Rational Parenting with Dr Amit

Rational Parenting with Dr Amit Let's make parenting & schooling an opportunity to 'Learn, Evolve & Smile' Though we stay in the same house, we do not interact much.

We are living in an era where the communication between parents and children is getting weaker day by day. The generation gap is getting widened and the 'differences of opinion' are taking the center-stage of every discussion. At work, we can handle a team of hundreds with optimum diplomacy, but just one child can test your utmost patience. Parenting has turned into an utter frustration for many.

In actuality, it's not the event that disturbs us, but our judgement about that event, which is based on our belief-system. Dr Amit is here to offer a rational perspective to the situation, and to reach the most practical solution for your emotional hurdles... to help you to 'achieve' a rational balance between your expectations and the reality.

24/03/2020

लॉकडाऊन की ब्रेक-फ्री



आज सातत्याने मला ‘life is beautiful’ हा चित्रपट आठवतोय… नाझी छळछावणीमधे असूनही आपल्या मुलाला प्राप्त परिस्थीतीला सकारात्मक रित्या कसे सामोरे जायचे याची शिकवण देणारा बाप आज आपण सर्वांनी आठवायला हवा. पुढच्या २१ दिवसांची परिस्थीती छळछावणी इतकी वाईट तर नक्कीच नाही. काय मिळणार नाहीये त्यापेक्षा काय मिळतंय ते बघण्याची ही वेळ.

आपण आता सतत आपल्या घरात असणार आहोत, आपल्या कुटुंबाबरोबर. एरवी दर सोमवारी जे आपल्याला वाटतं तेच आता प्रत्यक्षात आलं आहे - एरवी हवी असलेली सुट्टी मिळाली आहे. नशीबाने २१ दिवस तग धरु शकू इतकी चांगली आर्थिक परिस्थीती आपली नक्कीच आहे (गरीबांचा विचार करा). सर्व सुखसोयी आपल्या दिमतीला हजर आहेत. त्याचा योग्य वापर करण्याची ही वेळ. मगाशी बोलताना माझे एक मित्र सीए श्रीधर पाठक म्हणाले तशी minimalistic living शिकवणारे हे २१ दिवस. *गरज आणी आवश्यकता* यातील फरक दाखवणारे हे २१ दिवस.

हे २१ दिवस खरं तर आपल्याला आपल्यावर काम करण्यासाठी मिळालेले आहेत. ज्या गोष्टी आजवर आपण आपल्या ‘बिझी’ शेड्यूल मुळे टाळत होतो त्या सगळ्या आपल्याला करता येतील. मी तर एक ‘हॅबीट’ नावाचे app टाकले आहे. मी त्याला सांगीतल्यानुसार रोज एका औषधाचे वाचन, एका मित्राला फोन, व्यायाम, २ लिटर पाणी, आणि मनात असलेले एखाद्याचे कौतुक व्यक्त केल्याशिवाय ते पुढे जातच नाही. कुणीसा लाईफ कोच सांगे की *एखादी गोष्ट सलग २१ दिवस केली की त्याची सवय लागते… त्यासाठी हेच ते २१ दिवस!* कुठल्या सवयी लावायच्या ते तुम्हीच ठरवा.

सेवासदन शाळेत पाचवी ते सातवीच्या वर्गात दर बुधवारी चालत असलेल्या विवेकी-विचार-तासात आम्ही नुकतेच ‘कोरोना’ साथीची चांगली बाजू यावर चर्चा केली होती. आपल्याला व्यायामाचे, स्वच्छता, स्वयंशिस्तीचे व निरोगी जीवनाचे महत्व शिकवणारा हा कोरोना व्हायरस एका वेगळ्याच नजरेतून मला या मुलांनी दाखवला.

सोशल मिडीयावरुन यापुढे फक्त आणि फक्त सकारात्मक गोष्टीच शेअर करु या. ज्या पोस्टमुळे आपले पित्त खवळते, मनात चलबिचल होते, विचारांना अस्थीरता येते अशा सर्व पोस्ट वाचणे व पुढे पाठवणे टाळू या. आपली आवडती गाणी टाकू या, वाचलेल्या पुस्तकाबद्दल एकमेकांना सांगु या, गेलाबाजार खुदकन् हसू आणणारे विनोद पाठवू या. अनेक दिवस राहीलेली पुस्तके वाचू या. आपापल्या क्षेत्रातला अभ्यास-रियाज करु या.

आपल्याला नको असतानाही परिस्थीतीने आपल्यावर २१ दिवसांचे लॉकडाऊन लादले आहे… आता कैदेत रहायचे की आपणच आपल्याभोवती उभारलेल्या कुंपणांना दूर करुन ‘ब्रेक-फ्री’ व्हायचे ते सर्वस्वी आपल्या हातात आहे, नाही का?

डॉ अमित करकरे

19/07/2019

Subtitles available in: ENGLISH Bombay 1985 - Question #2 from Question & Answer Meeting #1 'Why is it that we are not able to sustain attention for more tha...

16/07/2019

प्रिय नूपुर आणि राधा,

येत्या शुक्रवारी गुरुपौर्णिमा आहे. त्या दिवशी प्रत्येकजण आपापल्या गुरुंनी आपल्याला कसं घडवलं याचं स्मरण आठवण जागवत असतो. आपले पहीले गुरु म्हणजे आपले आईबाबा. त्यांच्याकडे बघत आणि त्यांचे ऐकत आपण शिकत असतो, त्यानंतर शाळेतले एखादे आवडणारे मास्तर किंवा बाई, कॉलेजमधले काही सिनीअर्स, प्रोफेशनल आयुष्यात ज्यांच्याकडे आपण व्यवसायाचे धडे गिरवतो ते, किंवा नोकरीतले चांगले सहकारी अथवा बॉस… असे अनेक जण खरं तर आपल्या आयुष्याला योग्य ते वळण देत असतात.

आमच्यापैकी अनेकांनी तरुणपणी अरनॉल्ड किंवा गेलाबाजार सलमान-संजू ची पोस्टर लावून व्यायाम केला. गायकांचे आपापले आवडते गायक कलाकार असतात ज्यांच्याकडून एकलव्यासारखे ते शिकत असतात. हेच ते रोल-मॉडेलस् - आपण कसं बनायला हवं ते आपल्याला नकळत दाखवत राहणारे, एखाद्या दीपस्तंभासारखे योग्य मार्ग दाखवणारे, प्रसंगी प्रोत्साहन देणारे तर कधी सावधही करणारे. हे प्रत्येकाच्या आयुष्यात असतात. पण हे ही तितकंच खरं की कोणताही रोल-मॉडेल आपल्याला आयुष्याला पुरा पडत नाही.

सैगल नावाचे एक खूप फेमस गायक पूर्वी होऊन गेले. लताबाई किंवा किशोर कुमार त्यांना आपला गुरु किंवा रोलमॉडेल समजत. साल १९४८ मधे ‘जिद्दी’ नावाचा पिक्चर आला होता ज्यात किशोर कुमार यांनी पहिलं गाणं म्हणलं - “मरने की दुआएं क्यों मांगू…” - कधी जमलं तर यूटयूब वर शोधून ऐका - डिट्टो सैगल! एकदम कॉपी-पेस्टच! इतकं, की सांगूनही अनेकांना पटत नाही की हा किशोरचा आवाज आहे म्हणून.

रोल मॉडेलचा पहिला परिणाम हा असा असतो… आपण नकळत आपल्या रोल-मॉडेलला कॉपी करायला लागतो. अगदी आपल्या वागण्या-बोलण्यावरही त्यांची छाप दिसू शकते. आणि असे होणे अगदीच नैसर्गीक आहे. सायकोलॉजीत याला आयडेंटीफिकेशन असं म्हणतात. तुमचे ते वायफाय ने मेन-सर्व्हरला लिंक होणे असते ना, तसेच काहीसे होत असते इथे. एकदा अशाप्रकारे आपण गुरुंशी कनेक्ट झालो की परीणामी शिकण्याचा वेग सुधारतो. प्रत्येक गोष्टीवर, प्रसंगांवर किंवा समस्येसाठी मनात येणारे विचारही समान व्हायला लागतात. आपण अगदी त्यांचंच प्रतीरुप बनायला लागतो, आणि इथेच बोंब होऊ शकते.

खरे आणि योग्य गुरु असतात त्यांना हे लक्षात येतंच कारण गुरु कितीही भारी आणि विद्वान असला तरी काळानुसार त्यांच्याही काही कक्षा असतात. आपण प्रत्येकजण आपलं वेगळे व्यक्तिमत्व घेऊन जन्माला आलेलो असतो, आणी आपल्या नकळत आपण जर आपल्या रोलमॉडेलची कॉपी व्हायला लागलो तर आपल्यातल्या मूळ व्यक्तिमत्वाची प्रगती बंद पडते. गुरु असोत वा रोलमॉडेलस् - आपल्याला योग्य दिशा दाखवणं हेच त्यांचे मुख्य काम, पण त्यांनी दाखवलेल्या दिशेने जाऊन आपला स्वतंत्र मार्ग ज्याला शोधता आला, काळानुसार नव्या लाटा आणि वाटा निर्माण करता आल्या तोच खऱ्या अर्थाने शिकला.

१९४८ साली पहिल्या पिक्चर मधे सैगल यांच्या शैलीत जरी सुरवात केली असली तरी लवकरच किशोर कुमार यांनी आपला स्वत:चा आवाज शोधला, त्याला पैलू पाडले आणि काहीच वर्षात ‘झूमरु’ सारखा पिक्चर दिला ज्यात अस्सल किशोर कुमार आवाज आपल्याला ऐकू येत होता, सैगल यांची कोणतीच छाप नसलेला. म्हणून ते ग्रेट! नाहीतर अनेक गायक आपापल्या रोलमॉडेल सारखे फक्त गातच नाहीत तर त्यांच्यासारखे बोलतात, चालतात आणि त्यांच्याच छायेत वाढत (?) राहताना दिसतात.

गुरुंचे महत्व वादातीत आहेच. त्यांच्याशिवाय शिक्षण म्हणजे अंधारात चाचपडल्यासारखेच आहे, पण आपण त्यांच्यावर अवलंबून रहायला लागलो की समजावं काहीतरी चुकतंय आता. शिष्याकडून काहीतरी नवीन अनुभवणे यातली गंमत ज्याला घेता आली तोच खरा गुरु, आणि त्यांनी दिलेल्या गुरुबळाची जाण ठेऊन ज्याला आपले स्वतंत्र जग निर्माण करता आले तोच खरा शिष्य.

विं दा करंदीकर नावाचे एक फार भारी कवी होऊन गेले. त्यांनी असं लिहून ठेवलंय…
देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे
घेता घेता एक दिवस, देणाऱ्याचे हात घ्यावे

आणि तेच विंदा कधीतरी लिहून जातात…
सद्गुरू वाचोनी । सापडेल सोय ।
तेव्हा जन्म होय । धन्य धन्य ।।

गुरुंनी दाखवलेल्या मार्गावर स्वतःला शोधून व काळानुसार स्वयंसिद्ध होऊन इतरांसाठी गुरु होणे हीच खरी गुरुदक्षिणा!

तुमचा,
बाबा
23.07.2018

Happy to announce our YouTube series on Bach Flower Remedies. Here is the link to our first episode that introduces you ...
12/07/2019

Happy to announce our YouTube series on Bach Flower Remedies. Here is the link to our first episode that introduces you to Bach Flower Therapy and its practical utility.

Subscribe to our channel to get regular updates about next videos, health tips and more.

Let’s understand some basics about utility of Bach Flower Remedies in our daily life. Dr Bach believed that illness was the result of a conflict between the ...

03/06/2019
Akkalkhaate’ book, based on my year 2018 blog, is getting released on 21 April 2019. Time: 5:30 pm. Venue: Vitthalwadi M...
11/04/2019

Akkalkhaate’ book, based on my year 2018 blog, is getting released on 21 April 2019. Time: 5:30 pm. Venue: Vitthalwadi Mandir, Pune

Highly recommended
21/03/2019

Highly recommended

Address

Pune

Alerts

Be the first to know and let us send you an email when Rational Parenting with Dr Amit posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Practice

Send a message to Rational Parenting with Dr Amit:

Share