
23/06/2025
संमोहन उपचार : मनाच्या खोल अवस्थेत बदल घडवणारी उपचारपद्धती
आजच्या काळात मानसिक आणि भावनिक आरोग्यासाठी अनेक प्रकारच्या थेरपीज उपलब्ध आहेत. वाढत्या मनोशरीरीक आजारांचे प्रमाण आणि विविध मानसशास्त्रीय उपचारपद्धती याबाबत जागरूकता वाढत आहे. त्यामध्ये संमोहन उपचार (Hypnotherapy) ही एक अशी उपचारपद्धती आहे जी विशेषतः मनाच्या अवचेतन पातळीवर काम करते. इतर उपचारांप्रमाणे संमोहन केवळ वरच्या पातळीवरील विचारांवर लक्ष देत नाही, तर त्या विचारांच्या मूळ जडणघडणीवर प्रभाव टाकते. त्यामुळे उपचारानंतर होणारे सकारात्मक बदल हे अधिक खोलवर आणि वेगाने घडू शकतात. मानसिक त्रास असतानाच संमोहन उपचार घ्यावेत असे नाही तर आपले जीवन अधिक समृद्ध,आरोग्यदायी व्हावे यासाठीही संमोहन उपचार घेता येतात. इतर मानसशास्त्रीय उपचारपद्धतीपेक्षा संमोहन उपचार कसे प्रभावी आहेत,हे आज जाणून घेऊयात.
१. अवचेतन मनाशी थेट संवाद :
संमोहन उपचार दरम्यान थेट अवचेतन मनाशी संवाद साधता येतो. आपल्या सवयी, भावना, आपली विचारप्रणाली आणि वर्तनांची मुळे या अवचेतनात दडलेली असतात. त्यामुळे, या थेरपीमुळे ज्या समस्या आपण जाणीवपूर्वक सोडवू शकत नाही त्या सहजपणे समजून दूर करता येतात. त्याजागी अपेक्षित सवयी आपण प्रोग्रॅम करू शकतो. ज्यामुळे आरोग्य तर सुधारते सोबत जीवनात प्रगती साधता येते.
२. जलद परिणाम मिळतात :
संमोहन उपचार हे बहुतेकदा लवकर परिणाम देणारे मानले जातात. जसे की भीती, चिंता, वाईट सवयी,झोपेच्या समस्या, नैराश्य, मनोशरीरीक त्रास यासाठी संमोहन थेरपीचे परिणाम लवकर दिसतात. पारंपरिक थेरपींमध्ये जे बदल घडायला अनेक आठवडे लागतात, ते संमोहनात काही सत्रांमध्येच होऊ शकतात. त्यामुळे वेळ आणि पैशांची बचत होते.
३. समस्यांच्या मूळ कारणांवर उपचार :
CBT किंवा इतर वर्तनात्मक उपचार पद्धती मुख्यतः व्यक्तीची विचारसरणी आणि वर्तनामध्ये बदल घडवण्यावर लक्ष केंद्रित करतात. मात्र, संमोहन उपचार पूर्वीच्या नकारात्मक अनुभवांपासून तयार झालेल्या भीती, गैरसमज किंवा नकारात्मक अपराधी मानसिकता यांसारख्या मूळ मानसिक कारणांवर थेट परिणाम करते. मूळ कारणे मनातून नाहीशी केली जातात. परिणाम स्वरूप विचारसरणी आणि वर्तन बदल सहज शक्य होतात.
४. इतर उपचारांबरोबर पूरक म्हणून वापर :
संमोहन उपचार इतर उपचार पद्धतींबरोबर पूरक म्हणून वापरता येतो. औषधोपचार, समुपदेशन, मानसोपचार यासोबत संमोहन उपचार केल्यास व्यक्तीला अधिक सकारात्मक मदत होते. व्यक्ती सकारात्मक विचारांना स्वीकारते, योग्य आणि अपेक्षित प्रतिसाद देते. इतर उपचारप्रक्रिया अधिक प्रभावी बनतात.
५. लक्ष केंद्रित करण्याची क्षमता वाढते :
संमोहनाच्या वेळी व्यक्ती एक गहन विश्रांतीची अवस्थेत असतो. ही अवस्थेत शरीर आणि मन शांत, एकसंध असते. अशा वेळी व्यक्तीचे लक्ष पूर्णपणे त्याच्या आंतरिक जगाकडे वळते, ज्यामुळे सकारात्मक सूचना मनात खोलवर परिणाम करतात. या अवस्थेत व्यक्तीची सुचणीयता वाढते.
६. स्वसंमोहनातून स्वयंउपचार :
संमोहन उपचारतज्ज्ञ रुग्ण व्यक्तीला स्वसंमोहन (Self-Hypnosis) शिकवू शकतो. यामुळे व्यक्ती स्वतःच स्वतःच्या मनावर सकारात्मक परिणाम घडवण्यास सक्षम होते. म्हणजेच थेरपीची ताकद पुढेही टिकून राहते. याधारे व्यक्ती स्वतःवर स्वतःच स्वयं-उपचार करते. ही उल्लेखनीय बाब आहे.
असे अनेक फायदे संमोहन उपचार पद्धतीचे सांगता येतील. अशी चर्चा आपण पुढेसुद्धा करू पण जगभरात असे म्हणतात की प्रत्येक व्यक्तीने एकदा तरी संमोहन अवस्था अनुभवली पाहिजे, तसे एकदा करून पहा.
अत्यंत महत्वाची गोष्ट :
संमोहन उपचारासाठी प्रशिक्षित आणि योग्य संमोहन उपचारतज्ज्ञांची निवड करणे आवश्यक असते. योग्य व अनुभवी संमोहनतज्ज्ञाची निवड केल्यासच योग्य उपचार मिळतो.
संमोहन उपचार ही एक अशा प्रकारची शास्त्रीय पद्धत आहे जी मनाच्या खोल पातळीवर काम करत असल्यामुळे बदल अधिक वेगाने आणि खोलवर घडवू शकते. मात्र, प्रत्येक व्यक्तीच्या गरजा वेगळ्या असतात, त्यानुसार संमोहन उपचार कसे योग्य ठरतील, हे ठरवताना तज्ज्ञांचे मार्गदर्शन घ्या आणि योग्य निर्णय घ्या.
तुम्हाला अशा समस्या सतावत आहेत का?
▪️रोज सकाळी उठल्यापासूनच अस्वस्थ वाटणे.
▪️मनात स्पष्ट कारण नसतानाही अनामिक भीती वाटणे.
▪️रात्री झोप लागायला खूप वेळ लागणे किंवा मधूनच जाग येणे.
▪️छातीवर दडपण किंवा हृदयावर भार असल्यासारखं वाटणे.
▪️सतत वेगळे शारीरिक त्रास जाणवणे पण मेडिकल रिपोर्ट्स नॉर्मल असणे.
▪️मनात सतत नकारात्मक विचार येणे, आत्महत्येचे विचार येणे.
▪️लहानसहान गोष्टींवर चिडचिड होणे किंवा राग अनावर होणे.
▪️कुठल्याही गोष्टीची भीती वाटणे – गर्दी, आवाज, फोन, भविष्य.
▪️श्वास घ्यायला त्रास होणे किंवा दम लागल्यासारखं वाटणे.
▪️अचानक थंडी जाणवणे, अंग थरथरणे, कंप असणे,अंग थंड पडणे.
▪️कामावर, अभ्यासावर किंवा संवादात लक्ष न लागणे.
सर्व तपासण्या करून रिपोर्ट नॉर्मल आहेत पण असे विविध मनोशरीरीक त्रास होत आहेत, तर तुम्हाला यातून बाहेर पडण्यासाठी संमोहन उपचार एक राजमार्ग ठरेल हे नक्की.
लक्षात घ्या, तुमचे मन निरोगी, तुमचं आयुष्य आनंदी हीच खरी प्रगती आहे.
समुपदेशन, मनोविकास मार्गदर्शन आणि संमोहन उपचारसाठी आमच्या सेंटरला नक्की भेट द्या.
साई स्नेह माइंड हींलिंग अँड वेलनेस सेंटर, पी.एम.टी. बस डेपोसमोर, कात्रज,पुणे.
सम्पर्क : 8888150101
लेखक : मल्हार शिंगाडे (सायकॉलॉजिस्ट आणि हिप्नॉथेरपिस्ट)
मोबा. 9960631066