13/07/2023
*पॅशनची पॅशन 20 🔑🎯*
*आदिवासी विकास आणि शिक्षक- शिक्षण व्यवस्थापन भाग 3*
2018-19 दरम्यान आदिवासी विकास विभागाबरोबर असताना आदिवासी शिक्षकांची नेमणुक प्रक्रिया- आणि प्रारंभिक प्रशिक्षणाच्या अभिनव प्रयोगाच्या नियोजनाचे बारकावे आपण गेल्या दोन भागांत पहिले. *आव्हान घेतले होते -सुमारे नऊशे नवीन नेमणूक झालेल्या शिक्षकांचे प्रशिक्षण घेण्याचे- एकाच छताखाली.. तज्ञांचे व्हिडीओ शूट केले होते आणि विभागातील अनुभवी शिक्षक- मुख्याध्यापक बनणार होते संवादक...* *पहिला टप्पा होता संवादकांचे प्रशिक्षण आणि दुसऱ्या टप्प्यात ते शिकवणार होते शिक्षकांना.. व्हिडीओच्या मदतीने...* कोणती आव्हाने आली आणि कोणते *रूपांतरण* घडले, ते पाहूया या भागात.. थोडं सविस्तर...
*नियोजन* केले होते बारकाईने, प्रत्येक *लहान- मोठ्या व्यवस्थापनाचे, प्रशासकीय बाबींचे, त्याचबरोबरीने प्रशिक्षणाचे- योगासनांच्या वेळेचे.., प्रशिक्षणार्थींनी 24 तास विषयात राहावे याचे, महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून त्यांनी वेळेत पोहोचावे याचे आणि संपूर्ण परिसर शिक्षणाविषयी बोलावा याचेही...* सोबत होते मुंबईच्या क्वेस्टचे श्रीकांत आणि त्यांचे सहकारी.. प्रवेशद्वारापासूनच सजले अनेक कॉर्नर... *अब्राहम लिंकनचे शिक्षकांना पत्र, शैक्षणिक पुस्तके- खेळघरचे मॅन्यूअल, अकरा आदिवासी भाषांमधे भाषांतरित केलेली पाहिली ते चौथीची पाठ्यपुस्तके.. भरपूर वाचनसाहित्य...,* जवळच उभे केले एक मोठे *अपेक्षांचे झाड* , स्टिकी नोटस् सह.. *शिक्षकांच्या आदर्श शिक्षणाबद्दलच्या अपेक्षांनी सजणार होते ते झाड...*
पहिल्याच सत्रात आव्हान उभं राहिलं.. प्रशिक्षकांच्या भूमिका ठरवण्याच्या सत्रात.. ‘मॅडम, का या भानगडीत पडताय? आश्रमशाळांचेच विद्यार्थी आहेत हे, स्वत:च्याच संकल्पना स्पष्ट नसताना हे विद्यार्थ्यांना कसे शिकवणार?’,
‘यांनी बदलायचे ठरवले तरी ते घराजवळच राहणार, नातेवाईक, परिसर तोच असेल तर त्यांच्या सवयी डोकं वर काढतील’,
‘शिक्षकांना शिकवण्यापेक्षा आम्हीच मुलांना शिकवतो, त्याचा आनंद जास्त आहे,’,
‘या प्रशिक्षणापेक्षा आम्ही केलेले प्रयोग दाखवा त्यांना.. ते बघून शिकावं त्यांनी!’
*आव्हान होतं- ही नकारात्त्मकता कमी करण्याचं, येणारी पिढी आणि जुन्या पिढीतल्या द्वंदाचं, अनेक वर्ष यशस्वी शिक्षक/ मुख्याध्यापक असतानाही नव्या पद्धती, नवीन भूमिका शिकण्याचं, ती स्वीकारण्याचं..* आणखी एक आव्हान आलं भूमिकेचं.. *प्रशिक्षणादरम्यान त्यांनी शिकवायचे नव्हते, तर त्यांना संवादकाची (facilitator) भूमिका स्वीकारायची होती,* हे होते त्यांच्यासाठी आव्हान... पण अखेरीस *ते होते खरे प्रयोगशील शिक्षक.. तयार झाले या प्रयोगालाही..* *रुपांतरणाला सुरुवात झाली आदिवासी संस्कृतीच्या सत्रात... समजले- स्वीकारले नवीन संदर्भ... नवीन भूमिका.....*
*विचार हलले ते धारणांच्या खेळात* - ‘आदिवासी विद्यार्थ्यांना शासनाने सर्व गोष्टी दिल्याने ते स्वत: प्रयत्न करायला तयार नसतात..’,
‘शाळांमध्ये आदिवासी भाषांना स्थान नसावे’,
‘छडीशिवाय शिस्त येणारच नाही’... अशा कितीतरी धारणा... घडल्या मनमोकळ्या गरमागरम चर्चा... मतं मांडण्याऱ्या आणि हो.. स्वीकारणाऱ्याही... काय काय झाले बदल? ‘ *शक्यच नाही काही घडणे’ च्या जागी आलं ‘करून तर बघू...’*
*‘ते शिक्षक आदिवासी असल्यामुळे....’ च्या जागी आले-‘अनुभव घेऊन मत बनवूया..’* स्वीकारलेही काही बदल *‘आदिवासी शिक्षणाबरोबरच आरोग्य, विचार, बाहेरच्या जगाची आव्हाने असा आश्रमशाळांमधील आव्हानांचा मेरुपर्वत उचलताना ‘हे काम कोणाचे?’ असा शहरी प्रश्न विचारून चालणारा नाही.. प्रत्येकाने आपला सहभाग द्यावाच लागेल...’,* ‘ *विद्यार्थ्यांना शिकावेसे वाटण्यासाठी वातावरण, संदर्भ तयार करणे ही शिक्षकांची जबाबदारी असते.’..* कितीतरी विचार स्वीकारले गेले- स्पष्टपणे...
सुरुवात तर चांगलीच झाली होती... ठरले... रोज संध्याकाळी भेटून आढावा घेण्याचे आणि दुसऱ्या दिवसाच्या भूमिकेची दिशा ठरवण्याचेही..
आव्हानं आलीच.. प्रशिक्षणार्थी वेळेत न येणे हे तर घडणारच होते.. मजलदरमजल करत कानाकोपऱ्यातून आले.. अगदी नऊ महिन्यांची प्रेग्नंट सुद्धा.. काही लहान बाळांच्या आया आल्या.. आपले कुटुंब घेऊन... नियम तर होतेच.. *रुपांतरण केले... प्रक्षोभाकडे जाणाऱ्या परिस्थितीचे- नियमांना धरून घडायला हव्या अशा घटनांमध्ये..*
समांतर चक्र फिरत होते - अधिकाऱ्यांचे.. *तत्कालीन सचिव मा मनीषा वर्मा, आयुक्त मा डॉ किरण कुलकर्णी आणि अनेक अधिकारी आले भेट द्यायला.* . तिथेही *रुपांतरण... सत्कार, हार, भेटी यांचे- निरीक्षण, चर्चा, मार्गदर्शन यामध्ये...* त्यांच्याबरोबर होते अनेक तज्ञ .. आदिवासी शिक्षणात काम करण्याचा अनुभव असणारे तज्ञ.. *रात्र रात्र चर्चा रंगल्या.. अनेक नव्या भूमिका, धोरणे आणि उपक्रमांबाबत निर्णय घेतले गेले.* *एरवी ठाम, स्पष्ट असणारे वरिष्ठ- अधिकारी झाले आश्वासक, विश्वासक...*
*रूपांतरण दिसू लागले पहिल्याच दिवसापासून.. प्रशिक्षकांच्या प्रतिक्रियांमधून* .. ‘ *मॅडम, मुलं चांगली आहेत, यांना मदत करूया...’,*
‘ *आजपर्यंत कधी आशा वाटली नव्हती पण काहीतरी घडवण्याचा उत्साह, विश्वास वाटायला लागला आहे..’* प्रक्रिया चालूच होती.. समारोपाच्या वेळी पाऊस असूनही *खडया आवाजात ऐकू आली शिक्षकांनी घेतलेल्या प्रतीज्ञेतून...* *दिसून आला आदिवासी शिक्षणाच्या विकासासाठीचा आत्मविश्वास, ठामपणा आणि स्पष्टता...*
*भविष्यातील प्रक्रिया तर मोठी योजली होती.. द्रष्टेपणाने.. प्रत्यक्षात कशी येईल माहित नाही... प्रारंभासाठी योगदान देता आले याचे समाधान आहे.. नक्कीच!*
*माधुरी यादवाडकर*
*संचालिका, माईंड व्हिजन सोल्यूशन्स*
*9923032771*