददायक पाणी वापरावे . फ्रिजमधील नक्कीच वापरू नये.

🍚साखरेपेक्षा गूळ वापरला तर अधिक चांगले / किंवा खडीसाखर वापरावी .

चवीला ( आवडत असल्यास ) जिरेपूड , धनेपूड, पुदिना, वेलची, काळे मीठ इ. पदार्थांचा वापर करू शकता . अर्थात कुठले सरबत आहे त्यानुसार ठरवावे .

तसेच कुठलेही सरबत शक्यतो ताजे प्यावे

कशी प्यावीत ?

खरोखरच हल्ली खाण्या - पिण्याच्या पद्धतींच्या बाबतीत इतके अज्ञान किंवा दुर्लक्ष आढळते की मुद्दाम सांगावस वाटलं .
🍹उन्हातून आल्या आल्या गटागटा सरबत / पाणी पिऊ नये . तर आल्यावर 10- 15 मि. झाल्यावर सरबत / पाणी पिण्यास हरकत नाही .
🍹कामातून अगदी 5 - 10 मी. वेळ काढून , एका जागी शांत बसून , एक एक घोट हळूहळू पित सरबतचा आस्वाद घ्यावा .

🍹अशा पद्धतीने तयार केलेले आणि प्यायलेले सरबत खरोखरच या वेगळे समाधान देऊन जाते. आणि बराच वेळ जिभेवर घोळत रहाणारी सरबताची चव ते समाधान / तृप्ती टिकवून ठेवते

दिवसभरात किती प्यावे ??

नेहमी विचारला जाणार प्रश्न ! पाण्याच्या बाबतीत सुद्धा ! माझं नेहमीच उत्तर - तहानेइतके - तुमच्या शरीराला गरज आहे तेवढे !
आपले शरीर खूप छान आहे. ते आपल्याला योग्य तो संदेश देत असते . पण आपण त्याकडे किती लक्ष देतो हा प्रश्न आहे ! थोडंस आत डोकवा ! तहान लागली की तहान भागेपर्यंत प्या पाणी किंवा सरबते !!

ही झाली सरबतांबद्दल ढोबळमानाने माहिती ..
उद्यापासून प्रत्येक सरबताचे गुणधर्म आणि उपयोग ......🍹🍹🍹🍹🍹🍹🍹🍹🍹

23/04/2018

*|| सुखिन चिकित्सालय ||*

निसर्ग म्हणजे बदल. बदल हाच एकमेव शाश्वत आहे.

सांगायला अत्यंत आनंद होतोय तुम्हा सर्वांच्या शुभेच्छांमुळे *सुखिन चिकित्सालय* बदलले आहे. नव्या , मोठ्या जागेत स्थलांतरित झालंय.

नव्या उत्साहात आणि अधिक प्रगल्भ संशोधनासह आयुर्वेदाचा प्रसार करण्यासाठी सज्ज आहोत.

वैद्य अवंती नित्सुरे
(एम डी , आयु., पुणे)

नविन पत्ता-

५, प्रगती अपार्टमेंट, तेजस नगर सोसायटी, कोथरूड स्टँडच्या मागे, जॉगिंग ट्रॅक समोर, कोथरूड, पुणे-४११०३८.

वेळ-
सोम,बुध,शुक्र- दु ३ ते सायं ८
मंगळ,गुरू,शनि- स १० ते दु ३

फोन-9561736398, 8668956678

E-mail- sukhinayu@gmail.com

'Sukhin' in Sanskrit means, a person with balanced state of physical and mental health. We are committed towards patients to help them to be a ' Sukhin'.

Address

5, Pragati Apartments, Tejas Nagar Society
Pune
411038

Opening Hours

Monday 3pm - 9pm
Tuesday 10am - 3pm
Wednesday 3am - 9pm
Thursday 10am - 3pm
Friday 3pm - 9pm
6pm - 7pm
Saturday 10am - 3pm

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Sukhin Ayurved posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share

Share on Facebook Share on Twitter Share on LinkedIn
Share on Pinterest Share on Reddit Share via Email
Share on WhatsApp Share on Instagram Share on Telegram

Category