Dr.kartik's Clinic

Dr.kartik's Clinic Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Dr.kartik's Clinic, Family medicine practice, Neharu chauk bazar peth, Puntamba.

02/01/2024
06/05/2020

* #खरंच_एक_समाज_आणी_देशाचा_नागरिक_म्हणून_लज्जास्पद_वर्तणूक_आहे_आपली.*

मनोज गांगल...यांचा लेख...

मी आणि माझे कुटुंब अमेरिकेत गेले ५० दिवस स्वतःहून विलगीकरणात आहोत. जवळपास १० वर्षे जर्मनीत नोकरी निमित्त काढल्यामुळे मी अनेक जर्मन मित्रांच्या सुद्धा संपर्कात आहे.

अमेरिका, जर्मनी आणि भारत ह्या तिन्ही देशातील लॉक डाऊनची जर तुलना करायची झाली तर ह्या काही गोष्टी मी लिहू शकतो.

अमेरिकेत अनेक लोकांना लॉक डाऊन मान्य नाहीये. ते नाही पाळले तर त्यातून उदभवणाऱ्या धोक्याची त्यांना जाणीव आहे ... पण सरकारने लोकांच्या स्वातंत्र्यावर बंधने न आणता परिस्थिती काबूत आणावी अशी त्यांची मागणी आहे.

लवकरात लवकर लॉक डाऊन संपून नोकरी व्यवसाय परत चालू व्हावेत अशी मुख्य मागणी मोर्च्यांतून, मुलाखतींतून वगैरे असते.
दुसरे म्हणजे, चीन ने आपली अर्थव्यवस्था नष्ट करायला हा विषाणू तयार केला असावा अशी एक शंका इथे आहे.
त्यामुळे ह्या प्रकाराकडे एक आक्रमण किंवा युद्ध म्हणून बघावे आणि तसे असेल तर आपली अर्थव्यवस्था कदापिही ढासळू द्यायची नाही, मग त्यासाठी कितीही मनुष्य हानी झाली तरी चालेल असा एक मतप्रवाह आहे. युद्धात मनुष्य हानी होतेच, ती सहन करायची आणि अर्थव्यवस्था शाबूत ठेऊन शेवटी हे युद्ध जिंकायचे असे अनेकांच्या बोलण्यातून येते.

जर्मनीतून सुद्धा बऱ्यापैकी अश्याच स्वरूपाचे मेसेजेस येतात.
अर्थव्यवस्था किकस्टार्ट कशी करायची. लोकांपर्यंत स्टिम्युलस कसा पोचवायचा. भविष्यात अश्याच स्वरूपाच्या घातक साथी येतील तर त्याला तोंड द्यायला काय प्रकारची उत्पादने, सर्व्हिसेस निर्माण करायच्या.. वगैरे.

अनेक कम्पन्यानी एव्हाना ऑफिस स्ट्रक्चर बदलले आहे. एम्प्लॉयी बसायच्या जागा प्लेक्सिग्लास लावून प्रत्येक माणसाला प्रायव्हेट जागा कशी करून देता येईल याचा विचार केला आहे.
विमान कम्पन्यानी बसायच्या पद्धतीत बदल करून विमान प्रवास जास्तीतजास्त सुरक्षित कसा करता येईल इकडे लक्ष दिले आहे.
सुपर स्टोर्स नि ग्राहकांना सेफ कसे ठेवता येईल ह्याकडे लक्ष केंद्रित केले आहे. हातावर सॅनिटायसरचा फवारा, बिलिंग काउंटर वर आयसोलेशन, ग्राहकांना चालण्यासाठी चक्राकार पद्धत, अत्यंत एफिशिएंट ऑन लाईन डिलिव्हरी अश्या अनेक गोष्टी इथल्या समाजाने गेल्या ३०-४० दिवसात केल्या आहेत.

एकूण देश आणि अर्थव्यवस्था कशी टिकवायची फक्त ह्याचीच चर्चा इथे दिसते. विशेषकरून ‘पुरुषांना घरात राहावे लागल्यामुळे’ ह्या मुख्य सूत्रावर आधारित फालतू विनोद... ह्याचा पूर्ण अभाव.

भारतातून काय वाचायला मिळते?

दारूची वानवा, पुरुषांनी भांडी घासणे, बायको आणि तिच्या आईचे फोन, पुरुषांना घरी स्वयंपाक करायला लागणे, ढुंगणावर पोलिसांनी मारलेले फटके, तबलीघी, मोदी, राहुल इत्यादी विषयावर विनोद.

किंवा कुणाच्यातरी दुःखाचे केलेले राजकारण, उदा. मजुरांची पायपीट.
८०० किमी चालून जाणाऱ्या कुटुंबाला वाटेत १ कुटुंब किंवा १ गाव असे मिळू नये जे त्यांना अन्न वस्त्र निवारा देऊ शकले असते आणि त्यांची पायपीट थांबवू शकले असते?

कुटुंब ८०० किमी चालून गेलं ह्याची बातमी पण त्यांना कोणी आसरा दिला नाही.... हि बातमी नाही?

एक राष्ट्र एक समाज म्हणून एकत्र कसे लढायचे ह्यावर एक पोस्ट किंवा मेसेज नाही.

कोरोना गेल्यावर जिद्दीने कसे उभे राहायचे, नुकसान (देशाचे राहूद्या .. किमान स्वतःचे) कसे भरून काढायचे ह्यावर एक पोस्ट नाही.

परत कोरोना सारखी साथ आली तर कशी आणि काय तयारी ठेवायची ह्यावर भाष्य नाही.

दुप्पट किमतीत भाज्या आणि धान्य का घ्यावे लागतेय ह्याच्यावर कोणी बोलणार नाही पण दारू नाही मिळाली तर सरकारचा महसूल कसा बुडतो वगैरे वर Phd.

पासपोर्ट विरुद्ध राशन कार्ड पोस्ट्स.

लागोपाठ इरफान गेला, ऋषी गेला म्हणून आश्चर्य वगैरे व्यक्त करणाऱ्या पोस्ट्स. कुणाच्या शेवटच्या घटकांचा व्हिडीओ, इरफानला जाळले कि पुरले, ऋषीची इस्टेट किती वगैरे पोस्ट्स.

वास्तविक दोघेहि कॅन्सरने गेले पण कॅन्सरशी लढा कसा द्यायचा ह्यावर आली का एखादी पोस्ट?
या उलट घरात किती तेलकट, तुपकट, चमचमीत करून खातोय त्या पोस्ट्सचा खच.
आपण अडचणीत आहोत. कोरोना नंतर भीषण मंदी येणार आहे, उधळमाधळ नको करायला कसलीही जाणीव नाही.

आणि आता दारू साठी लागलेल्या रांगा ह्यावर पुढे २-३ दिवस चालतील.

खरंच एक समाज म्हणून लज्जास्पद वर्तणूक आहे आपली.

💧 *स्वर्णबिंदू प्राशन*  💧( आयुर्वेदाची मानवी जीवनाला पुष्टी देणारी अमूल्य भेट )आपले पाल्य सुंदर ,सशक्त निरोगी सुदृढ आणि ...
20/10/2019

💧 *स्वर्णबिंदू प्राशन* 💧
( आयुर्वेदाची मानवी जीवनाला पुष्टी देणारी अमूल्य भेट )
आपले पाल्य सुंदर ,सशक्त निरोगी सुदृढ आणि बुद्धीवंत असावे अशी प्रत्येक पालकाची उमजत भावना असते. स्वर्णबिंदू प्राशनाने शरीराची सर्वांगीण रोगप्रतिकारशक्ती वाढत असल्याने सर्वच आजारांसाठी उपयूक्त पडते.

*स्वर्णबिंदू* हे अस्सल सोन्याचे भस्म आणि बुद्धीवर्धक द्रव्ये यांचा संयोग असलेले औषध आहे. शरीराची रोगप्रतिकारकशक्ती वाढविण्यासाठी आणि वर्ण उजळण्यासाठी सुवर्णापेक्षा श्रेष्ठ औषध काय असू शकते ! ग्रहणशक्ती , स्मरणशक्ती , व्यवहार चातूर्य , ज्ञानेंद्रियाची शक्ती वाढविण्यासाठी,विविध प्रकारच्या विषारी द्रव्यांपासून आणि ॲलर्जी विरूध्द प्रतिकारशक्ती तयार करते.

आयुर्वेदानुसार *स्वर्णबिंदू प्राशन* पुष्य नक्षत्रावर करावे . पुष्य नक्षत्र हे नावाप्रमाणे पुष्टी देणारे आहे.

*स्वर्णबिंदू प्राशनाने होणारे फायदे :-*
💧 सर्व प्रकारच्या रोगांविरुद्ध लढण्यासाठी रोगप्रतिकारशक्ती वाढवते.
💧मुलांची ग्रहणशक्ती , स्मरणशक्तीमध्ये वाढ होते.
💧शरीराची कांती / वर्ण उजळू लागतो.
💧पचनशक्ती सुधारते व शरीराची आणि मनाची शक्ती वाढते.
💧सर्व प्रकारच्या ॲलर्जी विरूध्द प्रतिकारशक्ती वाढते.
💧शय्यामुत्रता , न्यूनगंड भिती कमी करण्यासाठी मदत होते.
💧लहान मुलांमध्ये दात येतेवेळी होणाऱ्या आजारांविरुद्ध प्रतिकारशक्ती निर्माण होते.
या सर्व बाबी लक्षात घेऊनच आम्ही प्रत्येक महीन्याच्या पुष्य नक्षत्रावर *स्वर्णबिंदु प्राशन* देतो.

11/04/2018

" विद्येविना मती गेली, मतिविना नीती गेली, नीतिविना गती गेली, गतिविना वित्त गेले, वित्ताविना शुद्र खचले, एवढे अनर्थ एका अविद्येने केले." जेव्हा समाजजीवनाचा तोल ढळतो,तत्त्वांना ग्लानी येते.नीतीचा विपर्यास होतो आणि माणसांचा पशू होतो, तेंव्हा समाजाला सावरणारा कोणीतरी महात्मा प्रकट होतो... सामाजिक गुलामगिरीचा अंधार सर्वत्र दाटला असताना ज्यांच्या पावलांनी "सार्वजनिक सत्यधर्माची पहाट " देशाच्या दारी आली ते परमपावन व्यक्तीमत्व " महात्मा ज्योतिबा फुले "...!! आज 11 एप्रिल त्यांच्या जन्मदिनानिमित्त त्यांना कोटी कोटी प्रणाम....!!!

आभाळाने नाकारलेल्या पंखांना उड्डाणाचे सामर्य्थे देणाऱ्या हे
महामानवा.....! तुझे विचार आमचे आचार होवोत!

25/03/2018

🚩ll लोकाभिरामं रणरंगधिरं राजिवनेत्रं रघुवंशनाथं|कारुण्यरुपं करुणाकरणं तं श्रीरामचंद्रं शरणं प्रपद्ये|| 🚩
सर्वांना रामनवमीच्या हार्दिक शुभेच्छा

01/03/2018

नमस्कार,
माझ्या सर्व कुटुंब स्नेही, गुरुजन, विद्यार्थी, मित्र, व्यावसायिक बंधू आणि पेशेन्ट परिवार ह्यांना होळी सणाच्या हार्दिक शुभेच्या !!!

Address

Neharu Chauk Bazar Peth
Puntamba
414001

Alerts

Be the first to know and let us send you an email when Dr.kartik's Clinic posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Practice

Send a message to Dr.kartik's Clinic:

Share

Share on Facebook Share on Twitter Share on LinkedIn
Share on Pinterest Share on Reddit Share via Email
Share on WhatsApp Share on Instagram Share on Telegram