16/07/2024
रुग्ण हक्क परिषद रुग्णांच्या अधिकारांची चळवळ आहे, रुग्ण हक्क परिषदेत सहभागी व्हा - उमेश चव्हाण
१) डॉक्टरांचे संरक्षण व रुग्णांच्या न्याय हक्कासाठी लढणारी भारतातील पहिली 'आय एस ओ' मानांकित संघटना म्हणजेच रुग्ण हक्क परिषद होय. रुग्ण हक्क परिषद या संघटनेचे महाराष्ट्रातील 36 पैकी 22 जिल्ह्यांमध्ये प्रभावी संघटन आहे. प्रत्येक गावात, शहरात, तालुक्यात, जिल्ह्यात रुग्ण हक्क परिषद ही संघटना रुजली आहे.
२) रुग्ण हक्क परिषदेची स्थापना अभ्यासू सामाजिक व राजकीय कार्यकर्ते, लेखक व व्याख्याते नेते उमेश चव्हाण यांनी 18 मार्च 2012 रोजी केली. गेली 14 वर्षे यशस्वीरित्या रुग्ण हक्क परिषद महाराष्ट्र राज्यासह गोवा, गुजरात, मध्य प्रदेश, आंध्र प्रदेश आणि दिल्ली या राज्यातही कार्यरत आहे.
३) भारतीय संविधानाचे निर्माते डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि राष्ट्रपिता महात्माजी गांधी यांच्या विचाराने रुग्ण हक्क परिषदेचे कार्य प्रभावित झालेले आहे. सेवा, त्याग, संघर्ष ही मूल्ये अंगीकारून सत्य व अहिंसेच्या मार्गाने कार्यक्रम मिळावे, सभा व आंदोलने केली जातात.
४) सन २०२० ते २०२३ या तीन वर्षात महिला व गरीब असंघटित कामगारांचे तळागाळात फिरून रुग्ण हक्क परिषदेने सर्वेक्षण केले. या सर्वेक्षनातून सव्वा दोन लाख रुग्णांची माहिती नोंदविण्यात आली. राज्यातील महिला मुले व गरीब नागरिकांच्या संदर्भातील महाराष्ट्र राज्याचे चित्र वेदनादायी आहे. गंभीर आहे, हे सर्वेक्षनातून दिसते. शासकीय दवाखाने अधिक मजबूत व्हायला हवेत आणि महानगरपालिकांची रुग्णालये खाजगी हॉस्पिटल पेक्षा भक्कम व्हायला हवीत, यासाठी रुग्ण हक्क परिषदेच्या माध्यमातून नेहमीच पाठपुरावा करण्यात येतो.
५) ज्याप्रमाणे डॉक्टरांच्या संरक्षणासाठी कायद्याची निर्मिती केलेली आहे, त्याअर्थी रुग्णांच्या संरक्षणासाठी देखील कायदा निर्माण व्हायला हवा, ही रुग्ण हक्क परिषदेची प्रमुख मागणी आहे. रुग्णांना पैसा अभावी हॉस्पिटल मधून डिस्चार्ज न देणे, डिपॉझिट भरले नाही म्हणून उपचार सुरू न करणे, रुग्णांना कोणत्याही शासकीय योजनांची माहिती न देणे, रुग्णाजवळील पैसे संपल्यानंतर त्यांना जबरदस्तीने डिस्चार्ज घेण्यास भाग पाडणे, पैशाअभावी औषधे व इंजेक्शन रुग्णास न देणे, रुग्णाचा व रुग्णांच्या नातेवाईकाचा अपमान करणे, रुग्णांना मारहाण करणे अशा घटना नेहमीच हॉस्पिटलमध्ये घडताना दिसतात त्यामुळे रुग्णांच्या संरक्षणासाठी देखील फौजदारी संहितेचा रुग्णहक्क संरक्षण कायदा झाला पाहिजे, ही रुग्ण हक्क परिषदेची प्रमुख मागणी आहे.
६) रुग्ण हक्क परिषदेचे अध्यक्ष उमेश चव्हाण यांनी लिहिलेल्या 'रुग्णांचे हक्क कार्य व भूमिका' या पुस्तकाच्या चार आवृत्त्या प्रकाशित झालेल्या आहेत तर 'हॉस्पिटलचे बिल माफ कसे करावे?' या ग्रंथाच्या दोन आवृत्ती प्रकाशित झालेल्या आहेत. या पुस्तकाच्या पंधरा हजाराहून अधिक प्रती छापल्या गेल्या, बेस्ट सेलर किताब मिळविलेले पुस्तक आहे. हॉस्पिटलचे बिल माफ कसे करावे हे विक्रमी खपाचे पुस्तक म्हणून लोकप्रिय ठरलेले पुस्तक आहे. रुग्ण हक्क परिषदेच्या कार्यातून संशोधन करून निर्माण केलेले हे अत्यंत प्रभावशाली पुस्तक आहे.
७) कोविड महामारीच्या कठीण प्रसंगांमध्ये जेव्हा बेड उपलब्ध होत नव्हते, ज्यावेळी रेमडीसेव्हअर सारखे इंजेक्शन उपलब्ध होत नव्हते, जेव्हा ॲम्बुलन्स उपलब्ध होत नव्हत्या, जेव्हा ऑक्सिजनचे किंवा आयसीयूचे बेड उपलब्ध होत नव्हते, जेव्हा डॉक्टर्स किंवा नर्सेस उपलब्ध होत नव्हत्या त्यावेळी रुग्ण हक्क परिषदेचे अध्यक्ष उमेश चव्हाण यांनी परिषदेच्या कार्यकर्त्यांच्या सहयोगाने पुण्यातच छत्रपती शिवाजी महाराज कोविड-19 हॉस्पिटल निर्माण केले होते. कोविड काळात सगळीकडे रुग्णांची लाखो रुपयांची लूट होत असताना रुग्ण हक्क परिषदेने निर्माण केलेल्या छत्रपती शिवाजी महाराज हॉस्पिटल मध्ये रुग्णांसाठी मोफत उपचारांची व्यवस्था करून सर्वसामान्य रुग्णांना मोठा दिलासा त्या गंभीर परिस्थितीत दिला होता.
८) दर्जेदार उपचार मिळवण्याचा हक्क आणि समाधान मिळवताना खाजगी आणि धर्मदाय हॉस्पिटलमध्ये उपचार आणि शस्त्रक्रिया घेणाऱ्या हजारो नागरिकांना मा. उच्च न्यायालयाच्या आदेशाने निर्माण केलेल्या गरीब रुग्णांसाठीच्या मोफत उपचारांच्या योजनेतून कोट्यावधी रुपयांचे उपचार व शस्त्रक्रिया गरिबांना मिळवून दिल्या. रुग्ण हक्क परिषदेच्या वतीने सुमारे 20 हजाराहून अधिक रुग्णांवर मोफत उपचार व मोफत शास्त्रक्रिया करण्यात आल्या आहेत. कोट्यावधी रुपयांचे उपचार हजारो रुग्णांना मोफत मिळवून दिले आहेत.
९) पुण्यातील मुस्लिम बहुल परिसर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कोंढवा येथे रुग्ण हक्क परिषदेच्या कार्यकर्ते पदाधिकारी व सहकाऱ्यांच्या साथीने गरिबांवर मोफत उपचार मिळविण्याच्या हेतूने भव्य दिव्य हॉस्पिटलची निर्मिती सन 2021 साली करण्यात आली.
१०) शासनाच्या त्रुटींवर नेमकेपणाने बोट ठेवणे, विविध मागण्यांसाठी पत्रव्यवहार करणे, राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये तालुका कमिटी व जिल्हा कमिटीच्या वतीने स्थानिक परिसरातील आरोग्याचे प्रश्न सोडविणे, शासकीय अधिकाऱ्यांकडे कायदेशीर पद्धतीने प्रश्न सोडविण्यासाठी उपाययोजना व पाठपुरावा करणे, शेकडो हजारो लोकांच्या साथीने रस्त्यावर उतरून आंदोलन करणे, गावोगावी रुग्ण हक्क परिषदेच्या शाखांचे नामफलक उभे करणे, कार्यकर्त्यांसाठी कार्यशाळा शिबिरांचे आयोजन करणे, धाडसी निडर व बुद्धिमान कार्यकर्ते तयार करणे हीच रुग्ण हक्क परिषदेची ओळख आहे.
११) रुग्ण हक्क परिषदेच्या वतीने महात्मा गांधी सेवा पुरस्कार आणि शिवसन्मान गौरव पुरस्कार दरवर्षी समारंभ पूर्वक प्रदान करण्यात येतात. दरवर्षी जागतिक डॉक्टर दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येतो. दरवर्षी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरीनिर्वाण दिनी विक्रमी रक्तदान कार्यक्रमाचे गेली १० वर्ष सातत्याने आयोजन केले जाते.
१२) रुग्ण हक्क परिषद ही संघटना जनमानसात प्रभावीरीत्या प्रसिद्ध झाल्यानंतर, रुग्ण हक्क परिषदेला जनाधार मिळण्यास सुरुवात झाल्यानंतर अनेकांनी 'रुग्णहक्क' हे दोन शब्द वापरून वेगवेगळ्या संघटना व संस्था निर्माण करण्याचे तसेच रुग्ण हक्क परिषदेच्या कार्यप्रणालीची चोरी करण्याचे प्रताप केले, तथापि त्यांना कोणत्याही प्रकारचे यश आले नाही. रुग्ण हक्क परिषद हीच संघटना सर्वप्रथम निर्मित झालेली डॉक्टरांचे संरक्षण व रुग्णांच्या हिताची शिखर संघटना आहे, याबद्दल समस्त जनतेला जाहीर आहे.
*- अधिक माहितीसाठी -*
रुग्ण हक्क परिषद केंद्रीय कार्यालय, १३६, दुसरा मजला, माती गणपती जवळ, सिताफळ बाग कॉलनी, नारायण पेठ, पुणे - ४११०३०
*फोन नं -*
8956185700/01/2/3