03/08/2024
• आयुष्यात मानवी प्रयत्नांची यशस्वी होण्याची शक्यता ही अपवादांवरून पडताळायची नसून, वारंवारीतेने पारखुन बघायची असते. आपण जो मार्ग चोखाळतोय, त्या मार्गावरून गेलेल्या बहुसंख्य मार्गस्थांच्या नशिबी जे गंतव्य आलंय तेच गंतव्य आपल्याही नशिबी येण्याची शक्यता, probability च्या गणितीय सूत्रांप्रमाणे अधिक असणार आहे. Probability हे गणिताचं शास्त्र असतं. Probability म्हणजे आयुर्वेद नव्हे, जिथे काहीही होवू शकतं असं आपल्याला वाटत असतं.
BAMS करून झाल्यावरही त्यानंतर आयुर्वेदात MD/MS करावं वाटत असेल तर तुमच्या विचारशक्तीची धन्य आहे हे मान्य करून
• आयुर्वेदिक MD/MS करून तुम्ही आयुष्यात पुढे नक्की काय करण्याचा विचार करताय हे सर्वप्रथम स्वतःलाच विचारा. त्यासोबत तुमच्या अवतीभवतीचे बहुसंख्य एमडी/एमएस आयुर्वेदिक काय करत आहेत ते बघा.
• बहुसंख्य सिनियर एमडी /एमएस आयुर्वेदिक नक्की काय करत आहेत ते बघा म्हणतोय, अपवादनेच वेगळं काही करणारं उदाहरण बघुन निर्णय घेऊ नका.
•अकरावी बारावी सायन्सला गणित असेल अभ्यासाला तर त्यातले probability वगैरे काही आठवतंय का बघा.
• एमडी / एमएस करण्याचा विचार करणाऱ्या bams लोकांनो, तुम्हाला ज्या विषयात एमडी/एमएस करायचंय त्या विषयात सर्वप्रथम आयुर्वेदाच्या एमडी/एमएस केलेल्या लोकांमध्ये मुलांची संख्या किती आणि मुलींची संख्या किती हे गुणोत्तर हे नीट ध्यानात घ्या.
• मग आयुर्वेद एमडी/एमएस मुलं शिक्षण आटोपल्यावर आयुष्यात काय करत आहेत आणि आयुर्वेद एमडी/एमएस मुली शिक्षण आटोपल्यावर आयुष्यात नेमकं काय करत आहेत याचा एकंदरित आढावा घ्या.
• त्यासाठी तुम्हाला निश्चित अशी अधिकृत सांख्यिकी सध्या उपलब्ध नसेलच, पण किमान दहा आयुर्वेद काॅलेजातल्या, जिथे त्या त्या विषयातील पदव्युत्तर पदवीचं शिक्षण उपलब्ध असतं, तिथल्या गेल्या दहा बॅचेसमधील पास आऊट लोकांची हिस्ट्री गाइड लोकांजवळून गोळा करा.
• आयुर्वेदातील एमडी/एमएस केलेल्या मुलांची वेगळी आणि मुलींची वेगळी अशी करियरविषयक माहिती गोळा करा, जेणेकरून तुम्ही स्वतः मुलगा असाल किंवा मुलगी असाल तर आयुर्वेद एमडी/एमएस मुला मुलींच्या आयुष्याने घेतलेल्या वळणाची probability बघुन स्वतःच्या आयुष्यात त्यानुसार वळणं येण्याची शक्यता अधिक असणार आहे हे नक्की समजा. मग निर्णय घ्यायला बरं पडेल तुम्हाला.
• आयुर्वेदाची क्लिनिकल प्रॅक्टीस करण्यासाठी म्हणुन आयुर्वेदात एमडी/एमएस करणार असाल तर भारतात सध्याच्या घडीला अर्धसाक्षर लोक/ गावठी वैदू/ मसाज थेरपिस्ट लोकदेखील स्वयंघोषित आयुर्वेद प्रॅक्टीश्नर आहेत हे ध्यानात घ्या.
• MD/MS Ayu प्रॅक्टीश्नरपेक्षा फक्त BAMS असलेला प्रॅक्टीश्नर एखादं आयुर्वेदिक औषध लिहू शकत नाही किंवा एखादं पंचकर्म करू शकत नाही अशी परिस्थिती नाहीये हे लक्षात घ्या.
• आयुर्वेदिक उपचार घेऊ इच्छिणाऱ्या सामान्यजनांना अर्धसाक्षर वैदू लोकांपासुन MD आयुर्वेद लोकांपर्य॔त व्यवहारात सगळे आयुर्वेद प्रॅक्टीश्नर लोक सारखीच औषधी देणारे भासतात.
• एमडी करून आयुर्वेदिक प्रॅक्टीस करण्याचा ठाम निर्धार असेल तर आजवरचे किती एमडी आयुर्वेदिक फक्त आयुर्वेदाची प्रॅक्टीस करत आहेत हे एकदा व्यवस्थित बघून घ्या.
• माॅडर्न प्रॅक्टीस, विशेषतः सर्जरीची करण्याचं स्वप्न असेल तर बाहेर MBBS MS Specialists च्या प्रॅक्टीसचं तगडं आव्हान असणार आहे. परत एकदा probability ला शरण जा. किती आयुर्वेदिक लोक modern medical practice ही clinical outcomeच्या स्तरावर त्यांच्या MBBS MD/MS Counterparts च्या तुलनेत यशस्वीरित्या आणि आत्मविश्वासपूर्वक करत आहेत हे बघा. अशा प्रॅक्टीसची वैधानीक सुरक्षितता आधी निश्चित करून घ्या.
• सर्जिकल ब्रँचेस निवडणार असाल तर त्या काॅलेजात त्या त्या विभागात कोणकोणत्या सर्जरीज् आणि किती संख्येत होतात? त्या सर्जरी कोण करतं? गाइड आणि विभागातले मास्तर लोक सर्जरी करतात की बाहेरून MBBS MS,MCh येऊन करतात? सर्जरीत काही काॅम्प्लिकेशन्स आलेत तर त्याची मॅनेजमेंट कोण करतं? याची आधी माहिती घ्या.
• प्रॅक्टीस, ती कुठलीही असू देत आयुर्वेदिक किंवा आयुर्वेद आणि आधुनीक दोन्ही मिश्र, ती करताना पेशंट्स डिग्री बघुन नव्हे तर रिझल्ट्स बघुन येतात असं तुम्हाला खरोखर वाटत असेल तरीही प्रॅक्टीसचे शासकीय नियम आणि कायदे हे डिग्री बघुनच ठरतात या वास्तवाकडे शहामृगी डोळेझाक करू नका.
Forwarded post